उत्तर प्रदेशातल्या लखमीपूर खीरी या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेची सुनावणी पूर्ण होण्यास कमीत पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो. हा कालावधी फक्त सत्र न्यायलायतला आहे. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात जाऊ शकतं. सत्र न्यायालयाने या प्रकरणात सुप्रीम कोर्टात एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात असं म्हटलं आहे की या प्रकरणात २०० साक्षीदार, १७१ दस्तावेज आणि २७ फॉरेन्सिक रिपोर्ट आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो. लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्रा हा मुख्य आरोपी आहे. आशिष मिश्रा हा केंद्रीय मंत्री अजय मिश्रांचा मुलगा आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या FIR नुसार एका एसयुव्हीने चार शेतकऱ्यांना चिरडलं होतं. त्या एसयुव्ही मध्ये आशिष मिश्रा बसले होते. तिकुनिया गावात झालेल्या या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. यापैकी चारजण हे शेतकरी होते. आशिष मिश्रांशिवाय या प्रकरणात १२ आणखी आरोपीही आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा