देहदंडाची शिक्षा जाहीर झालेल्या कैद्यांना एका रांगेत उभे करून गोळ्या झाडणाऱ्या पथकाचा (Firing squad) फोटो जुन्या काळाची आठवण करून देतो. मागच्या काही शतकांत अनेक देशांत अशा प्रकारची शिक्षा दिली जात होती. ही शिक्षेची पद्धत पुन्हा एकदा रूढ होताना दिसत आहे. अमेरिकेतील इडाहो (Idaho) राज्यात गोळी झाडून देहदंड देण्याचे विधेयक संमत करण्यात आले आहे. इडाहोसोबतच मिसिसिपी (Mississippi), युटा (Utah), ओक्लाहोमा (Oklahoma) आणि दक्षिण कॅरोलिना (South Carolina) या चार राज्यांनी याआधीच अशा प्रकारच्या शिक्षेला मान्यता दिलेली आहे. भारतातदेखील गळफासाच्या शिक्षेला पर्याय सुचविण्यासाठीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी याबाबतची याचिका स्वीकारली असून ५ एप्रिलपासून याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे.

विषारी इंजेक्शनला पर्याय देण्यासाठी इडाहो राज्याने देहदंडाच्या शिक्षेसाठी हा नवा मार्ग निवडला आहे. फार्मास्युटिकल कंपन्या अशा प्रकारच्या इंजेक्शनची निर्मिती करणे टाळत असल्यामुळे संपूर्ण अमेरिकेत या इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीशांचेही गोळी झाडण्याच्या शिक्षेवर एकमत आहे. त्यांच्यामते गोळी झाडण्याच्या पद्धतीत हिंसा प्रतीत होत असली तरी विषारी इंजेक्शनपेक्षा ही पद्धत कमी क्रूर आहे. तर काहींच्या मते या शिक्षेला इतर पर्याय सुचविले गेले पाहिजेत.

US Illegal Immigrants
US Illegal Immigrants: भारतीय नागरिकांना साखळदंड बांधून अमेरिकेतून पाठवलं? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
अमेरिकेने रवाना केलेल्या भारतीयांचे मायदेशी परतल्यावर काय होणार? (फोटो सौजन्य पीटीआय)
Indian Immigrants : अमेरिकेने रवाना केलेल्या भारतीयांचे मायदेशी परतल्यावर काय होणार?
Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
rising mortality rates in young adults post-corona in america
करोनानंतर अमेरिकेत तरुणांच्या मृत्यूदरात वाढ
Flocks of devotees gathered at the Maha Kumbh mela in Prayagraj, Uttar Pradesh on January 29
Mahakumbh 2025 Stampede : ३० लोकांचा बळी कसा गेला? DIG म्हणाले, “भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहात होते, तेवढ्यात…”
Image Of Doanald Trump.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णयांचा धडाका सुरूच, अमेरिकेत १९ वर्षांच्या आधी लिंगबदलास घातली बंदी
Ashutosh Joshi Konkan Nature Raigad
…एक पत्थर तो तबियत से उछालो यारो

हे वाचा >> विश्लेषण : फाशीची शिक्षा अमानवी; मृत्युदंडाच्या शिक्षेला पर्याय मिळणार? काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

युनायटेड स्टेट्समध्ये गोळी झाडून शेवटचा देहदंड कधी दिला गेला?

युटा राज्यातील कैदी रोनी ली गार्डनर (Ronnie Lee Gardner) याला १८ जून २०१० रोजी गोळ्या झाडून देहदंड दिला गेला. न्यायालयात वकिलाची हत्या करून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गार्डनरला देहदंड देण्यासाठी वेगळी सोय निर्माण करण्यात आली होती. एका खोलीत गार्डनरला खुर्चीला बांधून ठेवण्यात आले आणि त्याच्या हृदयावर नेम धरण्यासाठी खूण करण्यात आली. खुर्चीच्या आजूबाजूला वाळूने भरलेली पोती एकावर एक रचून ठेवण्यात आली होती. कैद्यांपैकीच पाच जणांना गोळी झाडण्यासाठी स्वयंसेवक म्हणून घेण्यात आले. गार्डनर बसलेल्या खुर्चीपासून २५ फूट लांब (जवळपास आठ मीटर) उभे राहून .३० कॅलिबर रायफलमधून गोळी झाडण्यात आली. गोळीबार केल्यानंतर दोन मिनिटांत गार्डनरचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

