यादव तरटे पाटील

पर्यावरण संतुलनासाठी जंगले अतिशय महत्त्वाची आहेत. ती टिकवण्यासाठी वाघ महत्त्वाचा आहे. तसेच एकूण किती संख्येने व प्रति चौरस किलोमीटर वाघांची घनता असावी यासाठी आकडेवारी महत्त्वाची आहे. त्यामुळे त्याच्या जन्मदराची जशी नोंद ठेवली जाते, तशीच नोंद त्याच्या मृत्यूदराची देखील असायला हवी. मात्र, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि वाईल्डलाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया यांच्याकडे वाघांच्या मृत्यूविषयी वेगवेगळी आकडेवारी उपलब्ध आहे. यातून संभ्रम निर्माण झाला आहे.

loksatta Analysis Tiger body part Trafficking in marathi
वाघनखे, हाडे, रक्त, चरबी, जननेंद्रिये… वाघांच्या अवयवांची तस्करी का होते? कथित फायदे कोणते? अंदाजे किंमत किती?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
rising mortality rates in young adults post-corona in america
करोनानंतर अमेरिकेत तरुणांच्या मृत्यूदरात वाढ
vasai virar, dead animals
वसई विरार मध्ये मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीसाठी दफनभूमी, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्तावास मंजुरी
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…
Which animals are banned in India
भारतात ‘हे’ २० प्राणी पाळण्यावर बंदी; घरात आढळल्यास होऊ शकते कारवाई
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?

वाघांच्या मृत्यूंची आकडेवारी व कारणमीमांसा महत्त्वाची का?

वाघांच्या मृत्यूची अचूक आकडेवारी नोंदवणे व ती सांभाळणे तसेच त्याची कारणमीमांसा वनखात्याने करणे अभिप्रेत आहे. विजेच्या धक्क्याने होणारे मृत्यू व नैसर्गिक मृत्यू आदींचा स्वयंस्पष्ट आलेख जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे. त्यामुळे सत्य आणि वास्तव जनसामान्यांसमोर येईल. वाघांचा मृत्यू कशामुळे, मृत्यूची वारंवारिता किती व कशी, मृत्यूचा आलेख चढता की उतरता, यातून कारणांची वारंवारिता आणि सांख्यिकीय निर्देशांकाच्या वस्तुस्थितीचे ज्ञान होते. या सर्व बाबींचा उपयोग व्याघ्रसंवर्धन, त्यांची ध्येयधोरणे ठरवणे, योजनांची आखणी व नियोजनासाठी होतो.

या आकडेवारीबाबत उदासीनता का?

सामान्य माणूस जागरूक नाही व राजकीयदृष्ट्यासुद्धा हा विषय महत्त्वाचा नाही. वनखात्याव्यतिरिक्त इतर व्यासपीठावर त्याचा नियमित आढावा घेतला जात नाही. संशोधक वृत्ती व भविष्यातील नियोजनसाठी याची गरज भासू शकते या मानसिकतेचा अभाव कायम असतो. माणसाच्या मृत्यूबाबत संवेदनशील असताना, ज्या वाघांच्या भरवशावर आपला प्राणवायू, पाणी व अन्न आहे, त्याबाबत आपण गंभीर नाही. त्यामुळे वाघांच्या मृत्यूच्या नोंदीमध्ये तफावत दिसून येते. बरेचदा स्थानिक पातळीवरची माहिती वेळेत व नियमित वरिष्ठ कार्यालयाला पाठवली जात नाही. त्याचा नियमित पाठपुरावा होत नसल्याने आकडेवारीत तफावत आढळून येते.

हेही वाचा : विश्लेषण : ‘अबकी बार चारसौ पार’!.. पण भाजप इतक्या जागा निवडून आणणार कशा? कुठून?

राजकीय पटलावर या विषयाचे गांभीर्य का नाही?

वाघांच्या मृत्यूमुळे कुणाचे काही अडत नसावे. मतदान व निवडणुका याभोवती केंद्रित असलेला विचार याला कारणीभूत असावा. मानव प्रजातीच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक वन्यजीव व पर्यावरण संवर्धन होणे आवश्यक आहे. हा विचार कोणत्याही जाहीरनाम्यात नसतो. वन्यप्राणी व पर्यावरणापासून कुणाचे अडत नाही. वाघांना मतदानाचा अधिकार असता, तर मात्र चित्र वेगळे असते. मानवकेंद्री व्यवस्थेत सर्व सांख्यिकीय माहिती व आकडेवारी महत्त्वाची आहे. तोच न्याय वाघ व वन्यप्राण्यांबाबत का दिला जात नाही, हादेखील एक प्रश्न आहे.

