सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंच पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आता याच पुतळ्यावरून आणखी एक नवा वाद सुरू झाला आहे. कोसळलेल्या पुतळ्याच्या कपाळावरील एका जखमेच्या खुणेने राज्यातील राजकारणी आणि इतिहासकारांकडून संताप व्यक्त केला जात आहे. २५ ऑगस्ट रोजी ३५ फूट उंचीचा पुतळा कोसळल्याने, महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधकांनी बांधकामाचा दर्जा आणि पुतळा तयार करणार्‍या अननुभवी २४ वर्षीय शिल्पकार जयदीप आपटे यांना नियुक्त करण्याच्या निर्णयावर सरकारवर हल्ला चढवला आहे. मात्र, आता आणखी एक वाद निर्माण होत आहे. शिवरायांच्या कपाळाच्या डाव्या बाजूला एक जखमेची खूण दाखवण्यात आल्यावरून या वादाची सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवरायांच्या कपाळावरील ‘ती’ खूण आणि त्यामागील दावे

बहुतेक इतिहासकारांचे सांगणे आहे की, महाराज अशा जखमांची काळजी घ्यायचे. आजवरच्या कोणत्याही शिल्पांमध्ये किंवा चित्रांमध्ये अशी खूण कधीही दाखविण्यात आलेली नाही. कारण ही खूण छत्रपती शिवाजी महाराज परिधान करत असलेल्या जिरेटोपखाली होती. १६५९ मध्ये प्रतापगडच्या लढाईत आदिलशाही घराण्यातील सेनापती अफझलखानचा वध करताना महाराजांना ही जखम झाली असल्याचे सांगण्यात येते. शिल्पकार जयदीप आपटे यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पुतळ्याच्या ‘क्ले मॉडेल’ची काही छायाचित्रे पोस्ट केली होती. त्यांच्या एका सहकाऱ्याने या पुतळ्याची प्रशंसा करत म्हटले होते, “उत्कृष्ट, पुतळ्यावर बारकाईने केलेलं काम प्रशंसनीय आहे, महाराजांच्या कपाळावर खूणही दिसत आहे.”

हेही वाचा : पंतप्रधान मोदींचा सिंगापूर दौरा भारतासाठी कसा ठरेल फायदेशीर? देशातील सेमीकंडक्टर उद्योगासाठी ही भेट किती महत्त्वाची?

कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे अफझल खानचे ब्राह्मण दूत होते. त्यांच्यामुळेच महाराजांना ही जखम झाली, असे अनेक मराठा इतिहासकारांचे मत आहे. मात्र, आपटे यांनी दावा केला की, ही जखम अफझलखानाच्या आघातामुळे झाली होती. “१६५९ मध्ये अफझलखान मोहिमेदरम्यान शिवाजी महाराजांना अफझलखानाच्या तलवारीने डाव्या डोळ्यावर जखम झाली होती. हाच संदर्भ मी इथे वापरला आहे,” असे आपटे म्हणाले. आपटे यांनी शिवरायांच्या पुतळ्यावर जखमेची खूण दाखवण्यावर इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, “शिवाजी महाराजांची शेकडो शिल्पे आहेत आणि हे एकच शिल्प आहे; ज्यात त्यांच्यावर जखमेची खूण दाखवली आहे. त्याने असे का केले ते मला समजत नाही.”

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंच पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहीत)

शिवाजी महाराजांच्या कपाळावर जखम अफझलखानानेच केली, या आपटे यांच्या सिद्धांतावरही सावंत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “लाखो लोकांद्वारे प्रिय असलेल्या ऐतिहासिक व्यक्तींचे चित्रण ऐतिहासिक तथ्यांवर आधारित असले पाहिजे. काही प्रमाणात कलात्मक स्वातंत्र्य स्वीकार्य असले तरी ऐतिहासिकदृष्ट्या चुकीच्या आणि लाखो लोकांच्या भावना दुखावणारे घटक समाविष्ट करणे टाळले पाहिजे,” असे सावंत म्हणाले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची टीका

राष्ट्रवादीचे मराठा राजकारण पाहता, पक्षाच्या नेत्यांनीही आपटे यांनी ही खूण जाणीवपूर्वक दाखवल्याचा आरोप केला आहे. “या शिल्पात छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या वर एक जखम का दाखवली आहे? या मागचा इतिहास काय आहे? हे सर्व मुद्दाम ठरवले होते का? असे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी म्हणाले. आपटे यांनी साकारलेला हा पुतळा शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. “ज्यांनी त्याला पुतळा तयार करण्याची परवानगी दिली, त्यांनी तो पाहिला की नाही हे स्पष्ट नाही. हे सर्व महाराजांच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्यासाठी आहे,” असे आव्हाड म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक शिल्पं

