संशोधन क्षेत्रात भारत प्रगतिपथावर आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने ‘जीसॅट-एन २’ नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला आहे. इस्रोची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन दुराईराज यांनी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले की, उपग्रह त्याच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचला आहे. भारतातील ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी सक्षम करण्याचे काम हा उपग्रह करणार आहे. मुख्य म्हणजे या उपग्रहाचे प्रक्षेपण इस्रोने नव्हे तर एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सने केले आहे. काय आहे हा उपग्रह? या उपग्रहाचा भारतीयांना काय फायदा होणार? या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी इस्रोला स्पेसएक्सची गरज का भासली? त्याविषयी जाणून घेऊ.

काय आहे ‘जीसॅट-एन २?’

‘जीसॅट-एन २’ हा एक Ka-Band कम्युनिकेशन उपग्रह आहे. ‘इकॉनॉमिक टाईम्स’नुसार, जीसॅट उपग्रहांच्या मालिकेतील हा नवीन उपग्रह आहे. ‘जीसॅट-एन २’ उपग्रहाला सरकारी मालकीच्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) ने विकसित केले आहे. एनएसआयएल ही इस्रोची एक व्यावसायिक शाखा आहे. ‘इंडिया टुडे’नुसार, या उपग्रह मोहिमेचा कार्यकाळ १४ वर्षे आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, ‘स्पेसएक्स’चे फॅलकॉन-९ इस्रो जीसॅट-२० लॉंच करेल. त्याला ‘जीसॅट-एन २’ म्हणूनही ओळखले जाते.” या उपग्रहाचे वजन ४,७०० किलोग्राम आहे. हा उपग्रह हाय-स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल व्हिडीओ व ऑडिओ ट्रान्समिशन सेवा सुलभ करेल.

Russias Voronezh radar system
चीनची घुसखोरी रोखण्यासाठी भारताला रशियाची मदत! काय आहे वोरोनेझ रडार प्रणाली?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
On December 13 and 14 there will also meteor shower in space and feast for astronomy lovers
आकाशात १३, १४ डिसेंबरला उल्कावर्षाव; पृथ्वी लहान-मोठ्या कणांजवळून…
International Space Station
भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा, नाव ठरलं ‘भारतीय….’
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
CCTV installation completed two years ago but not fully utilized in the city
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम अपूर्णच, ६० कोटी रुपयांचे देयक महापालिकेने रोखले
‘जीसॅट-एन २’ हा भारताचा सर्वात प्रगत उपग्रह आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : विष्ठायुक्त फुग्यांच्या कुरापतींनंतर ‘नॉईज बॉम्बिंग’ची चर्चा; उत्तर कोरिया दक्षिणेविरुद्ध या नव्या शस्त्राचा वापर कसा करत आहे?

‘एनडीटीव्ही’नुसार, ‘जीसॅट-एन २’ हा भारताचा सर्वात प्रगत उपग्रह आहे. हा प्रगत Ka-Band कम्युनिकेशन उपग्रह आहे. ही २७ ते ४० गीगाहर्ट्झ (GHz)मधील रेडिओ फ्रिक्वेन्सीची श्रेणी आहे, त्यामुळे उपग्रहाला उच्च बँडविड्थ मिळते. ‘जीसॅट-एन २’मध्ये ३२ बीम आहेत, जे अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटांसह संपूर्ण भारतात हायस्पीड सिग्नल प्रसारित करेल. मुख्य भूभागावर असलेल्या हब स्टेशनला हे बीम कनेक्ट असतील. बंगळुरूमधील यूआर राव उपग्रह केंद्राचे संचालक डॉ. एम. शंकरन यांनी ‘आउटलेट’ला सांगितले की, जीसॅट-२० हा भारतातील सर्वात प्रगत उपग्रह आहे.” ‘जीसॅट-एन २’च्या क्षमतेपैकी ऐंशी टक्के क्षमता खाजगी कंपनीला विकण्यात आली आहे. ‘एनडीटीव्ही’नुसार उर्वरित २० टक्के विमान वाहतूक आणि सागरी क्षेत्रातील खाजगी कंपन्यांना विकले जातील. ‘इकॉनॉमिक टाईम्स’नुसार, ‘जीसॅट-एन २’ केंद्राच्या ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमाला चालना देईल. हे विमानांवर इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुलभ करण्यासदेखील मदत करेल.

भारताने या मोहिमेत ‘स्पेसएक्स’ची मदत का घेतली?

उपग्रहाच्या प्रचंड वजनामुळे भारताला प्रक्षेपणासाठी ‘स्पेसएक्स’ची गरज भासली. इस्रोचा लॉंच व्हेईकल मार्क-३ (LVM3) रॉकेटला भारतीय अंतराळ एजन्सीचा हेवी लिफ्ट लॉन्चर म्हणून ओळखले जाते. हे रॉकेट चार टन वजन जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये (GTO) वाहून नेऊ शकते. ‘LVM3’ ला ‘बाहुबली’ आणि ‘फॅट बॉय’ म्हणूनही ओळखले जाते, कारण हे रॉकेट आठ टनपर्यंतचे वजन लो अर्थ ऑरबीट (LEO) मध्ये नेऊ शकते. अलीकडेच चांद्रयान-३ मोहिमेत या रॉकेटचा वापर करण्यात आला होता. त्यापूर्वी २०१९ मध्ये चांद्रयान-२ अंतराळ यान प्रक्षेपित करण्यासाठीही रॉकेटचा वापर करण्यात आला होता.

दुसरीकडे फाल्कन ९ रॉकेट, जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये आठ टनपर्यंत वजन वाहून नेऊ शकते, असे ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे, त्यामुळेच या मोहिमेत फाल्कन ९ रॉकेटचा वापर करण्यात आला. इस्रो आणि स्पेस एक्सची ही पहिलीच मोहीम होती, जी यशस्वी झाली आहे. ‘एनडीटीव्ही’नुसार, प्रक्षेपणासाठी मस्कच्या मालकीच्या कंपनीला ५०० कोटी रुपये देण्यात आले. इस्रोने यापूर्वी सर्वात मोठे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी फ्रान्सच्या एरियनस्पेसचा वापर केला होता. परंतु, एरियनस्पेसकडे सध्या इस्रोसाठी कोणतेही व्यावसायिक स्लॉट उपलब्ध नाहीत. त्यामुळे स्पेसएक्स हा एकमेव व्यवहार्य पर्याय उरल्याचे, ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तात सांगण्यात आले.

हेही वाचा : … तर तिसरे महायुद्ध होणार? युक्रेनच्या क्षेपणास्त्र वापराविरुद्ध रशियाचा इशारा; कारण काय?

इस्रो सध्या त्याचे नेक्स्ट जनरेशन लॉंच व्हेईकल (NGLV) विकसित करत आहे. यामुळे इस्रोला चार टनांपेक्षा जास्त वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्यात मदत मिळेल. NGLV, ८,२४० कोटी रुपये खर्चून तयार केले जात आहे. हे रॉकेट LVM3 च्या क्षमतेच्या तिप्पट वजन वाहून नेऊ शकेल. NGLV मध्ये पुन्हा वापरता येण्याजोगा पहिला टप्पा असेल. हे रॉकेट LEO मध्ये ३० टन आणि GTO मध्ये १० टन वजन वाहून नेण्यास सक्षम असेल.

Story img Loader