संदर्भ म्हणून सांख्यिकीय वारसा जपण्यात अपयश..?

वाघांच्या मृत्यूची गांभीर्याने नोंद करायला हवी, हे अजूनही कुणी लक्षात घेत नाही. मृत्यूच्या आकडेवारीचा, मृत्यूच्या कारणांचा नियमित गांभीर्याने आढावा घेतला जात नाही. दारिद्र्य, मूलभूत सोयीचा अभाव, मानवी हक्क आदीच्या पसाऱ्यात याचा फारसा कुणी विचार करत नाही. यासंदर्भात ध्येयधोरणे ठरवणाऱ्यांना तशी आवश्यकता वाटत नाही. वन्यजीवप्रेमी व यातील स्वयंसेवी संस्था यासाठी आग्रही नाही, ही खेदाची बाब आहे. त्यामुळे संदर्भ म्हणून आपण हा सांख्यिकीय वारसा जपण्यात अपयशी तर ठरत नाही ना, अशीही दाट शंका येते.

हेही वाचा : सुवर्णपदक धावपटू ऑस्कर पिस्टोरियसला पॅरोल मंजूर, तुरुंगाबाहेर येण्यासाठी नेमक्या कोणत्या अटी?

मृत्यूच्या आकडेवारीचा पाया महत्त्वाचा का?

ध्येयधोरणे आखणे, उपाययोजना सुचवून त्याची अंमलबजावणी करणे, कायदा, नियम व शासकीय अध्यादेश आदींसाठी वाघांच्या मृत्यूच्या आकडेवारीचा पाया महत्त्वाचा आहे. अचूक आकडेवारीतून व्याघ्रसंवर्धन व संरक्षण व्यापक करता येईल. भूतकाळात काय परिस्थिती होती आणि त्यात काही चुका असतील तर त्यांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपाययोजना करणे, व्याघ्रसंवर्धन व संरक्षणासाठी आर्थिक तरतूद करणे, कायदेविषयक व धोरणात्मक उपाययोजना आखणे, कृती आराखडा तयार करणे आदी महत्त्वांच्या बाबींसाठी आकडेवारी हा मुख्य कणा असतो.

हेही वाचा : विश्लेषण : जीवघेण्या नायलाॅन मांजावरील बंदी ‘हवेत’च? मानव, पशु-पक्ष्यांसाठी तो धोकादायक का ठरतो?

ब्रिटिशांनी कशी ठेवली होती नोंद?

ब्रिटिशकाळातील गॅझेटियर किंवा संबंधित संदर्भ चाळले तर त्यात इत्थंभूत आकडेवारी आजही आढळते. १८५७ साली इंग्लंडमध्ये जन्मलेल्या कार्ल पियर्सन यांच्या संकल्पनेचा कित्ता गिरवत ब्रिटिशांनी त्यांच्या राजवटीत अनेक सांख्यिकीय माहितीचे कोश तयार केलेत. यवतमाळ जिल्ह्यात १८६८ मध्ये पाच माणसांचा बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूची नोंद, १९०९ मध्ये बुलढाणा जिल्ह्यात ३७२ बिबटे, ३३० लांडगे, ११७ रानकुत्रे, १३ तरस, सहा अस्वले व १२ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आजही आढळते.यासाठी त्यांनी १५१ रुपये मोबदला म्हणून दिल्याचीही नोंद आहे. ज्यावेळी संदेशवहन व प्रभावी माध्यमे उपलब्ध नव्हती, त्या काळात अशी आकडेवारी व सांख्यिकीय माहिती ब्रिटिशांनी दफ्तरी ठेवण्याचे सर्वांना बंधनकारक केले होते.

लेखक राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य आहेत.

संपर्क – ९७३०९००५००

Mail Id – yadavtarte@gmail.com

वेबसाईट : http://www.yadavtartepatil.com

Story img Loader