नात्यात असताना एकमेकांच्या आर्थिक स्थितीबाबत थेट विचारणे थोडे कठीण वाटू शकते. त्यातही हिंजेसारख्या २३ दशलक्ष युजर्समधून आपल्याला हवा तसा जोडीदार शोधणे त्याहून कठीण काम आहे. योग्य जोडीदार शोधण्याची ही अडचण दूर करण्यासाठी हिंजे ॲपवरील सिंगल एका नव्या फीचरचा वापर करत आहेत. या फीचरमुळे युजर आपली आर्थिक क्षमता किती आहे, ते क्रेडिट स्कोअरद्वारे दाखवून देऊ शकतात. हे फीचर नेमके काय आहे? जोडीदाराच्या शोधात असणाऱ्यांना याचा नेमका लाभ काय होणार? याबाबत घेतलेला हा आढावा.

क्रेडिट स्कोअर प्रोफाइलला कसा अपडेट करतात

‘फर्स्टपोस्ट’ या वेबसाइटने या विषयासंबंधी बातमी दिली आहे. हिंज या लोकप्रिय डेटिंग ॲपने क्रेडिट स्कोअर प्रोफाइलला जोडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यावरून एखादा व्यक्तीची आर्थिक ऐपत किती हे कळू शकणार आहे. जर क्रेडिट स्कोअर ५०० हून खाली असेल तर ठराविक संपत्ती एखाद्या व्यक्तीकडे आहे, असे मानले जाते. जर ५०० हून अधिक स्कोअर असेल तर ती व्यक्ती मालामाल असल्याचे समजते, अशी माहिती ‘न्यूज १८’ ने दिली आहे.

rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
rap songs campaigning
प्रचारासाठी ‘रॅप’चा ठेका, मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Gold Silver Price Today 08 November 2024 in Marathi
Gold Silver Price Today : लग्नसराईपूर्वी सोने -चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील दर

टिक टॉकवर स्प्रेडशीटशान या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या अकाऊंटट शॅनन ग्रोफ्री यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शॅनन यांनी आपला क्रेडिट स्कोअर जाहीर केला असल्याचे सांगितले आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी क्रेडिट स्कोअर जाहीर करण्याचा निर्णय फक्त संशोधनासाठी घेतला असल्याचे सांगितले. ‘द इंडिपेंडंट’ने दिलेल्या बातमीनुसार शॅनन म्हणाल्या की, शॅनन यांनी काही स्क्रीनशॉट शेअर करत प्रतिक्रिया दिली. मी माझ्या हिंज प्रोफाइलवर क्रेडिट स्कोअर जाहीर केला आणि पुढे पाहा काय झाले.

बोस्टन येथे शॅनन यांनी सांगितले की, या निर्णयामुळे त्यांना चांगले जोडीदार मिळायला, तसेच त्यांच्यासोबत संवाद साधण्यास खूप मोकळीक वाटत आहे. क्रेडिट स्कोअर जुळलेल्या एका व्यक्तीने तर थेट लग्नाची मागणी घातली, असेही त्यांनी सांगितले. शॅनन यांनी या वेळी काही स्क्रीनशॉटही सादर केले आहेत. ॲरॉन नावाचा एक युजर म्हणतो की, “मला हवी तशी आहेस…” ॲरॉन आणि शॅनन यांचा क्रेडिट स्कोअर जुळत आहे. ॲरॉन पुढे म्हणतो की, आपण पुढच्या गुरुवारी एकत्र बसू या का?

हिंज क्रेडिट स्कोअरचा हॅशटॅग टिकटॉकवर ट्रेडिंग आहे. या हॅशटॅगला आतापर्यंत ७५० दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युजर्सनी ही कल्पना उचलून धरली असून त्याकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.

क्रेडिट स्कोअर कसा मोजला जातो?

एखाद्याला किती कर्ज द्यावे यासाठी कर्ज देणाऱ्या संस्था त्या व्यक्तीच्या वर्तमान मिळकतीचे निरीक्षण करून एक अंदाज बांधतात, त्याला क्रेडिट स्कोअर म्हणतात. साधारण ३०० ते ८५० या दरम्यानचा क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. ‘इंडिपेंडंट वेबसाइट’ने क्रेडिट कर्मा संस्थेच्या कॉलिन मॅक्ररी यांची प्रतिक्रिया घेतली. आपल्याला कर्ज मिळण्यासाठी आपण किती पात्र आहोत, याचा या आकड्यातून अंदाज येतो, अशी माहिती त्यांनी दिली.

या ट्रेण्डची सुरुवात कशी झाली?

फेब्रुवारी महिन्यात या ट्रेण्डची सुरुवात झाल्याचे लक्षात येते. बिझनेस इनसाइडरने दिलेल्या बातमीनुसार, लिह नाइसवॅण्डर यांनी सर्वात आधी त्यांच्या आर्थिक क्षमतेची माहिती डेटिंग ॲपवर जाहीर करण्याचा निर्णय घेतला. कारण डेटिंग ॲपवर त्यांना मनासारखा जोडीदार शोधणे कठीण झाले होते.

लिह यांचा क्रेडिट स्कोअर ८११ एवढा होता. त्यांच्या फोटोवर १०० हून अधिक लाइक्स मिळाल्या असून महिन्याभरात १७ लोकांना त्यांनी डेट केले. ‘न्यूजवीक’शी बोलताना त्यांनी सांगितले की, आर्थिक क्षमता जाहीर केल्यापासून त्यांना चांगल्या प्रोफाइलची रिक्वेस्ट येत आहे. ‘आउटलेट’शी बोलत असताना लिहने सांगितले की, माझा प्रोफाइल सर्वांपेक्षा वेगळा व्हावा, यासाठी मी ही कल्पना वापरली. मला माहीत होते की, मुलांना यात गंमत वाटेल आणि काही जणांवर याची छापसुद्धा पडेल.

डेटिंग ॲपवर जोडीदार शोधण्यासाठी पैसा हा घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. क्रिप्टो व्यवहार करणाऱ्या ई टोरो (eToro) या वित्त कंपनीने २०२२ साली एक सर्व्हे केला होता, ज्याचे वार्तांकन ‘सीएनबीसी न्यूज’ने केले आहे. जर एखाद्याकडे बिटकॉइन असतील आणि त्याची माहिती त्यांनी डेटिंग ॲपवर दिली असल्यास इतर युजर्सच्या तुलनेत त्यांच्या प्रोफाइलला अधिक पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे.

या संकल्पनेवर टीका

काही जणांना आर्थिक क्षमता उघड करणे योग्य वाटत असले तरी अनेकांनी यावर टीका केली आहे. जोडीदारांना एकमेकांकडे आकर्षित करण्यासाठी कोणत्या बाबींची आवश्यकता आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर काही लोक म्हणाले की अशा संकल्पनांमुळे खरे नाते प्रस्थापित होण्यास अडचणी निर्माण होतील. ‘न्यूज १८’ शी बोलताना एका टिक टॉक युजरने सांगितले की, एखाद्या पुरुषाला माझ्या संपत्तीमुळे माझ्याशी जवळीक साधायची असेल, तर माणूस मला नको आहे. तर दुसऱ्या एका महिलेने सांगितले की, तुम्ही आवडो या न आवडो; पण जर तुम्ही एखाद्या पुरुषापेक्षा चांगली कामगिरी करत असाल तर त्या पुरुषाला तुमच्याबद्दल संताप निर्माण होऊन हळूहळू असुरक्षिततेची भावना निर्माण होते.