Donkey Milk गाढवांचा उपयोग भारतात ओझं वाहण्यासाठी केला जातो. अगदी जुन्या काळापासून गाढव ओझे वाहून नेण्यासाठी उपयोगी आले आहेत. पण, दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकदा विनोदाने का होईना, पण एखाद्या सलग काम करणार्या व्यक्तीला गाढव म्हटले जाते. एक प्रकारे गाढवाचा अर्थ मूर्ख असा मानला जातो. परंतु, याच गाढविणीच्या दुधाला सोन्याचा भाव आहे. दूध उद्योगात गाढविणीच्या दुधाला पांढरे सोनेही म्हटले आते. गुजरातमध्ये गाढविणीचे दूध विकले जाते. धीरेन सोलंकी यांनी गुजरातमध्ये गाढवाच्या दुधाचा मोठा व्यवसाय उभा केला आहे. ते आपल्या प्रतिस्पर्ध्यांकडून उत्पादित केल्या जाणार्या दुधाच्या ७० पट जास्त किमतीत दूध विकतात. गाढविणीच्या दुधाला इतकी किंमत कशी? गाढविणीचे दूध खरंच पोषक आहे का? या दुधाची मागणी का वाढत आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.
गाढविणीचे दूध विकून कोटींची कमाई
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पाटण जिल्ह्यातील रहिवासी धीरेन सोलंकी यांचे शेत आहे, जिथे ते आपल्या गाढविणींना ठेवतात. गाढविणींचे दूध ते दक्षिणेकडील ग्राहकांना विकतात आणि महिन्याला दोन ते तीन लाख रुपये कमवतात. सुमारे आठ महिन्यांपूर्वी केवळ २२ लाखांच्या गुंतवणुकीसह त्यांनी २० गाढविणी खरेदी केल्या आणि या व्यवसायाची सुरुवात केली. आतापर्यंत सोलंकी यांनी या व्यवसायात एक कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.
हेही वाचा : World Milk Day: क्लिओपात्रा खरंच गाढविणीच्या दुधाने अंघोळ करायची का?
गुजरातमध्ये दुधाची फारशी बाजारपेठ नसल्यामुळे पहिले पाच महिने सोलंकी यांना नफा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यानंतर त्यांनी गाढविणीच्या दुधाची जास्त मागणी असलेल्या दक्षिण भारतात आपली पोहोच वाढवण्याचा निर्णय घेतला. सध्या ते कर्नाटक आणि केरळ राज्यात दुधाची विक्री करतात. त्यांच्या काही ग्राहकांमध्ये गाढविणींचे दूध वापरणाऱ्या सौंदर्यप्रसाधन कंपन्यांचादेखील समावेश आहे. सोलंकी यांच्या म्हणण्यानुसार, गाईच्या दुधाच्या तुलनेत गाढविणीच्या दुधाची किंमत पाच हजार ते सात हजार रुपये प्रति लिटर आहे.
गाढविणीच्या दुधाला इतका भाव कसा?
गाढविणीच्या दुधाचा व्यापार भारतात नवीन आहे. ‘हेल्थलाइन’च्या मते, जरी या दुधाची लोकप्रियता आणि मागणी वाढत असली, तरी प्रत्येक गाढविण दररोज फक्त चार कप (एक लिटर) दूध देऊ शकते. गाढविणीचे दूध मिळणे कठीण आहे, तसेच हे दूध लवकर खराब होते; त्यामुळे या दुधाची किंमत तुलनेने जास्त आहे. या दुधाची मागणी वाढत असल्यामुळे आता काही भागांत गाढविणीचे दूध मिल्क पावडरच्या स्वरुपातदेखील विकले जात आहे. गाढविणीच्या दुधाची किंमत ही त्याच्या उपलब्धतेवर ठरते. सौंदर्य प्रसाधनांसह औषध तयार करण्यासाठीही याचा वापर केला जातो. दिवसेंदिवस या दुधाची मागणी वाढत असल्याने लोक स्टार्टअप म्हणून या व्यवसायाकडे वळत आहेत.
गाढविणीच्या दुधाचे फायदे
गाढविणीचे दूध १० हजार वर्षांहून अधिक काळापासून आहे. परंतु, अलीकडच्या काळात याचे गुणकारी फायदे लोकांना कळाल्याने या दुधाचे महत्त्व पुन्हा वाढले आहे. पूर्वीच्या लोकांना गाढविणीच्या दुधाचे गुणकारी फायदे माहिती होते. पण, हळूहळू लोकांना त्याचा विसर पडू लागला. पण, सोशल मीडियाद्वारे काही जाणकारांकडून लोकांपर्यंत या दुधाचे महत्त्व पोहोचले. पूर्वी लहान मुलांना आवर्जून हे दूध पाजले जायचे. विशेष म्हणजे इजिप्शियन राणी क्लियोपात्रालादेखील गाढविणीचे दूध आवडायचे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन (एनएलएम) नुसार, तिने तिच्या त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी गाढविणीच्या दुधाने अंघोळ केली होती, असे वृत्त न्यूज १८ ने दिले आहे. पौराणिक कथेनुसार, राणीला रोज हव्या असणार्या दुधासाठी ७०० गाढविणींची गरज होती.