या वेळी पाचपैकी एका बंदुकीत मोकळे काडतूस भरण्यात आले होते, कुणाच्या बंदुकीत मोकळे काडतूस आहे याची माहिती स्वयंसेवकांना नव्हती. आपल्याच गोळीतून कैद्याचा मृत्यू झाला, ही भावना स्वयंसेवकांना नंतर सतावू नये, यासाठी हे केले गेले होते. आपण मोकळे काडतूस चालवले अशा समजुतीमुळे या घटनेच्या धक्क्यातून त्यांना बाहेर येण्यास मदत मिळते, असा या मागील विचार होता. मागच्या ५० वर्षांत गोळी झाडून देहदंड देणारे युटा हे एकमेव राज्य आहे, अशी माहिती वॉशिंग्टन डीसीच्या देहदंड माहिती केंद्राने दिली.

हे ही वाचा >> कोण आहे फाशी देणारा जल्लाद आणि कशी देतो फाशी?

विषारी इंजेक्शनची कमतरता कशामुळे भासत आहे?

इडाहोने संमत केलेल्या विधेयकात म्हटले आहे की, देहदंडाची शिक्षा देणाऱ्या यंत्रणेला विषारी इंजेक्शन ज्या वेळी उपलब्ध होणार नाही, तेव्हाच गोळी झाडून देहदंड दिला जावा. २००० सालापासून अमेरिकेत विषारी इंजेक्शन देऊन देहदंड देण्याची पद्धत अमलात आली होती. मात्र नंतर औषध कंपन्यांनी असे इंजेक्शन उत्पादित करणे बंद केले. आम्ही लोकांचे जीव वाचविण्यासाठी आहोत, त्यांना मृत्यूची शिक्षा देण्यासाठी नाही, असा युक्तिवाद करत कंपन्यांनी विषारी इंजेक्शनचे उत्पादन बंद केले आहे.

औषध कंपन्यांच्या या पवित्र्यामुळे राज्यांना सोडियम थाइअपेन्टल (sodium thiopental), पॅन्क्यूरोनियम ब्रोमाइड (pancuronium bromide) आणि पोटॅशियम क्लोराईड (potassium chloride) सारख्या कॉकटेल औषधांच्या इंजेक्शनवर अवलंबून राहावे लागत आहे. काही राज्यांनी पेंटोबार्बिटल (pentobarbital) किंवा मिडाझोलम (midazolam)सारख्या त्वरित उपलब्ध होणाऱ्या औषधांचा मार्ग अवलंबला. पण या औषधांमुळे तीव्र वेदना होऊन मृत्यू होतो, अशी टीका करण्यात आली आहे.

काही राज्यांनी देहदंड देण्यासाठी विजेची खुर्ची आणि गॅस चेंबरचा पर्याय पुन्हा निवडला आहे.

अशी शिक्षा माणुसकीला धरून आहे का?

गोळी झाडण्याची शिक्षा अधिक मानवीय आहे, अशी भलामण करणाऱ्यांपैकी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश सोनिया सोटोमेयर या एक आहेत. गोळी थेट हृदयाला लागल्यानंतर व्यक्ती तात्काळ बेशुद्ध होते, त्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन मृत्यू होतो. तसेच शिक्षेच्या इतर पर्यांयापैकी गोळी झाडून झालेला मृत्यू हा कमी वेदनादायी असतो, अशी प्रतिक्रिया सोटोमेयर यांनी २०१७ साली दिली होती.

अलाबमा येथील कैद्याने गोळी झाडून देहदंड द्यावा, अशी मागणी केल्यानंतर न्यायाधीश सोनिया यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. सर्वोच्च न्यायालयातील बहुतांश न्यायाधीशांनी कैद्याची मागणी धुडकावून लावली होती. परंतु सोनिया यांनी विषारी इंजेक्शनमुळे मृत्यू होताना अधिक वेदनांचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. इंजेक्शनमुळे कैद्याला मृत्यू येण्याच्या आधी शुद्ध हरपण्याआधीच अर्धांगवायूचा झटका येतो. हे क्रूरतेचे लक्षण असून यामुळे कैद्याला मोठ्या वेदनेनंतर मृत्यू मिळतो. आपण आतापर्यंत मृत्यूचा सर्वात भयंकर प्रयोग करत आलो आहोत, असे सांगत न्यायाधीश सोनिया यांनी गोळी झाडण्याच्या शिक्षेचे समर्थन केले होते.

