एक ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर १८० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. सक्षम क्षेपणास्त्र बचाव यंत्रणेमुळे यात इस्रायलचे फार नुकसान झाले नाही. पण इस्रायलच्या भूमीवर इराणकडून थेट हल्ला होण्याची ही सात महिन्यांतली दुसरी वेळ होती. इराणला लवकरच चोख प्रत्युत्तर देऊ, असे इस्रायलने त्यावेळी जाहीर केले होते. तसेच वेळ पडल्यास इराणच्या तेल उत्पादन प्रकल्पांना किंवा अणुऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करू असेही इस्रायलने जाहीर केले होते. प्रत्यक्षात दोन आठवडे उलटूनही इस्रायलकडून हा बहुचर्चित प्रतिहल्ला झालेला नाही. तसेच नुकतेच आपण दोन्ही प्रकारच्या प्रकल्पांवर हल्ला करणार नाही, असे इस्रायलने जाहीरही केले. हा बदल किंवा विलंब का झाला, अमेरिकेच्या दबावातून हे घडले का, अशा विविध प्रश्नांचा वेध…

इस्रायलची योजना काय होती?

इस्रायलने सध्या लेबनॉनमध्ये हेझबोलाचा बंदोबस्त करण्यासाठी लष्करी कारवाई सुरू केली आहे. याशिवाय गाझा पट्टीत या देशाकडून बॉम्बवर्षाव, क्षेपणास्त्रांच्या मार्गाने आग ओकणे सुरूच आहे. हेझबोलाचा नेता हासन नसरल्ला गेल्या महिन्यात इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये मारला गेला होता. ती हेझबोलाप्रमाणेच या संघटनेचा खंदा समर्थक असलेल्या इराणसाठीही नामुष्की होती. त्याही काही दिवस आधी हमासचा म्होरक्या इस्मायल हानिये हा इराणची राजधानी तेहरानमध्ये मारला गेला होता. या हल्ल्यांचा बदला म्हणून इराणने १ ऑक्टोबरला इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यास प्रत्युत्तर द्यायचे, पण कशा प्रकारे याविषयी इस्रायलच्या सरकारचा खल सुरू होता. इराणच्या तेलनिर्मिती आणि अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करावेत, असे इस्रायली सरकारमधील कडव्यांचे मत पडले. तर हा हल्लाही प्रतीकात्मकच असावा, असे काही नेमस्तांचे म्हणणे होते. 

Hamas-Israel armistice in Gaza after 15 months of intense war
हमास-इस्रायल दरम्यान गाझात युद्धविराम… पश्चिम आशियात आता तरी शांतता नांदेल?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
israel hamas agree to ceasefire conflict in gaza to end after 15 months
इस्रायल-हमास युद्धविरामास सहमती; १५ महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार
Israel Hamas War reuters
इस्रायल-हमासमधील युद्ध आज थांबणार? कतारचे मध्यस्थीचे प्रयत्न; युद्धबंदीसाठी प्रस्ताव
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Nashik Rural Local Crime Branch arrested burglary and loot gang
हरसूल, त्र्यंबकेश्वर भागात घरफोडी करणारी टोळी ताब्यात
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
Naxal Attack In Chhattisgarh
नक्षलवाद संपवण्याचा अगम्य आशावाद…

हेही वाचा >>>विश्लेषण : विधान परिषदेवरील नियुक्त्या सामाजिक की राजकीय?

इराणवर हल्ल्याची आव्हाने कोणती?

इराण आणि इस्रायलदरम्यानचे किमान अंतर १२०० किलोमीटर इतके आहे. त्यामुळे इराणवर हल्ले करायचे झाल्यास, क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमाने असे दोन पर्याय आहेत. लढाऊ विमाने इराणपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामुख्याने अरब देशांच्या आकाशाचा वापर करावा लागेल, ज्यास हे देश (इराणशी कितीही वैर असले तरी) राजी होणार नाहीत. इराणवर विविध ठिकाणी क्षेपणास्त्रे डागायची असल्यास, इस्रायलला त्यांच्याकडील क्षेपणास्त्र साठा वापरावा लागेल. पण त्या देशाने मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे अण्वस्त्रांसाठी राखून ठेवली आहेत. इस्रायलमधील काही लष्करी अधिकाऱ्यांचा मते, इराणच्या बंदरांना आणि क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य करणे अधिक हितकारक ठरते. तसे केल्यास आधीच डळमळीत झालेली इराणची अर्थव्यवस्था जवळपास मोडकळीस येईल. तसेच, क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून प्रतिहल्ल्याची इराणची क्षमताच राहणार नाही. 