‘एनएलएम’नुसार, “गाढविणीचे दूध चेहऱ्याच्या त्वचेवरील सुरकुत्या दूर करते. तसेच या दुधामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचा मऊ होते. रोमन सम्राट नीरोची पत्नी पोप्पे ही रोज अंघोळीसाठी गाढविणीच्या दुधाचा वापर करायची. यासाठी प्रवास करताना ती गाढविणींच्या कळपाला बरोबर ठेवायची. गाढविणीचे दूध, गाईचे दूध आणि मातेच्या दुधात अनेक पौष्टिक साम्य आहेत. या दुधात विशेषतः व्हिटॅमिन डी आणि खनिजे असतात. ‘हेल्थलाइन’च्या मते, त्यात कमी फॅट आणि कॅलरीज असतात.
गाढविणीच्या दुधात असणारी प्राथिने (प्रोटिन) शरीरातील काही जीवाणू आणि विषाणूंना वाढण्यापासून रोखू शकतात. गाईच्या दुधाच्या प्रथिनांची ॲलर्जी असलेले बरेच लोक गाढविणीच्या दुधाचे सेवन करू शकतात. कारण असे आढळून आले आहे की, गाढविणीच्या दुधात केसीनची पातळी कमी असल्यामुळे या दुधामुळे ॲलर्जी होत नाही.
‘एनएलएम’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या २०१९ च्या इटालियन अभ्यासानुसार, गाईच्या दुधाची ॲलर्जी असलेल्या ८१ मुलांनी गाढविणीचे दूध प्यायले. मात्र, त्यांना कोणतेही प्रतिकूल परिणाम जाणवले नाहीत. गाढविणीच्या दुधाच्या सेवनाने वजन आणि उंची वाढवणेदेखील शक्य आहे. शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करणारे लॅक्टोज आणि मजबूत हाडांसाठी आवश्यक असणारे खनिज गाढविणीच्या दुधातील महत्त्वाचे घटक आहेत.
२०१० च्या प्रयोगशाळेतील एका अभ्यासानुसार, गाढविणीचे दूध सायटोकाइन्स या प्रोटिनचे शरीरातील प्रमाण वाढवू शकते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अभ्यासात असे म्हटले आहे की, या दुधामुळे शरीरातील पेशी नायट्रिक ऑक्साईडदेखील तयार करतात. त्याची रक्तवाहिन्या विस्तारण्यास, रक्तदाब कमी करण्यास आणि रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते.
दुधाचे दुष्परिणामही?
परंतु, अनेकवेळा जनावरांचे दूध पिणे फायदेशीर नसते. ‘वर्ल्ड जर्नल ऑफ क्लिनिकल पेडियाट्रिक्स’मध्ये प्रकाशित झालेल्या २०२२ च्या अभ्यासानुसार, गाईच्या दुधामुळे सर्व वयोगटातील लोकांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (पाचनासंबंधित आजार) समस्या उद्भवतात. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, पोषणतज्ज्ञ आणि आरोग्य प्रशिक्षक करिश्मा शाह यांनी सांगितले की, “प्राण्यांमध्ये हार्मोन्स असतात. ते आपल्या शरीरात जातात, त्यामुळे कधीकधी थायरॉईड आणि पिसिओएससारखे आजार होऊ शकतात.”
रिजन्सी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ श्रद्धा सिंह यांनी सल्ला दिला आहे की, प्राण्यांचे दूध कमी प्रमाणात प्यायला हवे. योग्य आहारासाठी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गाढविणीच्या दुधात लॅक्टोजचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मधुमेह असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य असते.
हेही वाचा : पुरामुळे अस्ताव्यस्त झालेल्या युएईला पूर्वपदावर आणायला किती खर्च येणार?
दुधात सहसा असुरक्षित जीवाणू मारण्यासाठी उष्णतेचा वापर करणारी पाश्चरायझेशनची प्रक्रिया वापरली जाते. परंतु, गाढविणीच्या दुधावर पाश्चरायझेशनची प्रक्रिया केली जात नाही, त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. ‘हेल्थलाइन’ पाश्चराइज्ड केलेले गाढविणीचे दूध द्रव किंवा पावडर स्वरूपात वापरण्याचा सल्ला देते.