फ्रान्समधील सफाई कर्मचाऱ्यांचा सलग नवव्या दिवशी संप सुरू असल्यामुळे राजधानी पॅरिसमधील रस्त्यावर दुतर्फा हजारो टन कचरा साठला आहे. फ्रान्सच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात नवीन पेन्शन योजना विधेयक मांडले आहे, लवकरच ते दोन्ही सभागृहांत अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. या विधेयकामुळे फ्रान्सच्या सफाई कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढणार आहे. या विधेयकाच्या विरोधात फ्रान्सचे कर्मचारी आंदोलन करत आहेत. यामुळे पॅरिसच्या रस्त्यावर मंगळवारपर्यंत सात हजार टन कचऱ्याचा ढीग जमा झाला आहे. फ्रान्समधील इतर शहरांतही अशीच परिस्थिती आहे. देशाच्या राजधानीत कचऱ्याचे ढीग जमा झाल्यामुळे सर्वांचे लक्ष या आंदोलनाकडे वळले आहे. महाराष्ट्रात सध्या नवीन पेन्शन योजनेच्या विरोधात सरकारी कर्मचारी आंदोलन करत आहेत. अशीच परिस्थिती फ्रान्समध्येही दिसून येत आहे.

पॅरिसमध्ये सध्या काय परिस्थिती आहे?

पॅरिसच्या बाहेर घनकचरा व्यवस्थापन करणारे तीन प्लांट आहेत, तीनही प्लांट सध्या बंद असल्यामुळे शहराच्या कचराकुंड्यांतून कचऱ्याचे ढीग ओसंडून वाहू लागले आहेत, अशी माहिती फ्रान्स २४ या वृत्तवाहिनीने दिली. गुर्सेल डुर्नाज या सफाई कर्मचाऱ्याने ‘एपी’ वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, आम्ही नऊ दिवसांपासून आंदोलनस्थळी आहोत. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. लोकांना पुन्हा स्वच्छ शहर पाहायचे आहे, याची आम्हालादेखील कल्पना आहे. पण जर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी निवृत्तीचे वय वाढविण्याचा निर्णय मागे घेतला, तर पॅरिस तीन दिवसांत स्वच्छ होईल.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

नव्या पेन्शन योजनेबाबात कर्मचाऱ्यांमध्ये रोष का?

राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मांडलेल्या नव्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तीचे वय ६२ वरून ६४ केले जाणार आहे. सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५७ आहे तर सीव्हरेज साफ करणाऱ्या कामगारांचे निवृत्तीचे वय ५२ आहे. त्यांच्याही निवृत्ती वयात दोन वर्षांची वाढ करण्यात येणार आहे. या विधेयकातील तरतुदीला फ्रान्समधील सर्वच क्षेत्रांतील कामगार विरोध करत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, ऊर्जा आणि बंदरे या क्षेत्रांतील कामगारही संपावर आहेत.

कामगारांचे म्हणणे काय?

जे कामगार कमी वयात कामाची सुरुवात करतात, त्यांच्यासाठी हा अन्यायकारक निर्णय असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. सीजीटी युनियन या डाव्या संघटनेने या योजनेवर आक्षेप घेताना सांगितले की, चालक आणि वाहक म्हणून काम करणारे कामगार वयाच्या ५७ व्या वर्षी निवृत्त होत आहेत. नव्या बदलांनुसार त्यांना आणखी दोन वर्षे काम करावे लागेल. अवघड काम करणाऱ्या कामगारांना लवकर निवृत्ती मिळण्याची तरतूद या नव्या बदल्यात करण्यात यावी. या मागणीबाबत बोलताना सीजीटी युनियनने फ्रान्स २४ या वृत्तवाहिनीशी बोलताना सागंतिले की, सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कामगारांचे आयुर्मान हे देशातील इतर नागरिकांच्या तुलनेत १२ ते १७ वर्षांनी कमी आहे.

सरकारची भूमिका काय आहे?

फ्रान्स संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने या विधेयकाला शनिवारी मंजुरी दिली असून आता ते दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे अंतिम मंजुरीसाठी बुधवारी पाठविले जाणार आहे. हे विधयेक मंजूर करण्यासाठी २८७ मतांची गरज आहे. सरकारच्या सर्व २५० खासदारांनी या बदलांना पाठिंबा दिला, तरीदेखील इतर पक्षांतील ३७ खासदारांचा पाठिंबा सरकारला मिळवावा लागणार आहे.

त्यामुळे बुधवारचा दिवस सरकार आणि आंदोलन करणाऱ्या कामगारांसाठी महत्त्वाचा मानला जातो. फ्रान्समधील विविध कामगार युनियन एकत्र येऊन आठव्या देशव्यापी मोर्चाचे आयोजन करत आहेत. तसेच बंद कमऱ्याआड वरिष्ठ सभागृहाचे सात सदस्य आणि कनिष्ठ सभागृहाच्या सात सदस्यांसोबत बंद दाराआड युनियनची चर्चा होणार आहे. कामगारांचे या नव्या बदलाबाबत असलेले मत संसदेच्या दोन्ही सभागृहांना कळविण्यात येणार आहे.

नव्या पेन्शन योजनेवरून कामगार राग व्यक्त करत असतानाच जमेल ओचेन या सफाई कर्मचाऱ्याने सांगितले की, आम्ही फ्रान्ससाठी अदृश्य लोक आहोत का? आमच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. तर या आंदोलनावर प्रतिक्रिया देत असताना एका सामान्य व्यक्तीने सांगितले की, कामगारांना आंदोलनाचा अधिकार आहे. त्यांच्याकडे तशी कोणतीही शक्ती नाही. पण त्यांनी फक्त त्यांचे काम करणे थांबविले तरी मोठी शक्ती दिसून येते.