ताजी झड कशामुळे?
रिझर्व्ह बँकेने कसोशीने सुरू ठेवलेल्या प्रयत्नांपायी रुपया प्रति डॉलर ८४ ची पातळी गेले दोन महिने राखून होता. सप्टेंबरमध्ये अनेकदा तो ८३.९८-९९ पर्यंत घरंगळताना दिसला. पण रिझर्व्ह बँकेने तिच्या गंगाजळीतील डॉलर खुले केले की, रुपयाचे मूल्य सावरत असल्याचे दिसत असे. परंतु ११ ऑक्टोबरच्या शुक्रवारी डॉलरमागे ८४.१० नीचांकापर्यंत झालेली रुपयाची घसरगुंडी रिझर्व्ह बँकेला रोखता आली नाही. खनिज तेलाच्या वाढलेल्या आंतरराष्ट्रीय किमती, परदेशी गुंतवणूकदारांची देशाच्या भांडवली बाजारातून तीव्रतेने सुरू असलेली माघार यातून डॉलरची मागणी प्रचंड वाढली. चलन बाजारातील व्यवहारही मागणी-पुरवठ्यावरच बेतलेले असतात. ज्या चलनाला मागणी अधिक त्याचे मूल्यही स्वाभाविकच मोठे ठरते. स्थानिक चलन बाजारात डॉलरची मागणी इतकी मोठी की खुद्द रिझर्व्ह बँकेनेच पुरवठ्याची बाजू सांभाळत सुरू ठेवलेला हस्तक्षेपही रुपयातील पडझड रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा