दुःखाचा प्रसंग असो वा आनंदाचा, आपल्या डोळ्यांतून आपोआप अश्रुधारा वाहायला लागतात. मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे, की जो रडताना अश्रू ढाळतो. कधी दुःखात, कधी आनंदात, कधी रागात, तर कधी एखाद्या गोष्टीचा धक्का बसल्यासही माणसाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. अश्रू कधी दु:खात, आनंदात, तर कधी एखाद्या धक्क्यामुळेही डोळ्यांतून ‘गंगा-यमुना’ सुरू होऊ शकतात. इतर प्राण्यांच्या डोळ्यांतूनही अश्रू बाहेर पडतात; परंतु शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, ते सहसा डोळ्यांच्या संरक्षणासाठी असतात. मात्र, माणसाचे तसे नाही. माणूस विशिष्ट भावनिक अवस्थेत रडतो आणि या घटनांमध्ये निर्माण होणारे अश्रू केवळ डोळ्यांच्या संरक्षणासाठी नसतात. डोळ्यांत येणाऱ्या अश्रूमागील विज्ञान काय आहे? अश्रूंचे प्रकार काय? याविषयी शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन काय सांगते? त्याविषयी जाणून घेऊ.

संशोधन काय सांगते?

न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालात संशोधकांनी रडण्यामागील विज्ञान आणि लोक का रडतात हे उघड करण्याचा प्रयत्न केला आहे. संशोधकांचा असा विश्वास आहे की, आपल्या भावनांमुळे जे अश्रू बाहेर पडतात, ते वेगळ्या कारणांमुळे बाहेर पडतात. शास्त्रज्ञ सांगतात की, आपल्या मेंदूमध्ये असा कोणताही भाग नाही की, जो दुःख किंवा राग यासारख्या भावनांसाठी जबाबदार असतो. आपण जेव्हा रडतो तेव्हा आपल्या मेंदूचा कोणता भाग जबाबदार असतो याचा शोध घेण्यात अजूनपर्यंत शास्त्रज्ञांना यश आलेले नाही. या संशोधनात शास्त्रज्ञांची हळूहळू प्रगती होत असून, ते अश्रूंमागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Vidhan Sabha election, Pune blood shortage, Pune,
विधानसभा निवडणुकीमुळे पुण्यावर रक्तटंचाईचे सावट! रक्तपेढ्यांमध्ये पाच दिवसांचाच रक्ताचा साठा शिल्लक
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल

हेही वाचा : विष्ठायुक्त फुग्यांच्या कुरापतींनंतर ‘नॉईज बॉम्बिंग’ची चर्चा; उत्तर कोरिया दक्षिणेविरुद्ध या नव्या शस्त्राचा वापर कसा करत आहे?

अश्रूंचे प्रकार

शास्त्रज्ञ मानतात की, माणसांमध्ये तीन प्रकारचे अश्रू असतात. व्यावहारिकदृष्ट्या डोळे असलेला जवळजवळ प्रत्येक जीव अश्रूंचे दोन संच तयार करतो. एक म्हणजे बेसल आणि दुसरे म्हणजे रिफ्लेक्स. बेसल अश्रू डोळ्यांना ओलसर ठेवतात आणि रिफ्लेक्स अश्रू डोळ्यांना धुळीसारख्या बाह्य गोष्टींपासून वाचवतात. प्रत्येक जीवामध्ये हे अश्रू असतात; परंतु माणसांमध्ये अश्रूचा आणखी एक प्रकार दिसून येतो आणि तो म्हणजे भावनिक अश्रू. जास्त आनंद, दुःख, निराशा यांसारख्या भावनिक स्थितीत हे अश्रू वाहतात. अनेक प्राणी संकटाच्या वेळी ओरडतात. सस्तन प्राणी आणि पक्षी बालपणात पूर्णपणे त्यांच्या पालकांवर अवलंबून असतात.

शास्त्रज्ञ मानतात की, माणसांमध्ये तीन प्रकारचे अश्रू असतात. (छायाचित्र-फ्रीपीक)

प्राणी व पक्ष्यांची पिल्ले संकटाच्या वेळी त्यांच्या पालकांना त्या त्या संकटातून वाचवण्याची विनंती करण्यासाठी त्यांच्या देहबोलीद्वारे कृती करतात. उदाहरणार्थ- जेव्हा एखादे पिल्लू किंवा बछडा भुकेला असतो किंवा त्याला कोणाची तरी भीती वाटत असते किंवा काही कारणाने त्याला त्रास होत असतो, तेव्हा त्यांच्याकडून रडल्यासारखा आवाज काढला जातो. जेव्हा हे प्राणी रडतात, तेव्हा ते माणसासारखे नसतात. कारण- त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून भावनिक अश्रू वाहत नाहीत. पण जेव्हा एखादे नवजात बाळ रडते तेव्हा त्याच्या डोळ्यांत भावनिक अश्रू येतात. जन्मानंतर एक ते दोन महिन्यांनी रडताना मुलांचे अश्रू येऊ लागतात. माणसे अस्वस्थ झाल्यावर का रडायला लागतात हे कळत नाही.

