केरळमधील वायनाड जिल्ह्यात दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. वायनाडमधील मेपाडीच्या डोंगराळ भागात मंगळवारी (३० जुलै) सकाळी तीन वेळा भूस्खलन झाले; ज्यात ९३ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. भूस्खलनानंतर ढिगार्‍याखाली शेकडो लोक अडकले असण्याची भीती आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुसळधार पावसात चार तासांत तीन वेगवेगळ्या भूस्खलनाच्या घटना घडल्या. नैसर्गिक आपत्तीविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही वेळातच केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) च्या पथकांना दुर्घटनाग्रस्त भागात पाठवले. बचावकार्यासाठी भारतीय लष्करही या भागात दाखल झाले आहेत. याशिवाय, एमआय-१७ आणि एएलएच (ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर) हे दोन हवाई दलाचे हेलिकॉप्टरही पाठवण्यात आले आहेत.

मुंडक्काई, चूरलमला, अट्टामला आणि नूलपुझा ही गावे सर्वाधिक प्रभावित भागात येतात. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी बोलून केंद्राकडून राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. केरळ या आपत्तीजनक परिस्थितीला कसा समोर जात आहे? भूस्खलन म्हणजे काय? आणि पावसाळ्यात भूस्खलनाचा धोका का वाढतो? याविषयी जाणून घेऊ.

Massive tree falls in Ubud Monkey Forest in Bali kills two tourists tragic incident caught on camera
Bali: जंगलात फिरत होते पर्यटक, अचानक कोसळले भले मोठे वृक्ष; दोन पर्यटकांनी गमावला जीव, थरारक Video Viral
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
possibility of cloudy weather in maharashtra due to low pressure area formed in bay of bengal
रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण; जाणून घ्या, थंडीची लाट, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
drought-prone villages Pune, works in drought-prone villages pune, drought-prone villages fund,
पुणे : दरडप्रवण गावातील कामांना गती, २०० कोटींचा निधी मंजूर
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
It is picture of never ending natural calamities Farmers injured by heavy rains are now in a new crisis
नैसर्गिक आपत्तीचा ससेमीरा कायमच! गडद धुक्यामुळे तूरपीक संकटात; शेतकरी हवालदिल
Cold weather Thane district, Thane district temperature,
ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस
वायनाडमधील मेपाडीच्या डोंगराळ भागात मंगळवारी (३० जुलै) सकाळी तीन वेळा भूस्खलन झाले. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : हिऱ्यांच्या जागतिक मागणीत घट? भारताला किती फटका?

भूस्खलन म्हणजे काय?

भूस्खलन म्हणजे जमीन खचणे आणि खडक व दरड कोसळणे. भूस्खलनाचा वेग कधी कमी, तर कधी जास्त असतो. भूस्खलनाचे वहन, स्खलन, खडक कोसळणे असे अनेक प्रकार आहेत. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (यूजीएसजी) नुसार, गुरुत्वाकर्षणाच्या थेट प्रभावाने माती आणि खडकांमध्ये हालचाल होते आणि ते उतार भागातून खाली सरकू लागतात. भूस्खलनाच्या इतर प्रकारांमध्ये चिखलाचा प्रवाह (मडस्लाईड), चिखल आणि दगडाचा प्रवाह, मोठ्या प्रमाणात खडकांचा प्रवाह (रॉक फॉल) यांचाही समावेश आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) यांनी ‘एक्स’वर चित्राच्या मदतीने भूस्खलनाच्या घटनेचे स्पष्टीकरण दिले आहे.

भूस्खलन होण्याची कारणं काय?

भूस्खलन अनेक कारणांमुळे होऊ शकते. परंतु, तज्ज्ञ यासाठी प्रमुख तीन कारणे सांगतात. त्यातील प्रमुख कारण म्हणजे मॉर्फोलॉजी म्हणजेच जमिनीची रचना. उदाहरणार्थ, आगीमुळे किंवा दुष्काळात ज्या भागातील वनस्पती कमी होतात, त्या भागात धोका वाढतो. वनस्पती, झाडांची मुळे, माती, झुडुपे आणि इतर वनस्पती खडकांना बांधून ठेवतात आणि जमीन स्थिर ठेवण्यास मदत करतात. झाडांच्या मुळाशिवाय जमीन सरकण्याची शक्यता जास्त असते. वनस्पती, झाडे झुडपे नसल्यास मुसळधार पावसामुळे भूस्खलनदेखील होऊ शकते, जसे की केरळमधील सध्याच्या स्थितीत झाले.

पावसाळ्यात अधिक भूस्खलन का होतात?

भूस्खलनाचे एक प्रमुख कारण म्हणजे हवामान बदलामुळे होणारा सततचा पाऊस, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. ब्रिटनमध्ये २०१२-२०१३ मध्ये हवामान कार्यालयाने केलेल्या विश्लेषणात असे दिसून आले आहे की, अतिवृष्टीच्या वाढीमुळे भूस्खलनाच्या संख्येतही वाढ झाली आहे. गुवाहाटीतील अरण्यकच्या जल, हवामान आणि धोका विभागाचे प्रमुख पार्थ ज्योती दास यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, मुसळधार पावसामुळे डोंगर भागातील जमिनीवर जेव्हा सतत पाणी पडते, तेव्हा मातींच्या कणांमधील घर्षण कमी होते, त्यामुळे भूस्खलन होऊ शकते.

भूस्खलनाचे एक प्रमुख कारण म्हणजे हवामान बदलामुळे होणारा सततचा पाऊस. (छायाचित्र-पीटीआय)

जंगलतोडीमुळे भूस्खलनाच्या घटनेत वाढ?

सार्वजनिक आणि खाजगी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी जंगलतोड केल्याने माती कमकुवत होते, दगडांची पकड सैल होते; ज्यामुळे कालांतराने त्या भागात भूस्खलन होते. रेल्वेमार्गाचा विस्तार असो, पूल किंवा रस्ते बांधणे असो या सर्व गोष्टींमुळे डोंगराळ भागातील परिसंस्था विस्कळीत होते. २०२० च्या आयआयटी दिल्लीच्या अभ्यासात असेही नमूद करण्यात आले आहे की, मुसळधार पावसामुळे माती सैल होते आणि भूस्खलनाच्या घटना घडतात. केरळमध्येही असेच चित्र आहे. पावसाळ्यात प्राणघातक भूस्खलनाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. केंद्राने २०२२ मध्ये म्हटले की, केरळ राज्यात गेल्या सात वर्षांत सर्वात जास्त भूस्खलनाची नोंद करण्यात आली आहे. हा आकडा २,२३९ असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : पंचतारांकित हॉटेल्सना सरकारला करोडो रुपये का द्यावे लागत आहेत? यावरून सुरू झालेला नवा वाद काय?

प्रख्यात शास्त्रज्ञ टी. व्ही. रामचंद्र यांनी पाऊस आणि भूस्खलन यांच्यातील दुवा अधिक विषद केला. ‘डाउन टू अर्थ’शी बोलताना ते म्हणाले की, साधारणपणे ५० ते ६० टक्के पावसाचे पाणी जमिनीत शोषले जाते. परंतु, परिसंस्था विखुरल्यामुळे पाणी झिरपणे थांबते, त्यामुळे जमिनीवर पाणी साचते आणि माती सैल होते; ज्यामुळे भूस्खलन आणि चिखल तयार होतो.

Story img Loader