‘मी मुंबई सोडणार आहे… बॉलिवुडमध्ये चित्रपट करण्यातला आनंद निघून गेला आहे’… दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या या एका विधानाने कधी नव्हे ते हिंदी चित्रपटसृष्टीत चर्चा सुरू झाली आहे. २०२३ मध्ये अनुराग कश्यपचा ‘ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहोब्बत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, जो चित्रपटगृहातून आर्थिक कमाई करण्यात अपयशी ठरला. त्यानंतर त्याच वर्षी त्याने अभिनेत्री सनी लिऑनला घेऊन केलेल्या ‘केनेडी’ या चित्रपटाचा प्रीमिअर कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून नावाजलेल्या ‘केनेडी’ला गेल्या वर्षभरात मायदेशात चित्रपट प्रदर्शनाचा मुहूर्त साधता आला नाही. मुख्य प्रवाहातील व्यावसायिक चित्रपटांच्या चौकटीबाहेरचे विषय आणि कलाकारांना घेऊन चित्रपट केल्यास त्यांना निर्माता मिळवणं आणि चित्रपट तयार झालाच तर वितरक-प्रदर्शक मिळणं अवघड होतं. ‘केनेडी’च नव्हे तर अनुरागचे आणखी चार ते पाच चित्रपट अशाच पद्धतीने अडकून पडले आहेत. प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून ओळखल्या गेलेल्या अनुराग कश्यपसारख्या प्रतिभावंत कलाकाराला कारकिर्दीच्या या टप्प्यावर चित्रपट प्रदर्शनासाठी करावा लागलेला संघर्ष अस्वस्थ न करता तरच नवल ! अखेर त्याच्या मनातली ही खदखद ‘द हॉलिवुड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखती दरम्यान बाहेर पडली आणि त्याने बॉलिवुड सोडून दक्षिणेत जाणार असल्याचे संकेत दिले.

अनुरागचे म्हणणे काय?

गेले वर्षभर बॉलिवुडमध्ये चित्रपटनिर्मितीच्या अवाढव्य खर्चाबाबत खुद्द निर्मात्यांकडूनच सातत्याने चिंता व्यक्त केली गेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रपट निर्मितीचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या ‘धर्मा प्रॉडक्शन’चा सर्वेसर्वा करण जोहरही याला अपवाद राहिलेला नाही. बॉलिवुडमध्ये सध्या आघाडीच्या फळीतील कलाकार म्हणून गणल्या जाणाऱ्यांनी आपल्या अवाजवी मानधनाच्या मागणीचा फेरविचार करायला हवा, असे करणने कित्येकदा जाहीर कार्यक्रमातून म्हटले आहे. चित्रपट निर्मितीचा खर्च आणि चित्रपटगृहातून कमाई यांचा ताळमेळ घालणे अवघड होऊन बसले आहे आणि स्वत:ला लोकप्रिय म्हणवले जाणारे कलाकार आर्थिक अपयशाची जबाबदारी घ्यायला तयार होत नाहीत, हे करण आणि अन्य एकल निर्मात्यांचे म्हणणे आहे. स्वत: निर्माता-दिग्दर्शक असलेल्या करण जोहरसारख्यांनी चित्रपट निर्मितीतील या अडचणींचा पाढा वाचून दाखवला आहे, तर अनुरागसारख्या मुख्य चित्रपटांच्या प्रवाहात राहून काही वेगळे चित्रपट करू पाहणाऱ्या दिग्दर्शकाला नामांकित कलाकारांना करारबद्ध करण्यापासून ते चित्रपट प्रदर्शनापर्यंत काय स्वरूपाच्या अडचणींना तोंड द्यावे लागत असेल याची सगळ्यांनाच कल्पना आहे. मात्र, केवळ कलाकारांचे वाढते मानधन हा अनुरागच्या दृष्टीने एकमेव मुद्दा नाही. तर चित्रपट बनवण्याआधीच तो कसा विकला जाईल आणि किती कमाई करेल याची गणितं मांडली जातात. आणि त्या अनुषंगाने मग मसालेदार किंवा मुख्य नायकासाठी प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट या पद्धतीची कथा रचणं, त्यासाठी केवळ ज्यांच्या नावावर चित्रपटगृहात गर्दी जमू शकेल अशा कलाकारांची फौज उभी करणं, त्याच पद्धतीचं संगीत या सगळ्या मानसिकतेत चांगला चित्रपट कधीच होऊ शकत नाही, असे अनुरागने म्हटले आहे.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
legendary filmmaker shyam benegal
अग्रलेख: भारत भाष्य विधाता!
chala hawa yeu dya reality show got less trp from last few years
‘चला हवा येऊ द्या’कडे प्रेक्षकांनी का पाठ फिरवली, TRP कमी का झाला? भाऊ कदम म्हणाले, “दुसऱ्या चॅनेलवरच्या कॉमेडी शोमध्ये…”
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
madhuri dixit husband dr shriram nene asked to pose solo at event
मिस्टर अँड मिसेस नेनेंचा डॅशिंग लूक! माधुरी दीक्षितसाठी पतीने केलं असं काही…; ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक

हे ही वाचा… विश्लेषण : ‘लाडक्या बहिणीं’च्या अर्जांची पडताळणी कशी होणार? अनेक लाभार्थी अपात्र ठरणार? नाराजी सरकारला परवडणार का? 

प्रयोग करायलाही खर्च येतो…

प्रयोगशील चित्रपट बनवणं आता माझ्यासाठी कठीण आहे, त्यालाही खर्च येतोच आणि अर्थातच अशा चित्रपटातून नफा सोडा किमान निर्मितीखर्चही वसूल होणार की नाही याबद्दल निर्माते विचार करतात. चित्रपट बनवायच्या आधीच तो कसा विकला जाईल, याचा विचार करावा लागत असेल तर चित्रपट निर्मितीतली सगळी गंमतच निघून गेली आहे, असं अनुरागने म्हटलं आहे. ‘मंजूमल बॉईज’सारखा चित्रपट हिंदीत बनूच शकत नाही. आणि जर तो चित्रपट यशस्वी झाला तर त्याचा रिमेक नक्की बनवला जाईल. जे आधीच यशस्वी ठरलं आहे त्यावर काम करून तेच पुन्हा लोकांसमोर आणायचं, नवं काही बनवण्याची मानसिकताच हिंदी चित्रपटसृष्टीत उरलेली नाही, अशी टीका करत या मानसिकतेला कंटाळून आपण मुंबईबाहेर दक्षिणेत जाणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

अभिनयापेक्षा ‘स्टार’ महत्त्वाचा…

हिंदी चित्रपटांना भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये महत्त्वाच्या अडचणी या कलाकारांच्या बाबतीत आहेत. एकीकडे मोठ्या कलाकारांच्या मानधनाचा आकडा परवडणारा नाही. दुसरीकडे नव्या कलाकारांबरोबर काम करायचे, तर त्यांनाही उत्तम अभिनेता बनण्यापेक्षा ‘स्टार’ बनण्यात अधिक रस आहे. नवीन कलाकार आणि चित्रपटकर्मी यांच्यात ‘टॅलेंट एजन्सीज’ नामक भिंत उभी आहे, अशी टीका अनुरागने केली आहे. या टॅलेंट एजन्सीज नव्या कलाकारांना ‘स्टार’ बनवत नाहीत, मात्र ज्या क्षणी त्यांचा एखादा चित्रपट चालतो त्यांच्या जोरावर पैसे कमावण्यासाठी या एजन्सी सज्ज असतात. या कलाकारांनी कशापद्धतीने काम करावं, चित्रपटासंबंधित कार्यशाळेला उपस्थित रहावं की नाही, हे सगळं या एजन्सी ठरवतात. या सगळ्या नव्या कलाकारांना सांभाळून घेत त्यांच्याबरोबर काम करणंही शक्य नाही. त्या सगळ्यांना आपल्याला ‘स्टार’सारखी वागणूक मिळावी असे वाटते, अशा शब्दांत आपला असंतोष व्यक्त करणाऱ्या अनुरागने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत असे होत नसल्याचे म्हटले आहे.

