रेश्मा भुजबळ

सध्या जगभरात अनेक ठिकाणी पालकांच्या अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांसाठी जीवघेणे ठरतेय. मात्र, या स्पर्धेचे परिणाम शिक्षकांवरही होऊ लागले आहेत. एकीकडे मुलांना स्पर्धेसाठी तयार करताना त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्यास शिक्षकांवरच बाल शोषणाचा आरोप करत धारेवर धरले जात असून त्यांचेही मानसिक खच्चीकरण केले जात आहे. ही स्थिती आहे दक्षिण कोरियातील. दक्षिण कोरियामधील शाळांतील हजारो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सोलमध्ये पालकांकडून दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीविरोधात कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी नुकतीच रॅली काढत, निदर्शने केली. काय आहे तेथील स्थिती आणि शिक्षकांचे म्हणणे…

NEET coaching centre assault | Teacher Beat Student Viral Video
कोचिंग सेंटर आहे की टॉर्चर सेंटर? शिक्षकाने काठी घेऊन विद्यार्थ्यांबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
40 students beaten up in municipal school in Sangli news
सांगलीत महापालिका शाळेत तब्बल ४० विद्यार्थ्यांना मारहाण, शिक्षिका निलंबित
Hilarious School Days Video: students were dancing when teacher looked back watch what happen
याला म्हणतात शिक्षकांचा दरारा! बेधुंद होऊन नाचत होते विद्यार्थी, सरांनी मागे वळून पाहताच… Video एकदा पाहाच
education department advises ensuring no student or teacher is falsely registered on U DICE
शाळांना सुविधा हव्यात नां? मग ‘हे’ करावेच लागेल…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : सतत प्रसिद्धी हवी कशाला?
Yogendra Yadav talk on Vanchits uproar says This is an attack on Babasahebs constitution
वंचितच्या गोंधळानंतर योगेंद्र यादव म्हणाले “हा तर बाबासाहेबांच्या संविधानावर हल्ला”
school buses
पिंपरी : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसवर कारवाईचा दंडुका

दक्षिण कोरियातील शिक्षण पद्धती कशी आहे?

दक्षिण कोरियाची शिक्षण पद्धती अतिताण आणि अति-स्पर्धात्मकतेसाठी ओळखली जाते. स्थिर आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी चांगल्या मानांकन आणि प्रतिष्ठित विद्यापीठाच्या पदव्या महत्त्वाच्या मानल्या जातात. परिणामी, विद्यार्थ्यांची ऊर्जा ही या विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांसाठी खर्च होते. यात अतिशय खडतर अभ्यास आणि अतिरिक्त शिकवणीसाठी खासगी अकादमींमध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. अतिशयोक्ती ठरेल मात्र, तेथे परीक्षा काळात ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अवजड वाहतुकीबरोबरच विमान उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. एवढ्या मोठ्या अपेक्षांच्या दबावाखाली काहीजण बेशिस्त वर्तन करायला लागतात तर काही प्रकरणांमध्ये अनेक जण आत्महत्या करतात.

आणखी वाचा-अँट्रिक्स-देवास करार हा इस्रोसाठी कटू इतिहास का आहे?

शैक्षणिक ताणाचा परिणाम मुलांवर आणि शिक्षकांवर कसा होतोय?

दक्षिण कोरियातील शिक्षण मंत्रालय आणि नॅशनल हेल्थ इन्शुरन्स सर्व्हिसने गेल्या आठवड्यात उदारमतवादी विरोधी लोकप्रतिनिधी किम वोनी यांना दिलेल्या आकडेवारीनुसार २०१८ ते २०२२ दरम्यान ८२० हून अधिक प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे. तर आंदोलनकर्त्या शिक्षकांनी सांगितले की, गेल्या आठ वर्षांत ९००० हून अधिक शिक्षकांवर पालकांनी बाल शोषणाची तक्रार नोंदवली आहे.

शिक्षकांचे म्हणणे काय?

पालक आणि विद्यार्थी या दोघांकडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. सध्या प्रत्येक कुटुंबांमध्ये एक किंवा दोनच मुले असतात. पालक पाल्यकेंद्रित जीवन जगतात. मुलांवरून स्वत:ची ओळख ठरवू पाहतात. यामुळे त्यांच्या मुलांवर शिक्षकांकडून करण्यात आलेली टीका-टिप्पणी स्वीकारणे त्यांना कठीण होते. टीकेला ते थेट अपमान म्हणून पाहतात. शिक्षकांनी मुलांना शिस्त, वळण लावण्याचा प्रयत्न केल्यास पालक त्यासाठी शिक्षकांना माफी मागण्यास सांगतात. त्यासाठी अनेकदा पालक रात्री-अपरात्रीही दूरध्वनी करण्यास मागे पुढे पाहात नाहीत. पालकांना अथवा मुलांना एखादा शिस्तप्रिय शिक्षक आवडत नसेल, तर ते बाल शोषण कायद्यांतर्गत तक्रारी दाखल करतात किंवा नवीन शिक्षकाची मागणी करून शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करतात. पालकांनी अशी परिस्थिती निर्माण केल्यामुळे अनेक शिक्षक मुलांना शिस्त लावण्याचे टाळत आहेत. याचा परिणाम इतर मुलांवरही होतो ज्यामुळे शाळेचे वातावरण विस्कळीत होते. ही समस्या अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित आहे, आमचे सगळेच अधिकार काढून घेतले आहेत, असे तेथील शिक्षकांचे म्हणणे आहे.

कोरियन सरकारची भूमिका काय?

पालकांकडून होणाऱ्या मानसिक खच्चीकरणामुळे जुलै २०२२ मध्ये एका तरुण शिक्षिकेने आत्महत्या केली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सध्या दक्षिण कोरियात सुरू असलेली शिक्षकांची आंदोलने अधिक तीव्र झाली. शिक्षकांच्या वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर, दक्षिण कोरियाच्या पुराणमतवादी सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला नवीन शिक्षण-संबंधित कायदे करण्यासाठी एका कृती दलाची स्थापना केली आहे. हे कृती दल बाल शोषणाच्या आरोपांपासून शिक्षकांचे संरक्षण करण्यासाठी शिक्षकांची मते विचारात घेईल.

आणखी वाचा-हरदीप सिंग निज्जर कोण होता? खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरून कॅनडाने भारतावर आरोप का केले?

सरकारचा प्रतिसाद काय?

शिक्षकांशी गैरवर्तन करणाऱ्या पालकांपासून संरक्षण देण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने एक नवीन तक्रार प्रतिसाद प्रणाली सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. जेथे पालकांना तक्रारींबाबत शिक्षकांशी थेट संपर्क साधण्यास मनाई करण्यात येईल. तसेच जे पालक शिक्षकांना दूरध्वनी करतील त्यांचे संभाषण रेकॉर्ड केले केले जाईल. कोरियन फेडरेशन ऑफ टीचर्स युनियनने सरकारी प्रयत्नांचे स्वागत केले आहे. तसेच त्वरित संबंधित कायदा संमत करण्याचे आवाहन तेथील लोकप्रतिनिधींना करण्यात आले आहे.