Why Earth Appears Flat to Humans: प्राचीन ग्रीकांनी प्रथम चंद्राचे आणि आकाशाचे निरीक्षण केल्यापासून शास्त्रज्ञांना माहीत होते की, पृथ्वी ही एक गोल आहे. आपण सर्वांनी अंतराळातून टिपलेल्या पृथ्वीच्या सुंदर प्रतिमा पाहिल्या आहेत, काही अंतराळवीरांनी टिपलेल्या तर काही परिक्रमा करणाऱ्या उपग्रहांद्वारे गोळा केलेल्या फोटोंचा यात समावेश होतो. मग आपण पार्कमध्ये उभे असताना किंवा खिडकीतून बाहेर पाहत असताना आपली पृथ्वी गोल का दिसत नाही? याच प्रश्नाचा घेतलेला आढावा.

मानव हा अत्यंत लहान जीव आहे, जो एका खूप मोठ्या गोलावर (पृथ्वीवर) राहतो. सामान्य प्रौढ व्यक्तीची उंची साधारणतः ५ फूट ते ६ फूट ६ इंच (१.५ ते २ मीटर) असते, तर लहान मुलं याहून कमी उंच असतात. कल्पना करा की, तुम्ही सर्कशीतला अॅक्रोबॅट आहात आणि तुम्ही सुमारे ३ फूट (१ मीटर) व्यासाच्या बॉलवर उभे आहात. बॉलवरून पाहताना तुम्हाला बॉल तुमच्या पायांपासून सर्व दिशांना वाकलेला दिसेल. आता त्या सर्कशीतल्या बॉलवर एका छोट्या माशीची कल्पना करा. तिचा दृष्टीकोन बॉलच्या पृष्ठभागापासून कदाचित फक्त एक मिलिमीटर किंवा त्याहून कमी उंचीवर असेल. कारण माशी बॉलच्या तुलनेत खूप लहान आहे आणि तिचं दृश्य पृष्ठभागाच्या अगदी जवळचं आहे, त्यामुळे तिला संपूर्ण बॉल दिसू शकत नाही.

indian tectonic plate
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….
Tirupati Stampede Latest Updates| Stampede at Tirupati bairagipatteda token counter
Tirupati Stampede: तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी का झाली? त्यावेळी नेमकं काय घडलं? कारण आलं समोर!
Why do dogs eat grass
तुमचाही श्वान सतत गवत खातो? तो आजारी तर नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Loksatta kutuhal Historic buildings Hard to find without stones
कुतूहल: पाषाणांशी जडले नाते…
Loksatta kutuhal Blue Planet Earth British Geologist Dr Arthur Holmes
कुतूहल: निळा ग्रह : आपली पृथ्वी
The reason Behind Flying Kites on Makar Sankranti
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? काय आहे कारण, जाणून घ्या

अधिक वाचा: Ant Farmers: ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी मानवाने नाही तर ‘या’ कीटकाने केली शेतीला सुरुवात; नवीन संशोधन काय सांगते?

पृथ्वीचा व्यास सुमारे ४२ दशलक्ष फूट (१२.८ दशलक्ष मीटर) आहे, आणि अगदी उंच व्यक्तीची दृष्टी फक्त ६ फूट (सुमारे २ मीटर) पृष्ठभागाच्या वर असते. आपण पृथ्वीवर उभे असताना आपल्या डोळ्यांनी गोलाकार पृथ्वीचा आकार समजणे अशक्य आहे. तुम्ही समुद्रसपाटीपासून २९,०३५ फूट (८,८५० मीटर) उंच माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर चढलात तरीसुद्धा पृथ्वी गोल आहे हे समजू शकत नाही.

पृथ्वीच्या संपूर्ण गोलाकार स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला एखाद्या अंतराळवीराबरोबर प्रवास करावा लागेल किंवा उपग्रहातून पृथ्वी पाहावी लागेल. यामुळे तुम्हाला पृथ्वीचे अधिक लांबून संपूर्ण दृश्य पाहता येईल. मोठ्या व्यावसायिक विमानांनी देखील इतक्या उंचीवर उड्डाण करता येते आणि पृथ्वीच्या वक्रतेचे दर्शन घेता येते. मात्र, प्रवाशांना बाजूच्या खिडक्यांमधून मिळणाऱ्या दृश्याच्या तुलनेत पायलट्सना विमानाच्या समोरील भागातून खूपच चांगले दृश्य दिसते.

अधिक वाचा: Snake Species Named After Leonardo DiCaprio: टायटॅनिकच्या हिरोचं नाव भारतीय सापाला; काय आहे या दोघांमध्ये संबंध?

अंतराळातूनसुद्धा पृथ्वीच्या आकाराबाबत एक महत्त्वाची गोष्ट कळणार नाही, ती म्हणजे पृथ्वी पूर्णपणे गोल नाही. ती प्रत्यक्षात थोडीफार लंबगोलाकारातील (oblate spheroid) किंवा अंडाकृती आहे. याचा अर्थ असा की पृथ्वी भूमध्यरेखेजवळ थोडी रूंद आहे आणि ध्रुवांजवळ तुलनेने सपाट आहे, जणू कोणीतरी त्या ध्रुवांवर बसून त्याला थोडे दाबले आहे. हे पृथ्वीच्या गतीमुळे निर्माण होणाऱ्या केंद्रापसारक बलामुळे (centrifugal force) होते. हे बल अगदी फिरणाऱ्या मेरी- गो- राऊंडवरून तुम्ही पकड न सोडल्यास जसे फेकले जाल, त्याच प्रकारे पृथ्वीच्या मध्यभागी हलकीशी फुगवट्यास कारणीभूत ठरते.

जियोडेसी

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भौगोलिक वैशिष्ट्ये जसे की पर्वत आणि खोल समुद्रातील खंदकसुद्धा पृथ्वीच्या आकारात थोडा फरक निर्माण करतात. यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या शक्तीमध्ये लहान बदल होतात – ही ती शक्ती आहे जी पृथ्वीवरील सर्व वस्तूंना मध्यभागाकडे खेचते. पृथ्विज्ञानात एक शाखा आहे जी ‘जियोडेसी’ म्हणून ओळखली जाते, जी पृथ्वीचा आकार आणि ती अवकाशात कशी स्थित आहे याचा अभ्यास करते. जियोडेसीची माहिती शहरी नाले बांधणे, समुद्रसपाटी वाढीचे अचूक नकाशे तयार करणे आणि अंतराळ यान प्रक्षेपण व ट्रॅकिंग यासाठी उपयोगी पडते. ही आजच्या वैज्ञानिक संशोधनातील एक महत्त्वाची शाखा आहे आणि यावरून हे लक्षात येते की आपण अजूनही या अद्भुत ग्रहाविषयी, आपल्या घराविषयी शिकतच आहोत.

Story img Loader