बॉलिवुडवर काही परिणाम होईल का?

अनुराग कश्यपच्या या निर्णयावर अजून बॉलिवुडमधून कोणी फारशी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्याच्या निर्णयाचा निश्चित काही परिणाम चित्रपटसृष्टीवर होऊ शकतो, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. एकीकडे त्याच्यासारखे व्यावसायिक चित्रपटांच्या चौकटीत राहूनही उत्तम आणि वेगळ्या विषयावरचे चित्रपट देणारे यशस्वी दिग्दर्शक अगदी विरळा म्हणावेत असे आहेत. बॉलिवुड असो वा सामाजिक-राजकीय घटना असू देत, आपले म्हणणे निडरपणे समोर ठेवणारे त्याच्यासारखे कलाकार नाहीत. त्यामुळेच त्याच्या हिंदी चित्रपटसृष्टी सोडण्याच्या निर्णयामुळे किमान बॉलिवुडमध्ये पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीच्या तथाकथित चौकटी आणि ‘स्टार’ प्रतिमेत अडकलेले कलाकार किंवा ॲक्शन, युनिव्हर्स किंवा रिमेक चित्रपटांमध्ये अडकून पडलेला एकूणच चित्रपट उद्योग या अनुषंगाने विचारविनिमय सुरू होईल, असे काहींना वाटते. यामुळे चित्रपटसृष्टी ढवळून निघेल आणि काहीतरी बदल होतील, असा काहींचा अंदाज आहे. तर अनुरागचा हा चर्चेत राहण्यासाठीचा फुका प्रयत्न आहे, असाही काहींचा सूर आहे. अर्थात, अनुरागने जे मुद्दे समोर ठेवले आहेत त्यावर मुख्य प्रवाहातील प्रथितयश कलाकार, निर्माते-दिग्दर्शक दूरच राहिले, त्याच्याबरोबर काम केलेल्या कलाकारांनीही काही प्रतिक्रिया देणे टाळले आहे.

हे ही वाचा… विश्लेषण : ‘आयसिस’ पुन्हा सक्रिय झाली आहे का? अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स हल्ला कशाचे निदर्शक? धोका किती गंभीर?

बडे निर्माते विचार करतील का?

आदित्य चोप्रा नेहमीच आपल्या पद्धतीने सिनेमा करण्यावर भर देतो, तो अशा विषयांवर कधीही जाहीरपणे व्यक्त होत नाही. केवळ बड्या कलाकारांना वाटेल तसे मानधन देऊन चित्रपट न करता नव्या कलाकारांना घेऊन ‘किल’सारखा वेगळा चित्रपट करण्याचा प्रयत्न करण जोहरने आधीच सुरू केला आहे. दुसरीकडे त्याने निर्मितीतली ही आव्हाने लक्षात घेत धर्मा प्रॉडक्शनमध्ये अदर पूनावाला यांच्याबरोबर भागीदारी केली आहे. नुकत्याच झालेल्या एका जाहीर चर्चासत्रात करणने जेव्हा तथाकथित नामांकित कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा दिग्दर्शिका झोया अख्तरने तू कलाकारांना वाटेल ते मानधन देणे बंद करायला हवेस, असे सुनावले होते. त्यावर मी त्या दृष्टीने काम करायला सुरुवात केल्याचेही करणने म्हटले होते. आत्ताही या विषयावर मधून मधून चर्चेची वादळं उठत असली तरी त्याबाबतीत निर्मात्यांनी एकत्र येऊन ठोस धोरण ठरवलेले नाही. अनुराग कश्यपसारख्या दिग्दर्शकाने घेतलेल्या भूमिकेमुळे तरी काही निश्चित बदलांच्या दृष्टीने प्रयत्न होतील का, याचं उत्तर येता काळच देईल.

Story img Loader