राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) नुकतेच आपल्या बोधचिन्हात बदल केला आहे. आयोगाने नव्याने जारी केलेल्या बोधचिन्हात धन्वंतरी या आरोग्याच्या देवाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या नव्या बोधचिन्हाला डॉक्टर तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (आयएमए) विरोध केला जातोय. एनएमसीने या बोधचिन्हाबाबत लवकरात लवकर सुधारणात्मक पाऊल उचलावे, अशी मागणी डॉक्टर तसेच आयएमएने केली आहे. याच पार्श्वभूमीवर एनएमसीच्या बोधचिन्हाला का विरोध केला जातोय? या विरोधानंतर एनएमसीने काय स्पष्टीकरण दिले आहे? हे जाणून घेऊ या…

आयएमएने आपल्या पत्रात काय म्हटले आहे?

आयएमएने एनएमसीला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात एनएमसीच्या नव्या लोगोबाबत तक्रार करण्यात आली आहे. “कोणत्याही राष्ट्रीय संस्थेच्या बोधचिन्हातून देशातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा समान प्रमाणात दिसून आल्या पाहिजेत. तसेच या बोधचिन्हात तटस्थ राहणे गरजेचे आहे. समाजातील कोणत्याही वर्गाला या बोधचिन्हातून वाईट वाटायला नको, त्यांच्या भावना दुखायला नकोत याची काळजी घेतली पाहिजे,” असे आयएमएने आपल्या पत्रात म्हटले आहे.

Neelam Gorhe issued important warning to police and other departments regarding case of women abused by psychiatrists in Nagpur
नागपुरात मानसोपचार तज्ज्ञांकडून महिलांवर अत्याचार प्रकरण…आता थेट उपसभापतींनीच…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Babasaheb Ambedkar , RSS , RSS Karad branch,
संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Image Of Mark Zuckerberg
Mark Zuckerberg : मार्क झुकरबर्ग यांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप, मेटाच्या अधिकाऱ्यांची होणार चौकशी
Bhiwandi East MLA Raees Shaikh urged bmc to issue white paper on FDs for upcoming budget
मुदत ठेवी आणि देणी याविषयी मुंबई महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची मागणी
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?

‘इंडिया’ शब्द वगळून ‘भारत’ शब्दाचा वापर

एनएमसीच्या अधिकाऱ्यांनी मात्र बोधचिन्हात अगोदरपासूनच धन्वंतरीचा फोटो आहे. अगोदरच्या बोधचिन्हात धन्वंतरी देवाचा फोटो गडत होता. आता मात्र हा फोटोला रंग देण्यात आला आहे. नव्या लोगोत ‘इंडिया’ हा शब्द वगळून त्याऐवजी ‘भारत’ या शब्दाचा वापर करण्यात आला आहे.

नव्या बोधचिन्हाला डॉक्टर्स विरोध का करत आहेत?

एनएमसीच्या बोधचिन्हात करण्यात आलेले बदल गेल्या महिन्यात चर्चेत आले. त्यानंतर हे केलेले बदल डॉक्टरांच्या मूलभूत मूल्यांच्या विरोधात आहेत, अशी भूमिका आयएमने घेतली. याबाबत आयएमेचे अध्यक्ष डॉ. शरद अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली. “रुग्णाचा धर्म, जात, वर्ग न बघता उपचार करण्याची शपथ डॉक्टर घेतात. मग डॉक्टरांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या बोधचिन्हात एकाच धर्माचा संबंध का दिसून येत आहे? डॉक्टर्स त्यांची श्रद्धा त्यांच्या घरी जोपासू शकतात. परंतू संस्थांनी असे करणे योग्य नाही. वाद निर्माण करणे हे एनएमसीचे काम नाही. वैद्यकीय शिक्षण अधिक चांगले कसे करता येईल, यावर एनएमसीने विचार करायला हवा,” असे अग्रवाल म्हणाले.

“एका धर्माशी जोडले जाईल असे बोधचिन्ह स्वीकारू नये”

“आयएमएने एनएनसीने आपल्या बोधचिन्हात योग्य तो बदल करावा, अशी मागणी केली आहे. डॉक्टर रुग्णांची तसेच सर्व नागरिकांची सेवा करण्याची शपथ घेतात. या शपथेच्या विरुद्ध संदेश देईल तसेच कोणत्याही एका धर्माशी जोडले जाईल असे बोधचिन्ह स्वीकारू नये, अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे,” असेही अग्रवाल यांनी सांगितले.

एनएमसीच्या बोधचिन्हात धन्वंतरी देवाच्या फोटोचा समावेश का करण्यात आला?

धन्वंतरीला आयुर्वेद आणि आरोग्याचा देव मानले जाते. एका वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या संस्थेच्या बोधचिन्हात धन्वंतरीचा समावेश असणे योग्य आहे, असा दावा एनएमसीचे अधिकारी करतात. “डॉक्टरांशी संबंधित असलेल्या बोधचिन्हात दोन साप दिसतात. या बोधचिन्हाचा संबंध ग्रीक पुराणकथांशी आहे. मग आपण आपल्या पौराणिक कथेशी संबंधित चिन्हे का वापरू शकत नाहीत?” असा सवाल एनएमसीच्या एका अधिकाऱ्याने केला. एनएमसी तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एनएमसीच्या बोधचिन्हात धन्वंतरीच्या फोटोचा समावेश पहिल्यापासूनच आहे, असा दावा केला आहे. याआधीच्या बोधचिन्हाचा स्वीकार २०२२ सालात करण्यात आला होता.

डॉक्टर या बोधचिन्हाला विरोध का करत आहेत?

बोधचिन्हावर आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर लगेच आयएमएने याबाबत कारवाई केली आहे, असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. “एनएमसीच्या बोधचिन्हात पहिल्यापासूनच धन्वंतरीचा फोटो आहे. मग डॉक्टर्स आताच का आक्षेप घेत आहेत, असा सवाल एनएमसीकडून केला जात आहे. मात्र आधीच्या बोधचिन्हातील धन्वंतरीचा फोटो एनएमसीलाही स्पष्टपणे दिसत नव्हता. म्हणूनच आता धन्वंतरी देवाचा रंगीत फोटो टाकण्यात आला आहे,” अस डॉ. अग्रवाल म्हणाले.

डॉक्टरांनी याआधी विरोध केलेला आहे का ?

एनएमसीने याआधी डॉक्टरांसाठी ‘चरक शपथ’ लागू केली होती. पदवीस्तरावरील वैद्यकीय शिक्षणात या शपथेचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळीही डॉक्टरांनी या निर्णयाला विरोध केला होता. डॉक्टरांची शपथ बदलून त्याजागी चरक शपथ लागू केली जाईल, असे सुरुवातीला वाटले होते. मात्र चरक शपथ ही अभ्यासक्रम सुरू करण्याच्या अगोदर असेल. तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर आपली नेहमीची शपथ घेतील, असे एनएमसीने सांगितले होते. गेल्या वर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमात योगा अनिवार्य करण्यात आले होते. त्यालाही अशाच प्रकारे विरोध करण्यात आला होता.

Story img Loader