राजेश्वर ठाकरे

रेल्वेगार्डशिवाय मालवाहू गाड्या चालवण्याचा प्रयोग सध्या भारतीय रेल्वेत सुरू आहे. गाड्यांना अधिक डबे जोडून त्याद्वारे अधिक मालवाहतूक करणे व महसुलात वाढ करणे हे यामागे उद्देश आहेत. मात्र गार्डशिवाय मालवाहू गाड्या चालवणे किती धोकादायक ठरू शकते याची प्रचिती नागपूरजवळ झालेल्या एका रेल्वे अपघातातून आली. मालगाडी अचानक मागे आली व ती रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या वाहनांवर धडकली. रेल्वे गार्ड असता तर त्याच्याकडे असलेल्या ब्रेकद्वारे तो हा अपघात टाळू शकला असता. रेल्वेत या मुद्द्यावर सध्या मंथन सुरू आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

विचित्र अपघात कसा घडला?

नागपूरलगत कोळसा भरलेली मालगाडी कळमनाहून गोधनीकडे जात होती. वाटेत बोखारा रेल्वे फाटक आहे. हा रस्ता वाहतुकीचा असल्याने वाहनांची वर्दळ असते. ३० एप्रिल रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास बोखारा रेल्वे फाटक गेटमनने बंद केले होते. फाटकांच्या दोन्ही बाजूंनी वाहने उभी होती. थोड्या वेळाने मालगाडी पुढे निघून गेली. त्यानंतर रेल्वे गेटमनने फाटक उघडले. फाटक उघडताच दोन्ही बाजूंची वाहने पुढे जाऊ लागली. अचानक पुढे गेलेली मालगाडी पुन्हा मागे येऊ लागली. काय घडते आहे हे समजण्याच्या आधीच मालगाडी रेल्वेरूळ ओलांडणाऱ्या एक कार व दुचाकीवर आदळली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.

मालगाडी मागे का येते?

मालगाडीच्या दोन वाघिणींना (वॅगन) जोडणाऱ्या सांध्यामध्ये विशिष्ट अंतर असते. गाडी थांबल्यावर डब्यांमधील अंतराच्या प्रमाणात डबे मागे जातात. त्यामुळे गाडी उभी असल्यावरही काही अंतर डबे आपोआप मागे येतात. हे अंतर गाडीला किती डबे आहे त्या प्रमाणात असते. या सर्व प्रक्रियेत रेल्वे इंजिन आहे त्या जागेवर स्थिर उभे असते. त्यामुळे रेल्वे इंजिनचालकाला याबाबतची कल्पना येत नाही. बोखारा रेल्वे फाटकावर हेच घडले. मालगाडी रेल्वे फाटकापुढे गेल्यावर सिग्नलवर थांबली. गाडीच्या मागच्या बाजूने उतार होता. गाडी थांबल्यावर डबे मागे आले व रेल्वे फाटक ओलांडणाऱ्या वाहनांवर आदळले.

अपघात टाळता आला असता का?

मालगाडी उतारावर उभी असेल तर सामान्यपणे असे प्रकार घडतात. मालगाडी साधरणात: ८०० मीटर लांब असते. प्रत्येक वॅगनच्या सांध्यामधील अंतर बघता सुमारे ५ ते ७ मीटर मालगाडी मागे येऊ शकते. मात्र, याबाबत रेल्वे इंजिन चालकाला कल्पना नसते. ती जबाबदारी रेल्वेगार्डची असते. रेल्वेगार्डकडे ब्रेक दिलेले असतात. परंतु या गाडीवर रेल्वेगार्ड नियुक्त नसल्याने बोखारा रेल्वे फाटकावर अपघात घडल्याचे दिसून येते. रेल्वेगार्ड प्रत्येक मालगाडीला देणे अनिवार्य करणे आणि गाडी उभी असताना किमान ८ मीटर पेक्षा जास्त अंतरावर मागे कोणीही येणार नाही. याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

मालगाडी आणि रेल्वेगार्डचा संबंध काय?

मालगाडीची लांबी अधिक असते. वॅगनमध्ये किमती माल असतो. रेल्वे इंजिन चालकाला किंवा सहायक इंजिन चालकाला एवढ्या लांबवर काय घडते हे लक्षात येणे शक्य नाही. दोन वॅगनमधील सांधा (कपलिंग) तुटल्याचेदेखील इंजिन चालकाला समजू शकत नाही. शिवाय मालाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वेगार्डची आवश्यक असते. मालगाडी आणि रेल्वेगार्ड यांचा महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक मालगाडीवर रेल्वेगार्ड नियुक्त करणे आवश्यक आहे.

रेल्वेगार्डबाबत रेल्वेचे धोरण…

भारतीय रेल्वे अधिकाधिक वॅगन जोडून लांबच लांब मालगाड्या कशा धावतील यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामागे रेल्वेचा मालवाहतुकीतून महसूल वाढवणे हा उद्देश आहे. याशिवाय रेल्वेगार्डविना मालगाडी चालवण्याचा प्रयोग रेल्वेत सुरू झाला आहे. अलिकडे अनेक मालगाड्यांवर रेल्वेगार्ड नियुक्त केले जात नाही. केवळ इंजिनचालकाच्या भरवश्यावर मालगाडी चालवण्यात येत आहे. परिणामी बोखारा रेल्वे फाटकसारख्या घटना घडतात.

रेल्वे इंजिन जागेवर पण मालगाडी ‘रिव्हर्स’ असे का?

मालगाडीचे वॅगन जोडणाऱ्या सांध्यामध्ये अंतर असते. मालगाडी थांबवली आणि मागील बाजूस उतार असेल तर सांध्यामधील अंतरामुळे वॅगन मागे घरंगळत जातात. रेल्वे इंजिन मात्र जागेवरच असते. इंजिनसह मालगाडी मागे येत नसल्याने इंजिन चालकाला गाडी जागेवरच आहे, असे वाटते. प्रत्यक्षात गाडी मागे गेलेली असते.

Story img Loader