इंद्रायणी नार्वेकर

यंदा जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने १ जुलैपासून १० टक्के पाणी कपात लागू केली आहे. मात्र जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी चार धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. धरणातील पाणीसाठा ७० टक्क्यांपुढे गेला आहे. तरीही पाणी कपात मागे घेतली जात नाही त्यामागचे खरे कारण काय ?

Nitrate-rich groundwater in Wardha district
धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
climate change creating favorable environment for mosquito borne diseases
वातावरणातील बदलांमुळे साथींचे आजारही बारमाही? हिवताप, डेंग्यू, लेप्टो, इन्फ्लुएन्झाचा धोका सदासर्वकाळ?
policy will be prepared to resolve issues related to biodiversity parks says madhuri misal
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे ‘बीडीपी’बाबत मोठे वक्तव्य, म्हणाल्या…
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र

मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे किती?

मुंबई शहराला तानसा, मोडक सागर (वैतरणा), हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा, ऊर्ध्व वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांतून केला जातो. तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा ही पाच धरणे मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची आहेत. भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा ही दोन धरणे राज्य सरकारच्या मालकीची आहेत. ही दोन धरणे बांधताना केलेल्या भांडवली खर्चाच्या सहभागामुळे पालिकेला या धरणातून पाणी मिळते.

हे जलाशय कुठे आहेत?

ही धरणे मुंबई शहरापासून सुमारे १०० किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर आहेत. तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा ही धरणे पालघर जिल्ह्यात आहेत. भातसा हे धरण शहापूर तालुक्यात आहे. तर ऊर्ध्व वैतरणा हे धरण नाशिक जिल्ह्यात इगतपुरी येथे आहे. मुंबई शहराच्या हद्दीत केवळ विहार आणि तुळशी हे दोन तलाव आहेत. मुंबई शहरात पवई तलाव असून त्यातील पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात नाही.

धरणांची साठवण क्षमता किती?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण्याची क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून त्याची कमाल पाणी साठवण क्षमता ही ८०४.६० कोटी लीटर (८,०४६ दशलक्ष लीटर) इतकी आहे. तानसा तलावाची क्षमता १४,४९४.६ कोटी लीटर (१४४,९४६ दशलक्ष लीटर) आहे. विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता ही २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) एवढी आहे. मोडक सागर तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी आहे. मध्य वैतरणा धरणाची पाणी साठवण क्षमता १,९३,५३० दशलक्ष लीटर इतकी आहे. ऊर्ध्व वैतरणा धरणाची साठवण क्षमता २,२७,०४७ दशलक्ष लीटर इतकी आहे. तर भातसा हे धरण सर्वात मोठे असून या धरणाची साठवण क्षमता एकूण पाणी साठ्याच्या निम्मी म्हणजेच तब्बल ७,१७,०३७ दशलक्ष लीटर इतकी आहे.

कोणत्या धरणातून किती पाणी पुरवठा होतो?

मुंबई शहराला या सर्व जलस्रोतातून ३८५० दशलक्ष लिटर प्रतिदिन इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तानसा धरणातून दरदिवशी ४५५ द.ल.लि. प्रतिदिन पाणी पुरवठा केला जातो. तर मोडक सागर (वैतरणा) (४५५ द.ल.लि. प्रतिदिन), हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा (४५५ द.ल.लि. प्रतिदिन), उर्ध्व वैतरणा (६४० द.ल.लि. प्रतिदिन) आणि भातसा धरणातून सर्वात जास्त (२०२० द.ल.लि. प्रतिदिन) पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबई शहराच्या हद्दीतील दोन लहान तलावापैकी विहार तलावातून ९० द.ल.लि. प्रतिदिन आणि तुळशी तलावातून १८ द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठा केला जातो.

पाणी कपात का करावी लागते?

दुरुस्तीच्या कामासाठी कधीतरी तात्पुरती पाणीकपात केली जाते. मात्र उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते त्यावेळी पाणीसाठा खालावलेला असल्यावर काही महिने किंवा पुरेसा पाऊस पडेपर्यंत पाणी कपात करावी लागते. पावसाळ्याचे चार महिने संपले की, ऑक्टोबर महिन्यात पाणीसाठ्याचा आढावा घेतला जातो. या वेळी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असतील तर पाणी कपातीची आवश्यकता नसते. मात्र थोडी तूट राहिली तरीही पाणी कपात करावी लागते. २०१८ मध्ये पाणीसाठ्यात ९ टक्के तूट राहिल्यामुळे वर्षभर १० टक्के पाणी कपात करण्यात आली होती.

यावर्षी धरणे भरूनही पाणी कपात कायम का?

जुलैच्या पावसाने यावेळी विहार, तुळशी हे लहान जलाशय आणि तानसा व मोडक सागर ही धरणे भरून वाहू लागली आहेत. पण सर्वात जास्त पाणी साठवण क्षमता असलेली भातसा व ऊर्ध्व वैतरणा ही दोन धरणे अद्याप पुरेशी भरलेली नाहीत. दरदिवशी होणाऱ्या पाणीसाठ्यापैकी जास्तीतजास्त पाणी पुरवठा हा या दोन धरणांतून होत असतो. नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्यास या दोन धरणातील पाणीसाठ्यात भरघोस वाढ होते. मात्र यंदा या धरणांच्या क्षेत्रात रोज हलक्या सरी पडत आहेत. तसेच अजून पावसाचे दोन महिने शिल्लक असून या काळात पावसाने ओढ दिल्यास धरणातील तूट वाढू शकते. मुंबईत सध्या तरी पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही.

Story img Loader