मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये झालेल्या बिघाडामुळे शुक्रवारी भारतासह जगभरातील अनेक संगणकाधारित व्यवहार ठप्प झाले. विमान सेवा, शेअर बाजार, वित्तीय संस्था, बँका, प्रसारमाध्यमे यांसह अनेक देशांतील आरोग्ययंत्रणांना या बिघाडाची मोठी झळ बसली. हा गोंधळ नेमका कसा आणि का झाला तसेच याचे काय परिणाम झाले हे सांगतानाच, अशा धोक्यांची शक्यता का वाढली, हे सांगण्याचा हा प्रयत्न.

नेमके काय घडले?

भारतीय वेळेनुसार, शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास, जगभरातील बँका, विमान वाहतूक सेवांच्या व्यवहारांमध्ये अडथळे येऊ लागले. ‘ऑफिस ३६५’ हे मायक्रोसॉफ्टचे ऑफिस सॉफ्टवेअर काम करेनासे झाले. तसेच मायक्रोसॉफ्टची विंडोज कार्यप्रणालीच क्रॅश होऊन ‘एरर स्क्रीन’ दिसू लागली. विंडोज १० आणि त्यापेक्षा अद्ययावत विंडोज कार्यप्रणाली वापरणाऱ्या संगणकांवर इंटरनेटशी संलग्न राहून काम करणारे ‘ऑफिस ३६५’ चालेनासे झाल्याने त्यावर अवलंबून असलेले सर्वच क्षेत्रांतील व्यवहार ठप्प झाले.

speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
Satara , development work Satara, code of conduct Satara, Satara latest news,
आचारसंहिता संपल्याने साताऱ्यात दीडशे कोटींच्या विकासकामांना प्रारंभ
Digital Arrest is biggest crisis of future and police department and banks should show seriousness now
‘डिजीटल अरेस्ट’ हे भविष्यातील सर्वात मोठे संकट
MuleHunter.AI rbi
आता सायबर फ्रॉडचा धोका टळणार; काय आहे ‘आरबीआय’चे ‘MuleHunter.AI’? ते कसे कार्य करणार?
anti sabotage check rajyasabha
घातपात रोखण्यासाठीच्या चाचणीदरम्यान काँग्रेस खासदाराच्या बाकावर सापडलं नोटांचं बंडल; काय असते ही चाचणी?
Indian scientist Mahesh Galgalikar
भारतीय शास्त्रज्ञाचे अमेरिकन संरक्षण विभागाला अनोखे आरोग्य कवच!

हेही वाचा – विश्लेषण : पावसाळ्यात कोकण रेल्वे पुन्हा बेभरवशाची का ठरली?

बिघाडाचा परिणाम काय झाला?

इंटरनेटच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या ‘ऑफिस ३६५’मधून बहुतेक क्षेत्रांतील कार्यालयीन व्यवहार चालतात. ही यंत्रणा कोलमडून पडल्यामुळे अमेरिकेपासून भारतापर्यंत अनेक देशांतील कामकाज विस्कळीत झाले. याचा सर्वाधिक परिणाम विमान वाहतूक क्षेत्रावर झाला. प्रवाशांच्या तिकिटांचे तपशील, आसनव्यवस्थेच्या नोंदी, विमानांच्या उड्डाणांची माहिती यासाठी हे क्षेत्र मायक्रोसॉफ्टच्या विंडोज प्रणालीवर अवलंबून असते. मात्र, ‘विंडोज’ क्रॅश झाल्यामुळे संगणकाचा आणि त्यावरील माहितीचा वापर करणे अशक्य झाले. याचा प्रभाव जगभरातील विमानसेवेवर झाला आणि अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. त्याचप्रमाणे लंडन स्टॉक एक्स्चेंजसह अन्य काही भांडवली बाजारांतील व्यवहारही विस्कळीत झाले. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिकेतील अनेक प्रांतांतील बँकिंग व्यवहारांनाही याची झळ बसली तर, या देशांतील वृत्तवाहिन्याही शुक्रवारी बंद पडल्या.

बिघाडामागे काय कारण?

