राखी चव्हाण

गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्प दुर्लक्षित असताना, पेंच व्याघ्रप्रकल्पात मात्र कर्नाटकातून हत्ती आणून नव्याने हत्ती कॅम्प तयार केला जात आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. वनखात्याच्या या भूमिकेवर वन्यजीवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

journey of India’s engagement with the Taliban
तालिबानचं भारताशी सख्य का वाढतंय?
ISKCON temple kharghar history
नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन……
4th-century CE Sanskrit inscription unearthed in PoK's Gilgit
Shaivism in POK: पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडला शिव उपासनेचा प्राचीन पुरावा; का ठरतोय हा संस्कृत कोरीव लेख महत्त्वाचा?
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
indian tectonic plate
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
india bangladesh fenching
भारत-बांगलादेश संबंध आणखी ताणले; सीमेवर कुंपण बांधण्यावरून सुरू झालेला वाद काय?
India successfully tests anti tank missile Nag Mk 2
शत्रूचा थरकाप उडवणाऱ्या ‘नाग’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; पाकिस्तान-चीनच्या कारवायांना चाप बसणार?
PM Narendra Modi to launch 2 warships and one submarine in Mumbai on Jan 15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नौदलात एकाच दिवशी दोन युद्धनौका, एक पाणबुडी दाखल… भारताच्या युद्धसज्जतेत किती भर?
Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?

हत्ती कॅम्पचा उद्देश काय?

पेंच व्याघ्रप्रकल्पात बचाव कार्य आणि गस्तीसाठी कर्नाटकातून चार हत्ती आणले जात आहेत. हा प्रकल्प जवळजवळ पूर्णत्वास आला आहे. या चार हत्तींबरोबर माहूत आणि चाराकटरही येणार आहेत. मानव-वन्यप्राणी संघर्ष यासारखी गंभीर समस्या हाताळण्यासाठी या व्याघ्रप्रकल्पात स्वतंत्र हत्ती कॅम्प तयार केला जात आहे. जिथे वाहनांना प्रवेश नाही, अशा ठिकाणी गस्त घालण्यास हत्ती उपयुक्त ठरतात, असे खात्याचे म्हणणे आहे. त्यासाठीच येथे हत्ती आणण्याचा घाट घातला जात आहे.

आणखी वाचा-विश्लेषण: चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ला उतरती कळा का लागली?

हत्ती कॅम्प तयार करण्यामागचे कारण काय?

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात ‘अवनी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘टी-१’ वाघिणीला जेरबंद करण्याच्या कारवाईदरम्यान प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. मध्य प्रदेशातील हत्तींवर महाराष्ट्राला अवलंबून राहावे लागले, तर ताडोबातील एकट्या अप्रशिक्षित हत्तीने एका महिलेला पायदळी तुडवले होते. त्यामुळे बचाव कार्य आणि गस्तीसाठी पेंच व्याघ्रप्रकल्पात हत्ती कॅम्प असावा, अशी कल्पना तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांनी मांडली होती. सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी कर्नाटकला पत्र लिहिले होते. पण, करोनामुळे हा प्रस्ताव रखडला होता. दरम्यान, आता कर्नाटकातून हत्ती आणण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

हत्ती नेमके कुठले?

कर्नाटक राज्यातील मोतीगोडू आणि डुबरे येथील दोन हत्ती छावण्यांमधून चार हत्ती निवडण्यात आले आहेत. भीमा (३०), रंजन (२५), शुभ्रमणय (२९) आणि एक मादी हत्ती यांचा त्यात समावेश आहे. २०१५ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातून पकडलेल्या तीन हत्तींमध्ये मोतीगोडू येथील भीमाचा समावेश होता. तर रंजन आणि शुभ्रमणय हे दुबरे छावणीतील आहेत.

आणखी वाचा-निवडणुकीची घोषणा झालेल्या राज्यांत शेतीची काय स्थिती? शेतकऱ्यांच्या मतांना किती महत्त्व?  

प्रकल्पाची एकूण किंमत किती?

या संपूर्ण प्रकल्पाची किंमत जवळजवळ ८० लाख रुपये इतकी आहे. हत्ती निश्चित झाले असून, चोरबाहुली येथील बोरबन येथे हत्तीच्या संगोपनासाठी मूलभूत पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. बोरबनमध्ये उभारण्यात येणारा हत्ती कॅम्प पर्यटन क्षेत्रात आहे, जेथे पर्यटक विश्रांती घेऊ शकतात. सुमारे दोन हेक्टरमध्ये हा हत्ती कॅम्प आहे. कर्नाटकातील माहूत या पेंचमधील माहुतांना हत्ती हाताळण्याबाबतचे प्रशिक्षण देतील. प्रत्येक हत्तीमागे एक माहूत आणि एक चाराकटर असेल.

नव्या हत्ती कॅम्पला विरोध का?

राज्यातील पहिला हत्ती कॅम्प महाराष्ट्रातील दुर्गम भागात म्हणजेच गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे आहे. त्याचे संवर्धन राज्याच्या वनखात्याला करता येत नाही. येथील हत्तींसाठी माहूत आणि चाराकटर, पशुवैद्यक यांची पदे भरता येत नाहीत. ही पदे भरून त्यांना आणि हत्तींना बचावकार्य आणि गस्तीसाठी प्रशिक्षण देता येत नाही आणि परराज्यातील हत्ती आणून त्यावर लाखो रुपयांची उधळण करायला मात्र वनखाते तयार आहे. जोपर्यंत कमलापूरच्या हत्ती कॅम्पला सुविधा मिळत नाही, तोपर्यंत पेंचमधील हा प्रकल्प प्रत्यक्षात आणू नये, यासाठी हा विरोध आहे.

आणखी वाचा- विश्लेषण: झोपु योजनेतील आगीच्या घटना कशा रोखणार? संकटकालीन जिने प्रभावी ठरणार?

कमलापूरमधील हत्तींची गैरसोय होत आहे का?

इंग्रज राजवटीपासून हा कॅम्प वापरात आहे. तेथील हत्तींची वंशावळ वाढून सद्यःस्थितीत सहा मादी आणि दोन नर असे एकूण आठ हत्ती येथे आहेत. त्यांच्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ येथे नाही. प्रशिक्षित माहूत, कायमस्वरूपी वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने हत्तींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. विशेषकरून, हत्तींच्या पिल्लांना त्याचा अधिक फटका बसतो आहे. यामुळे हत्तींच्या आजारावर किंवा हत्तीच्या प्रसूतीवेळी त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत. परिणामी हत्तींचा मृत्यू होतो.

वनखात्याचे म्हणणे काय?

महाराष्ट्रातही हत्ती आहेत ही खरी गोष्ट आहे, पण ते प्रशिक्षित नाहीत. बचाव कार्य आणि गस्तीसाठी हत्ती प्रशिक्षित असावे लागतात आणि हे प्रशिक्षण त्यांना लहानपणापासूनच द्यावे लागते. कर्नाटकातील या हत्तींना लहानपणापासूनच हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटकातून हत्तींबरोबरच माहूत आणि चाराकटर येत आहेत. ते पेंचमधील माहूत आणि चाराकटर यांना हत्ती हाताळण्याचे प्रशिक्षण देतील, असे वनखात्याचे म्हणणे आहे.

Story img Loader