गेल्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचे शेकडो पुतळे वेगवेगळ्या सौंदर्याने उभारले गेले आहेत. शिवरायांचे पहिले शिल्प १८ व्या शतकात तयार केले गेले होते; ज्यामध्ये ते हातात तलवार घेऊन घोडा चालवताना दाखवण्यात आले होते. ग्रॅनाइटवर कोरीव काम इशप्रभू देसाई यांच्या पत्नी बेलवाडी मल्लम्मा यांनी केले होते. शिवाजी महाराजांच्या सैन्याने इशप्रभू देसाई यांना ठार मारले, त्यानंतर मल्लम्मा यांनी महिला सैन्याच्या तुकडीसह महाराजांच्या सैन्याला कडवी झुंज दिली. मल्लम्मा यांचा पराक्रम पाहून महाराज प्रभावित झाले आणि अत्यंत मानसन्मानाने मल्लम्मा यांना त्यांचे राज्य परत दिले. मल्लम्मा यांचा शिवरायांप्रती असलेला आदर वाढला. त्यानंतरच मल्लम्मा यांनी शिवरायांचे एक दगडी शिल्प तयार केले. हा पुतळा आज बेळगावी जिल्ह्यातील यादवाड येथे उभा आहे, असे म्हणतात.

शिवाजी महाराजांच्या सर्वात प्राचीन समकालीन पुतळ्यांपैकी एका पुतळ्याचे १९२८ मध्ये पुण्यातील एका उद्यानात अनावरण करण्यात आले होते. हा परिसर आता श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल (SSPMS) चा भाग आहे. १३.५ फूट उंचीचा हा पुतळा कोल्हापूरचे शासक शाहू महाराज यांच्या आग्रहास्तव चित्रकार विनायक पांडुरंग करमरकर यांनी साकारला. तेव्हापासून महाराजांचे अनेक पुतळे, महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी आहेत. परंतु, ‘Les Voyages aux Indes Orientales’ या नियतकालिकात, शिवाजी महाराजांचे सर्वात जुने वर्णन उपलब्ध आहे. फ्रेंच संशोधक आणि भाषाशास्त्रज्ञ जीन डी थेव्हनॉट यांनी महाराजांचे वर्णन केले आहे, “राजा लहान आणि त्यांचा रंग तपकिरी आहे, चटकदार डोळे आहे; ज्यात भरभरून चैतन्य आहे.” त्यांना भेटलेल्या लोकांनी महाराजांच्या केलेल्या वर्णनाच्या आधारावर त्यांनी हे लिहिले होते.

इतिहासकारांचे म्हणणे आहे की, त्यांचे पुतळे तयार होण्यापूर्वी, १७ व्या आणि १८ व्या शतकात काढलेले सुमारे २२ लघुचित्रे आहेत. शिवाजी महाराजांच्या समकालीनांनी काढलेली यातील सहा लघुचित्रे सध्या जगाच्या विविध भागांत आहेत; ज्यात ॲमस्टरडॅममधील रिक्सम्युझियम, लंडनमधील ब्रिटीश म्युझियम, पॅरिसमधील लुव्रे आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय यांचा समावेश आहे. यातील कोणत्याही लघुचित्रात जखमेची खूण नाही.

जातीय तणाव

शिवाजी महाराजांच्या जखमेच्या खुणेवरील वादाने महाराष्ट्रात सध्या जात संबंधित तणाव वाढत असल्याचे चित्र आहे. शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांसह सर्व प्रजेच्या कल्याणासाठी समर्पित धर्मनिरपेक्ष सम्राट म्हणून चित्रित केले गेले आहे, तर हिंदू त्यांना एक कट्टर हिंदू राजा म्हणून चित्रित करतात; ज्यांनी ब्राह्मणांचे संरक्षण करण्यासाठी मुस्लिमांविरुद्ध लढा दिला. यातून १७ व्या-१८ व्या शतकातील ब्राह्मण-मराठा कलहाकडे लक्ष वेधले जाते. ब्राह्मण आणि मराठे यांच्यातील संघर्ष शिवरायांच्या उदयापासून सुरू झाला आणि त्यानंतरच्या मराठा राज्यकर्त्यांद्वारे सुरू राहिला.

हेही वाचा : मोबाइल फोनमुळे वाढतोय ब्रेन कॅन्सरचा धोका? ‘डब्ल्यूएचओ’च्या अभ्यासातून सत्य समोर

‘शिवाजी : हिज लाइफ अँड टाइम्स’ या पुस्तकात इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी दावा केला आहे की, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे प्रतापगडच्या लढाईत मारले गेले; ज्यात शिवाजी महाराजांना जखम झाली. काही ऐतिहासिक नोंदी असा दावा करतात की, शिवाजी महाराजांनी कुलकर्णी यांना धक्का दिला होता, तर इतरांचा असा दावा आहे की, त्यासाठी शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जबाबदार होते.