इतिहासात पहिल्यांदाच भारतीय दागिन्यांच्या बाजारात सोन्यापेक्षा चांदीची मागणी वाढली आहे. या सणासुदीच्या काळात चांदीची मागणी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया (टीओआय)’च्या वृत्तानुसार, या वर्षी धनत्रयोदशीच्या काळात चांदीच्या विक्रीत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली असून किमतीतही ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तेच सोन्याच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी लक्षणीय घट झाली आहे. परंतु, लोक सोन्यापेक्षा चांदीला प्राधान्य का देत आहेत? चांदीची मागणी वाढण्याचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ.

चांदीच्या मागणीत वाढ

भारतात दिवाळी आणि लग्नाच्या हंगामात चांदीच्या मागणीत वाढ होते, परंतु एकूणच २०२४ मध्ये लोकांमध्ये चांदीविषयी रस निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) चे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी नोंदवले की, चढत्या किमती असूनही यावर्षी चांदीची विक्री अंदाजे ४० टक्क्यांनी वाढली आहे. मेहता यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले, “आम्ही चांदीसाठी डेटा एकत्र करत आहोत, कारण आजपर्यंत एवढी मोठी मागणी कधी झालेली नाही.” तसेच सोन्याच्या विक्रीत १५ टक्क्यांनी घट झाली असून, एकूण विक्री अंदाजे ३५ ते ३६ टन एवढी आहे, जी मागील सणासुदीच्या काळात ४२ टन इतकी होती. परंतु, सोन्याच्या सरासरी किमतीत सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे मूल्याच्या दृष्टीने ही विक्री जास्त समजली जात आहे. गेल्या वर्षी २४,००० ते २५,००० कोटींच्या मध्यात सोन्याची विक्री झाली होती, जी यावर्षी २८,००० कोटींवर पोहोचली आहे. यावर्षी सणांसाठी टोकन खरेदी म्हणून चांदीची नाणी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे, असे ‘बिझनेस टुडे’ने वृत्त दिले आहे.

taliban rules against afghan women
अफगाणिस्तानातील महिलांना एकमेकींचा आवाज ऐकण्यावर बंदी, कुराण पठणासही मनाई; तालिबानच्या नव्या फतव्यात काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
gold reserves, Dhanteras gold, gold storage, RBI, england
विश्लेषण : १०२ टन सोने इंग्लंडकडून भारताकडे… रिझर्व्ह बँकेच्या ‘सोने वापसी’ निर्णयामागे काय कारण?
china super rich numbers declining
‘या’ देशातील श्रीमंत लोक देश सोडून का जात आहेत? श्रीमंतांच्या संपत्तीत घट होण्याचे कारण काय?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
भारतात दिवाळी आणि लग्नाच्या हंगामात चांदीच्या मागणीत वाढ होते, परंतु एकूणच २०२४ मध्ये लोकांमध्ये चांदीविषयी रस निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. (छायाचित्र-फायनान्शियल एक्सप्रेस)

हेही वाचा : नेपाळची भारतावर कुरघोडी! नव्या नोटांवर भारताचा भूभाग छापणार; चीनशी याचा संबंध काय?

सोन्याच्या किमती वाढल्याने विक्रीत घट?

सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे अनेक खरेदीदार पर्याय म्हणून चांदीचा विचार करत आहेत. दरिबा कलान व्यापारी मंडळाचे अध्यक्ष आणि रूप ज्वेलरी हाऊसचे संचालक बसंत कुमार गुप्ता यांनी सांगितले, “गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सोन्याच्या विक्रीला मोठा फटका बसला आहे,” असे त्यांनी बिझनेस स्टँडर्डला सांगितले आणि ग्राहकांच्या वर्तनातील बदलावर प्रकाश टाकला. जागतिक सुवर्ण परिषदेने असा अंदाज वर्तवला आहे की, भारतातील सोन्याची मागणी २०२४ मध्ये चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचू शकते, मुख्यतः सोन्याच्या किमतीत झालेल्या अभूतपूर्व वाढीमुळे.

सध्या स्थानिक बाजारात सोन्याचा भाव ८०,००० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, तर चांदी एक लाख रुपये प्रति किलोग्राम आहे. २०२४ दरम्यान भारताची मागणी ७०० ते ७५० टनांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे, गेल्या वर्षी ही एकूण ७६१ टन होती. लोकांना असा विश्वास आहे की, सोन्यापेक्षा चांदी चांगला परतावा देईल. या चांगल्या परताव्यामुळे सोन्याच्या वाढत्या किमतींमध्ये चांदी गुंतवणुकीचा एक व्यवहार्य पर्याय ठरल्या आहे.

उद्योगांकडून प्रचंड मागणी

चांदीच्या वाढीला चालना देणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे विविध उद्योगांची वाढती मागणी, विशेषत: बूमिंग इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) क्षेत्र. वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी अलीकडेच एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर चांदीच्या वाढत्या मागणीवर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, “भारतात किमती एक लाख रुपये प्रति किलोच्या पुढे गेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मागणी दुपटीने वाढली आहे. चांदीची मागणी केवळ त्याच्या पारंपरिक वापरामुळे नव्हे तर मोठ्या औद्योगिक मागणीमुळे वाढते. चांदी आता अक्षय ऊर्जेसाठी सौर पॅनेलमध्ये, ईव्हीमध्ये, प्रगत आरोग्यसेवा, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर अनेक तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे.

हेही वाचा : ‘या’ राज्याने मेयोनीजवर बंदी का घातली? मेयोनीज शरीरासाठी खरंच घातक आहे का?

“सुरुवातीला चांदी तयार करणे एक आव्हान होते, परंतु अभियंते आणि तंत्रज्ञांनी आता ते सोपे झाले आहे. आज आपण जागतिक स्तरावर चांदीच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहोत,” असे त्यांनी ‘एक्स’वर लिहिले. त्याशिवाय ‘बिझनेस टुडे’ने डीएसपी म्युच्युअल फंडच्या अहवालाविषयीचे वृत्त दिले. ज्यात असे नमूद करण्यात आले की, चांदीने इतर मौल्यवान धातूंच्या तुलनेत उत्कृष्ट कामगिरी दर्शविली आहे. विशेषतः उच्च देशांतर्गत आयात, गुंतवणूकदारांकडून इटीएफ खरेदी, इलेक्ट्रॉनिक्सपासून सेमीकंडक्टरपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानातील चांदीची अत्यावश्यकता चांदीचे बाजारमूल्य वाढवत आहे. “लोकांना आता हे समजू लागले आहे की, चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची हीच खरी संधी आहे,” असे मेहता म्हणाले.

Story img Loader