ताजी झड कशामुळे?

रिझर्व्ह बँकेने कसोशीने सुरू ठेवलेल्या प्रयत्नांपायी रुपया प्रति डॉलर ८४ ची पातळी गेले दोन महिने राखून होता. सप्टेंबरमध्ये अनेकदा तो ८३.९८-९९ पर्यंत घरंगळताना दिसला. पण रिझर्व्ह बँकेने तिच्या गंगाजळीतील डॉलर खुले केले की, रुपयाचे मूल्य सावरत असल्याचे दिसत असे. परंतु ११ ऑक्टोबरच्या शुक्रवारी डॉलरमागे ८४.१० नीचांकापर्यंत झालेली रुपयाची घसरगुंडी रिझर्व्ह बँकेला रोखता आली नाही. खनिज तेलाच्या वाढलेल्या आंतरराष्ट्रीय किमती, परदेशी गुंतवणूकदारांची देशाच्या भांडवली बाजारातून तीव्रतेने सुरू असलेली माघार यातून डॉलरची मागणी प्रचंड वाढली. चलन बाजारातील व्यवहारही मागणी-पुरवठ्यावरच बेतलेले असतात. ज्या चलनाला मागणी अधिक त्याचे मूल्यही स्वाभाविकच मोठे ठरते. स्थानिक चलन बाजारात डॉलरची मागणी इतकी मोठी की खुद्द रिझर्व्ह बँकेनेच पुरवठ्याची बाजू सांभाळत सुरू ठेवलेला हस्तक्षेपही रुपयातील पडझड रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकला नाही.

ही पडझड गतवर्षापासूनचीच?

रुपया हे अलीकडे सर्वात वाईट कामगिरी असणारे आशियाई चलन ठरले आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया-युक्रेन संघर्षामुळे महत्त्वाच्या जागतिक जिनसांच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या; त्याचा ताण म्हणून रुपयाचे मूल्य पडू लागले. सातत्याने सुरू राहिलेल्या या अवमूल्यनाने १४ जुलै २०२२ रोजी पहिल्यांदा डॉलरने ८०ची पातळी ओलांडली. २०२२ पासून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७४.४६ पातळीवरून सध्याच्या ८४.१० पर्यंत अशी त्याच्या घसरणीची सुमारे बारा टक्क्यांची व्याप्ती राहिली आहे. मध्यंतरी एप्रिल २०२३ पासून विदेशी गुंतवणूकदारांचा भांडवली बाजारात राबता वाढल्याने रुपयाचे मूल्य सावरताना दिसले. परंतु ही गुंतवणूक माघारी जाऊ लागली तसे रुपयानेही विक्रमी तळाला गाठले. युद्ध व रुपयाचा प्रत्यक्ष संबंध नसला तरी, इस्रायल-हमास-इराण युद्ध भडकल्यास भारतातआयात होणाऱ्या खनिज तेलाच्या किमतीही भडकतील, ज्यास सुरुवातदेखील झाली आहे. शिवाय संघर्षाची ठिणगी उडाल्याच्या केवळ वृत्तासरशी, भयभीत देशी-विदेशी गुंतवणूकदारांमध्ये शेअर बाजारासारख्या जोखीमयुक्त गुंतवणुकीतून बाहेर पडण्यासाठी पळापळ सुरू आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून सुमारे ५९ हजार कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून काढून घेतले. यातील बहुतांश गुंतवणूक चिनी बाजाराकडे वळली आहे.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू

हेही वाचा >>>विश्लेषण : पुन्हा लॉरेन्स बिष्णोई! आमदार बाबा सिद्दिकी हत्येमागेही हात? तुरुंगात राहूनही सूत्रे कशी हलवतो?

राजकीय कथन आणि वास्तव?

बाजारगप्पा फुलवण्याचे लाघव विद्यामान सरकारातील म्होरक्यांकडे भरपूर आहे. त्यातून भांडवली बाजाराच्या तेजीच्या बैलाने अत्युच्च पातळीला ढुसण्या दिल्याचे दिसलेही. पण पोकळ बाजारगप्पा खुलवल्या तरी त्यातून अर्थव्यवस्थेची पत आणि प्रत्यक्षात रुपयाची किंमत आपोआप वाढत जाणे शक्यच नाही. मुळात हीच मंडळी विरोधी पक्षात असताना, ‘रुपया पडतोच कसा? पंतप्रधानच (तत्कालीन) जेथे दुबळा, तर त्याचे प्रतिबिंब रुपयाच्या दुबळेपणात उमटणारच’ इतपत पातळी सोडून टीकेची झोड सुरू होती. २०१४ च्या मे महिन्याच्या सुरुवातीला असलेली प्रति डॉलर ६०.३० पातळी आणि त्या तुलनेत यंदाची १० ऑक्टोबरची ८४.१० पातळी म्हणजे तब्बल २४ रुपयांनी (सुमारे २८ टक्के) रुपया घसरला आहे.

हेही वाचा >>>ब्लड प्रेशर तपासताना हात कसा ठेवावा? बीपी तपासण्याची योग्य पद्धत काय?

रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नांचे काय?

रिझर्व्ह बँकेने आंतरराष्ट्रीय व्यापाराचा निपटारा करण्यासाठी चलन म्हणून रुपयाच्या वापराला जुलै २०२३ पासून सुरुवात केली. पण त्या अंगाने भरीव असे अद्याप तरी काही घडलेले नाही. रशियाकडून तेल आयातीसाठी रुपया काही महिन्यांसाठी चालू शकला. तो फायदाही आता लुप्त झाला आहे. पडझड रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने कंपन्यांसाठी परदेशातून कर्ज घेण्याच्या मर्यादेत वाढ, अनिवासी भारतीयांच्या परकीय चलनातील ठेवींवर आकर्षक व्याज देण्यासाठी बँकांना मोकळीक वगैरे इतर उपायही केले. शिवाय, रोखे बाजारातील विदेशी गुंतवणुकीचे नियम सुलभ केल्याने डॉलरचा ओघ वाढला खरा, पण आता त्याच गतीने त्याचे निर्गमनही सुरू आहे. रिझर्व्ह बँकेची परकीय चलन गंगाजळी फुगून ७०२ अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली. ही कामगिरीही रुपयाचे ढेपाळणे रोखू शकलेली नाही.

झड कुठवर सुरू राहील?

खनिज तेलाच्या किमतींसंबंधाने अनिश्चितता व डॉलर निर्देशांकातील चढ-उतार यामुळे रुपयाचे मूल्य डळमळतेच राहील, असा विश्लेषकांचा होरा आहे. तांत्रिक अदमासानुसार, रुपया ८४.२५ ते ८४.३५ पर्यंत अल्पावधीतच जाऊ शकतो. ‘याला रुपयातील घसरण म्हणण्यापेक्षा अमेरिकी डॉलरने कमावलेली मजबुती म्हणायला हवे,’ असेही विश्लेषकांचे म्हणणे आहे. काहीही म्हटले तरी याचा देशाच्या अर्थव्यवस्थेसह, सामान्यजनांच्या खिशालाही फटका अपरिहार्य आहे.

Story img Loader