गोळी झाडून होणारा मृत्यू खरेच कमी वेदनादायी असतो?

गोळी झाडून होणारा मृत्यू किती वेदनादायी असतो? हे जाणून घेण्यासाठी २०१९ साली एका फेडरल प्रकरणात भूलतज्ज्ञ (Anesthesiologist) जोसेफ अँटोग्नीनी याचे मत जाणून घेण्यात आले. अँटोग्नीनी म्हणाले की, गोळी झाडून होणारा मृत्यू हा कमी वेदनादायी असू शकतो, याची खात्री देता येत नाही. गोळी झाडल्यानंतर कैदी १० सेकंदांपर्यंत शुद्धीत असू शकतो. गोळी नेमकी कुठे लागली त्यावर हे अवलंबून आहे. जर कैदी जास्त काळ शुद्धीत राहिला तर ती वेदना अधिक तीव्र स्वरूपाची असते. या वेळी गोळ्यांमुळे हाडे मोडत असतात आणि स्पायनल कॉर्डला तीव्र इजा पोहोचते.

तरी काही जणांच्या मते, विषारी इंजेक्शनच्या तुलनेत गोळी झाडण्याच्या प्रकारामध्ये खूप हिंसा होते आणि रक्तस्राव होतो. तसेच या प्रकारामुळे कैद्याच्या नातेवाईकांना आणि इतर साक्षीदारांना धक्का बसू शकतो. तसेच ज्यांनी ही शिक्षा अमलात आणली त्यांना आणि त्यानंतर त्या जागेची सफाई करणाऱ्या स्वयंसेवकांनाही या घटनेचा मोठा मानसिक धक्का बसू शकतो.

गोळी झाडण्याचा पर्याय अधिक विश्वासार्ह आहे?

अमेरिकेतील अमहेर्स्ट महाविद्यालयातील राज्यशास्त्र आणि कायद्याचे प्राध्यापक ऑस्टिन सरत यांनी यूएसमधील १८९० ते २०१० मधील ८,७७६ देहदंडाच्या शिक्षा प्रकरणांचा जवळून अभ्यास केला आहे. यामध्ये त्यांना आढळले की, २७६ प्रकरणांमध्ये शिक्षेची अंमलबजावणी करण्यात अपयश आलेले आहे. अपयश आलेल्या ७.१२ टक्के प्रकरणांत विषारी इंजेक्शनचा वापर करण्यात आला होता. तर ३.१२ टक्के फाशीच्या आणि १.९२ टक्के प्रकरणांत विजेचा धक्का दिल्यामुळे अपयश आले होते.

आश्चर्याची बाब म्हणजे, गोळी झाडून देहदंड देण्याच्या ३४ प्रकरणांत एकदाही अपयश आलेले नाही, असे ऑस्टिन यांच्या अभ्यासातून समोर आले. देहदंड माहिती केंद्राने दिलेल्या माहितीनुसार १८७९ साली गोळी झाडून शिक्षा देण्याच्या प्रकरणात गफलत झालेली होती. युटा प्रांतात त्या वेळी वॉलेस विल्करसन या कैद्याला शिक्षा देताना रायफलमनचा नेम चुकला. हृदयाला गोळी न लागता दुसऱ्याच ठिकाणी गोळी लागल्यामुळे विल्करसनचा मृत्यू होण्यास तब्बल २७ मिनिटे लागली होती.

अनेक देशांत सामान्य नागरिकांना शिक्षा देण्यासाठी गोळी झाडण्याच्या शिक्षेचा मार्ग स्वीकारला गेलेला नाही. अशा स्वरूपाची शिक्षा ही लष्करात किंवा गृहयुद्ध छेडल्या गेलेल्या देशांमध्ये दिली जाते.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कैद्याने प्रचलित देहदंडाच्या शिक्षेला विरोध केल्यास त्याला पर्याय म्हणून इतर पद्धत दिली गेली पाहिजे. प्रचलित पद्धत नाकारली गेल्यास इतर कमी वेदनादायी पद्धत निवडण्याचा कैद्याला अधिकार असल्याचे उच्च न्यायालयांनी सांगितले आहे.

Story img Loader