कुलदीप घायवट

डॉल्फिन मासा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर त्याचे फोटो किंवा प्रत्यक्ष तो मासाच उड्या मारताना येतो. इतक्या वेळा आपण हा मासा विविध टीव्ही शोजमध्ये किंवा फोटोंमध्ये पाहिला आहे. एकदम हुशार आणि निरूपद्रवी मासा अशी डॉल्फिनची ओळख आहे. या डॉल्फिनला जवळपास वेगवेगळ्या प्रकारेच 32 आवाज काढता येतात. शांत दिसणाऱ्या समुद्रातून उडी मारायची आणि परत खोलवर समुद्रात पळायचं हा याचा स्थायी भाव. कोकणात तर अनेक ठिकाणी डॉल्फिन सफारीही असते. पर्यटक खास डॉल्फिन पाहण्यासाठी येतात.

Crack Naxal movement in Gadchiroli due to social policing nagpur
“गडचिरोलीत ‘सोशल पोलिसिंग’मुळे नक्षल चळवळीला तडा,” पोलीस अधीक्षक निलोपत्पल म्हणतात…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
actress Bhagyashree shared recipe of unpeeled potato
‘मैने प्यार किया’फेम भाग्यश्री म्हणते, “न सोललेल्या बटाट्यांमुळे कमी होतो क्रॅम्प्सचा त्रास” खरंच हे शक्य आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
russian spy whale death
नॉर्वेमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या रशियन गुप्तहेर व्हेलची कहाणी; हेरगिरीसाठी कसा केला जातो प्राण्यांचा वापर?
uran accidents marathi news
उरण: पिरवाडी किनारा पुन्हा निखळत असल्याने अपघाताच्या शक्यतेत वाढ
Cyclone in August after sixty years in the Arabian Sea Pune news
अरबी समुद्रात साठ वर्षांनी ऑगस्टमध्ये चक्रीवादळ
a man saved dogs life | dog lovers
याला म्हणतात खरी माणुसकी! स्वतःचा जीव धोक्यात टाकून वाचवले कुत्र्याचे प्राण, व्हिडिओ होतोय व्हायरल
Sitopaladi benefits uses for cold and cough Ayurveda herb monsoon viral illness
पावसाळ्यात सर्दी-खोकल्यामुळे वैतागला आहात? सितोपलादी ठरतेय प्रभावी, जाणून घ्या या आयुर्वेदिक औषधाचे फायदे

आपल्या राज्याला 720 किमीचा लांबच लांब समुद्र किनारा लाभला आहे. त्यामध्ये डॉल्फिनही अर्थात आहेतच. समुद्री जिवांचा वावर मुंबईतल्या अरबी समुद्रातही दिसतो. अशात डॉल्फिनचं आकर्षण वाटणं हे खूपच साहजिक असतं. अरबी समुद्रात मुंबई जवळच्या अनेक भागांमध्ये साधारण 30 ते 35 मीटर खोल समुद्र ज्या ठिकाणी असतो तिथे हम्पबॅक डॉल्फिन सहज आढळतात. या माशाला हुशार मासा किंवा बुद्धिमान मासा असंही म्हटलं जातं. पण अर्नाळा आणि सातपाटी समुद्र किनाऱ्यावरचे स्थानिक लोक या माशाला वेडा मासा असं म्हणतात. यामागे खास कारणही आहे.

हम्पबॅक डॉल्फिन कुठे आढळतात?
अरबी समुद्रात हम्पबॅक डॉल्फिनचा वावर हा उत्तर-दक्षिण असा दिसून येतो. ज्या ठिकाणी समुद्र साधारण 35 फूट खोल आहे तिथे हा मासा सर्रास दिसतो. उथळ पाण्यातल्या अधिवासामुळे अनेकदा मच्छिमारांना ते त्यांच्या नौकांमधून आणि काहीवेळा किनाऱ्यांवरूनही दिसतात. अनेकदा हम्पबॅक डॉल्फिन मासे मच्छिमारांच्या जाळ्यातही अडकतात. किनाऱ्यापासून 30 मीटर अंतरावरचे मासे हे डॉल्फिन खाऊन टाकतात. यामुळे मच्छिमारांचे नुकसान होते. हेच कारण आहे की या मासे खाणाऱ्या हम्पबॅक डॉल्फिनला स्थानिक मच्छिमार रागाने वेडा मासा म्हणतात.

आणखी काय काय नावं हम्पबॅक डॉल्फिनला पडली आहेत?
डहाणूतल्या झाई समुद्र किनाऱ्यावरचे स्थानिक हम्पबॅक डॉल्फिनला इम्डा किंवा हिमडा म्हणतात. उरण, रेवदंडा या ठिकाणचे स्थानिक मच्छिमार हम्पबॅक डॉल्फिनला येर, हेर, मामा, गदा अशा नावांनी हाका मारतात. ओशन डॉल्फिन म्हणजेच एकदम खोल समुद्रात आढळणाऱ्या डॉल्फिनच्या एका प्रजातीला रामदल असंही म्हटलं जातं. व्हेलला देवमासा म्हणून ओळखलं जातं हे सर्वश्रुत आहे. राज्याच्या समुद्र किनारपट्टीच्या दिशेने दक्षिण दिशेने गेल्यास विविध समुद्र किनाऱ्यांवर माशांची वेगळी नावं असल्याचं कळतं.

कांदळवन कक्ष आणि प्रतिष्ठानसह कोकण सिटी रिसर्च टीमने पहिल्यांदाच इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिनच्या अधिवासाचा अभ्यास करण्यासाठी संपूर्ण राज्याच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांकडून माहिती गोळा केली. या संशोधकांच्या गटातील सदस्य मिहीर सुळे यांनी राज्याच्या किनाऱ्यालगत आढळणाऱ्या हम्पबॅक डॉल्फिनचा अभ्यास केला. हा प्रकल्प २०२०-२२ दरम्यान राबविण्यात आला. या अभ्यासातून अरबी समुद्रात हम्पबॅक डॉल्फिनचा वावर अधिक प्रमाणात असल्याचे समोर आले. राज्याच्या समुद्री भागात डॉल्फिन्सच्या अधिवासाबाबत, स्थानिक नावांबद्दलची माहितीही या संशोधनातून उलगडली. प्रोजेक्ट टायगरप्रमाणे ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ची आखणी करण्यात आली असून मुंबई परिसरातील डॉल्फीनच्या अधिवासाचा अभ्यास त्याअंतर्गत करण्यात येत आहे. मिठी, दहिसर, पोईसर, ओशिवरा आणि वैतरणा नदी, बॅक बे, हाजी अली, माहीम खाडी, ठाणे खाडी ते मुंबईच्या दक्षिण टोकापर्यंतचा पश्चिम समुद्र किनाऱ्यापर्यंत डॉल्फिन्स आढळतात.