हल्ल्यास विलंब का?

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू हे हल्ल्यासाठी उत्सुक आहेत. हमास आणि हेझबोला खिळखिळे झाल्यामुळे इराणच्या दोन हस्तक संघटनांचा त्रास होणार नाही, असा त्यांचा कयास आहे. पण ही मोहीम अतिशय खर्चिक ठरू शकते. शिवाय इराणने प्रत्युत्तर दिल्यास आणखी एखाद्या क्षेपणास्त्र वर्षावास तोंड देण्यासाठी पुरेशी क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्रे इस्रायलकडे नाहीत. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हमासने दहशतवादी हल्ला केला, त्यानंतर वर्षभरात इस्रायलवर गाझा, लेबनॉन, येमेन, इराण, सीरिया आणि इराकमधून जवळपास २६००० क्षेपणास्त्र, अग्निबाण आणि ड्रोन हल्ले झाले आहेत. त्यांतील जवळ ९० टक्के इस्रायलने नष्ट केले असले, तरी त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या क्षेपणास्त्र बचाव यंत्रणेवर झाला आहे. 

हेही वाचा >>>‘ऑसिफिकेशन चाचणी’ म्हणजे काय? बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील संशयिताची वयचोरी या चाचणीने कशी उघडकीस आली?

अमेरिकेकडून क्षेपणास्त्र बचाव प्रणाली…

इस्रायलची गरज लक्षात घेऊन अमेरिकेने त्या देशाकडे ‘थाड’ नामक क्षेपणास्त्र बचाव प्रणाली आणि तिच्या परिचालनासाठी १०० सैनिक धाडले आहेत. त्यामुळे इस्रायली बचाव अधिक भक्कम झाला हे नक्की. ‘थाड’ ही अत्याधुनिक प्रणाली असली, तरी सर्वोत्तम नाही. पण इस्रायलच्या ताणग्रस्त क्षेपणास्त्र बचाव प्रणालीस तिचा फायदा नक्कीच होईल. अमेरिकेने यापूर्वीही युद्धनौकांवरून डागली जाणारी क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांच्या माध्यमांतून इस्रायलकडे इराण आणि येमेनने पाठवलेल्या क्षेपणास्त्रांचा वेध घेतला आहे. पण थेट इस्रायली भूमीवर सामग्री आणि सैनिक पाठवण्याची अमेरिकेची ७ ऑक्टोबर २०२३नंतरची ही पहिलीच वेळ.

अमेरिकेकडून इस्रायलवर दबाव?

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे इराणवर हल्ला करण्याच्या बाजूने कधीच नव्हते. विशेषतः इस्रायलने इराणच्या तेल प्रकल्पांवर हल्ले करणे आणि त्यातून उद्भवणारे तेलसंकट हे बायडेन यांना अमेरिकी अध्यक्षपद निवडणुकीच्या तोंडावर जोखमीचे वाटले. त्यामुळे नेतान्याहूंनी त्यांच्याकडे विचारणा करूनही, बायडेन यांनी इराणवर हल्ल्याविषयी नापसंतीच व्यक्त केली होती. त्यामुळे एका अर्थी आतापर्यंत तरी इस्रायलला इराणवर हल्ला करण्यापासून आणि त्यातून पश्चिम आशियातील परिस्थिती आणखी चिघळल्यापासून अमेरिकेनेच रोखून धरले आहे. पण दरम्यानच्या काळात इस्रायलवर आणखी क्षेपणास्त्र हल्ले होऊ नयेत आणि त्या देशाची क्षेपणास्त्र बचाव प्रणाली भक्कम असावी या उद्देशाने अमेरिकेने ‘थाड’ यंत्रणा त्या देशात धाडली आणि आपण नेहमीच इस्रायलच्या रक्षणासाठी सिद्ध राहू, हे जगास दाखवून दिले. 

Story img Loader