अश्रू नक्की येतात कुठून?

नेदरलँड्समधील टिलबर्ग विद्यापीठातील क्लिनिकल सायकॉलॉजीचे एमेरिटस प्राध्यापक ॲड्. विंगरहोट्स यांनी सांगितले, “हे शक्य आहे की, जेव्हा आपण रडतो तेव्हा डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो आणि त्यामुळे अश्रूंच्या ग्रंथी सक्रिय होतात. हेच कारण असू शकते की, जेव्हा आपण जोरात हसतो किंवा आपल्याला उचक्या लागतात किंवा उलट्या होतात तेव्हा आपल्या डोळ्यांतून अश्रू बाहेर पडतात.” एका संशोधनात हजारो लोकांना विचारण्यात आले की, ते शेवटच्या वेळी कधी रडले होते आणि त्यांना रडल्यानंतर काय वाटले. त्यापैकी अर्ध्या प्रतिसादकर्त्यांचे उत्तर होते, की रडल्यानंतर त्यांना बरे वाटले.

आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात, आपल्याला काही लागल्यास, एखादा कीटक चावल्यास किंवा भूक लागल्यास आपण रडतो. हे आपल्या स्वतःशी संबंधित अश्रू असतात. परंतु, जसजसे आपण मोठे होत जातो आणि अधिक सामाजिक व भावनिकदृष्ट्या जोडले जातो, तेव्हा रडण्यामागील कारणेही बदलू लागतात. प्रौढ व्यक्तीचे रडणे म्हणजे भावनिक उत्तेजनेला दिलेला एक शरीरशास्त्रीय प्रतिसाद असतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, एखाद्या रासायनिक पदार्थाच्या संपर्कात आल्यास किंवा डोळे चोळल्यास जे अश्रू येतात, ते रडताना येणाऱ्या अश्रूंपेक्षा वेगळे असतात. या अश्रूंमागील कारणे मात्र अद्यापही अस्पष्ट आहेत.

शास्त्रज्ञ अश्रूमागील कारण शोधण्यासाठी काय करतायत?

शास्त्रज्ञ सक्रियपणे या घटनेवर संशोधन करत आहेत. संशोधनातील सहभागींना भावनिक चित्रपट दाखविण्यात येत आहेत आणि स्कॅनिंगद्वारे त्यांच्या अश्रूंचे विश्लेषण केले जात आहे. परंतु, शास्त्रज्ञ रडण्याचे सर्वांत प्रचलित कारण सांगतात आणि ते म्हणजे भावनिक दुःख. आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे असहायता किंवा शक्तिहीनतेची भावना. त्याचप्रमाणे काही व्यक्ती अशाही असतात की, ज्या आपल्या भावना व्यक्त न करताही रडतात. जागतिक स्तरावर केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त वेळा रडतात. तज्ज्ञांच्या मते- ही विसंगती सामाजिक दबाव आणि लिंग अपेक्षांमुळे उद्भवू शकते.

हेही वाचा : इस्रोने नव्हे तर एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ने केले भारतीय उपग्रह ‘जीसॅट-एन २’चे प्रक्षेपण; कारण काय? या उपग्रहाचा फायदा काय?

कॉर्नेल युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्राचे प्राध्यापक डॉ. जोनाथन रोटेनबर्ग यांच्या म्हणण्यानुसार, “जेव्हा मूल जन्माला येते, मग तो मुलगा असो वा मुलगी; सुरुवातीला ते सारखेच रडते. पण, ही मुले जेव्हा मोठी होतात तेव्हा मुलींच्या डोळ्यांतून लगेच अश्रू येतात. कदाचित समाज मुलांना कठोर व्हायला शिकवतो.” मुले सामाजिक अपेक्षांचे ओझे सहन करतात आणि त्यांचे अश्रू दाबून ठेवायला शिकतात. यात हार्मोन्सदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पौगंडावस्थेमध्ये पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते आणि त्यामुळे रडणेही कमी होते. याउलट स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेनची पातळी वाढल्याने रडणे वाढू शकते. परंतु, हा गुंतागुंतीचा परस्परसंबंध पूर्णपणे समजून घेण्यासाठी आणखी संशोधन होणे आवश्यक आहे.