फ्रान्समधील सफाई कर्मचाऱ्यांचा सलग नवव्या दिवशी संप सुरू असल्यामुळे राजधानी पॅरिसमधील रस्त्यावर दुतर्फा हजारो टन कचरा साठला आहे. फ्रान्सच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात नवीन पेन्शन योजना विधेयक मांडले आहे, लवकरच ते दोन्ही सभागृहांत अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. या विधेयकामुळे फ्रान्सच्या सफाई कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढणार आहे. या विधेयकाच्या विरोधात फ्रान्सचे कर्मचारी आंदोलन करत आहेत. यामुळे पॅरिसच्या रस्त्यावर मंगळवारपर्यंत सात हजार टन कचऱ्याचा ढीग जमा झाला आहे. फ्रान्समधील इतर शहरांतही अशीच परिस्थिती आहे. देशाच्या राजधानीत कचऱ्याचे ढीग जमा झाल्यामुळे सर्वांचे लक्ष या आंदोलनाकडे वळले आहे. महाराष्ट्रात सध्या नवीन पेन्शन योजनेच्या विरोधात सरकारी कर्मचारी आंदोलन करत आहेत. अशीच परिस्थिती फ्रान्समध्येही दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॅरिसमध्ये सध्या काय परिस्थिती आहे?

पॅरिसच्या बाहेर घनकचरा व्यवस्थापन करणारे तीन प्लांट आहेत, तीनही प्लांट सध्या बंद असल्यामुळे शहराच्या कचराकुंड्यांतून कचऱ्याचे ढीग ओसंडून वाहू लागले आहेत, अशी माहिती फ्रान्स २४ या वृत्तवाहिनीने दिली. गुर्सेल डुर्नाज या सफाई कर्मचाऱ्याने ‘एपी’ वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, आम्ही नऊ दिवसांपासून आंदोलनस्थळी आहोत. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. लोकांना पुन्हा स्वच्छ शहर पाहायचे आहे, याची आम्हालादेखील कल्पना आहे. पण जर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी निवृत्तीचे वय वाढविण्याचा निर्णय मागे घेतला, तर पॅरिस तीन दिवसांत स्वच्छ होईल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why garbage is piling up in the streets of france kvg