मायक्रोसॉफ्टची अँटीव्हायरस यंत्रणा आणि क्लाऊड सेवा यांच्यात प्रामुख्याने हा बिघाड दिसून आला. या बिघाडाचा स्रोत अमेरिकेतील सायबर सुरक्षा कंपनी असलेल्या क्राऊडस्ट्राइकचे ‘ईडीआर’ सॉफ्टवेअर होते. क्राऊडस्ट्राइक ही कंपनी सायबर सुरक्षा उत्पादने वा सॉफ्टवेअर पुरवते. विंडोज वापरकर्त्याच्या संगणकावर होणाऱ्या सायबर हल्ल्यांपासून रक्षण करण्याचे काम करणाऱ्या क्राऊडस्ट्राइकच्या ‘फाल्कन सेन्सर’ सॉफ्टवेअरच्या एका अपडेटमध्ये दोष निर्माण झाल्यानंतर विंडोज कार्यप्रणाली क्रॅश झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘ईडीआर’ सॉफ्टवेअर म्हणजे काय?

‘एन्डपॉइंट डिटेक्शन ॲण्ड रिस्पॉन्स’ अर्थात ‘ईडीआर’ हे सायबर सुरक्षेतील महत्त्वाचे साधन आहे. हे सॉफ्टवेअर वापरकर्त्यांचे संगणक हॅकरपासून सुरक्षित ठेवते. हे सॉफ्टवेअर वापरकर्त्यांच्या संगणकात पडद्यामागे (बॅकग्राऊंड) कार्यरत राहून त्यावर होऊ घातलेल्या हल्ल्यांवर लक्ष ठेवते. या सॉफ्टवेअरमध्येच शुक्रवारी बिघाड झाल्याने विंडोज प्रणाली कोलमडली. सर्वच संगणकांची स्क्रीन निळ्या रंगाने व्यापून गेली. त्यापलीकडे त्यावर काहीही करणे अशक्य झाले. संगणकाचा इंटरनेटशी संबंध तुटल्याने हा दोष प्रत्येक संगणकावर जाऊन दुरुस्त करणे, हा एकमेव उपाय उरला.

बिघाड सर्वच संगणकांत?

‘क्राऊडस्ट्राइक’ची सायबर सुरक्षा सेवा असलेल्या संगणकांत प्रामुख्याने शुक्रवारी बिघाड निर्माण झाला. मात्र, ‘क्राऊडस्ट्राइक’ ही या क्षेत्रातील नामांकित कंपनी असून अमेरिकेतील ‘फॉर्च्यून ५००’ यादीत समाविष्ट असलेल्या बड्या कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्या ‘क्राऊडस्ट्राइक’च्या ग्राहक आहेत. या कंपन्यांशी संलग्न असलेल्या कोट्यवधी संगणकांवर शुक्रवारी या बिघाडाचा परिणाम दिसला. ‘लिनक्स’ आणि ‘मॅक’ कार्यप्रणलीवर चालणाऱ्या संगणकांमध्ये बिघाड जाणवला नसल्याचेही दिसून आले.

हेही वाचा – Microsoft outage जगाचे व्यवहार ठप्प करणारा मायक्रोसॉफ्टच्या सेवांमधील बिघाड (आउटेज) नेमका कशामुळे?

यावर उपाय काय?

बिघाड लक्षात आल्यानंतर मायक्रोसॉफ्टने त्यावर तातडीने काम सुरू केले तर क्राऊडस्ट्राइकनेही आपल्या वापरकर्त्यांना दुरुस्तीसाठीच्या सूचना दिल्या. त्यामध्ये संगणक पुन्हा चालू करणे, सेफ मोडमध्ये जाऊन अपडेटमधील विशिष्ट फाइल हटवणे इत्यादी सूचना करण्यात आल्या आहेत.

इतका मोठा फटका बसण्याचे कारण?

शुक्रवारच्या घटनेने सायबर सुरक्षा आणि क्लाऊड तंत्रज्ञानावर चालणाऱ्या सेवा यांच्याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. संगणकाच्या स्टोअरेजसाठीचा खर्च वाचवण्यासाठी तसेच सर्व संगणकीय यंत्रणांमध्ये सुसूत्रता आणि समन्वय आणण्यासाठी सर्वच कंपन्या क्लाऊडआधारित सेवांचा वापर करू लागल्या आहेत. शुक्रवारच्या बिघाडामुळे त्या सर्वांनाच फटका बसला.

Story img Loader