Afghanistan vs New Zealand test match at Greater Noida Stadium: काही दिवसांपूर्वीच जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याकडे थेट क्रिकेटचं नियंत्रण करणाऱ्या संघटनेची सूत्रं आली. आयसीसीच्या प्रमुखपदी विराजमान होण्याआधीच जय शहा यांच्या अखत्यारीतील मैदान बीसीसीआयसाठी नामुष्की ठरली आहे. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव तटस्थ कसोटी सामन्यासाठी ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राऊंड मुक्रर करण्यात आलं. काही वर्षांपूर्वी बीसीसीआयनेच बंदी घातलेलं हे स्टेडियम नामुष्कीचं कारण ठरलं आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तिथे आंतरराष्ट्रीय सामन्यांचं आयोजन होऊ शकत नाही. यामुळे अफगाणिस्तान आपले सामने तटस्थ ठिकाणी होतात. सुरुवातीला त्यांचे सामने युएईत आयोजित करण्यात आले. त्यानंतर त्यांचे श्रीलंकेतील डंबुला इथे आयोजित करण्यात आले. यानंतर बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात सामंजस्य करार झाला. याअंतर्गत अफगाणिस्तानला ग्रेटर नोएडातलं स्टेडियम देण्यात आलं.

South Africa Fielding Coach Taken Field Instead of Player ODI Match vs New Zealand
VIDEO: क्रिकेटच्या मैदानावर घडली अनोखी घटना! वनडेमध्ये आफ्रिकेचे कोच खेळाडूच्या जागी फिल्डिंगसाठी उतरले, नेमकं काय घडलं?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Mahavitaran sports competition
महावितरण क्रीडा स्पर्धा; प्रसाद रेशमे, धनंजय औंढेकर यांच्या भागिदारीने क्रिकेट सामन्यात मुख्यालय विजयी
IND vs ENG Stampede scenes during 2nd ODI ticket sale in Cuttack few fans fall unconscious
IND vs ENG: भारत-इंग्लंड वनडे तिकिट विक्रीदरम्यान कटकमध्ये चेंगराचेंगरी, काही जण झाले बेशुद्ध; VIDEO व्हायरल
Black market for tickets started three days before cricket match
क्रिकेट सामन्याच्या तीन दिवसांपूर्वीपासूनच तिकिटांचा काळाबाजार…
Ranji Trophy Mumbai Haryana quarterfinal moved from Lahli to Kolkata at the last minute
Ranji Trophy: मुंबईच्या रणजी ट्रॉफी उपांत्य सामन्याचे ठिकाण अखेरच्या क्षणी बदलले, नेमकं काय आहे कारण? कुठे खेळवला जाणार सामना?
nta announced some changes to prevent malpractices during NEET UG exam
विश्लेषण : नीट यूजी परीक्षेतील अचानक केलेले बदल गोंधळ वाढवणारे?
U19 Eng vs SA bizarre run out as Aaryan Sawant video viral
U19 ENG vs SA : धक्कादायक! विचित्र रनआऊटच्या नादात थोडक्यात वाचला फिल्डर, VIDEO होतोय व्हायरल

काय आहे या मैदानाचा इतिहास

ग्रेटर नोएडातल्या या स्टेडियमवर २०१६ मध्ये दुलीप ट्रॉफीचे सामने खेळवण्यात आले. त्यानंतर रणजी करंडक स्पर्धेचे काही सामनेही झाले. त्याचवर्षी या मैदानाला आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनासाठी मंजुरी मिळाली. पण भारतात अन्य मैदानं खूप असल्यामुळे या मैदानावर कसोटीचं आयोजन झालं नाही. या मैदानाचा उपयोग व्हावा आणि अफगाणिस्तानला होम ग्राऊंड मिळावं यासाठी त्यांना हे मैदान देण्यात आलं. राजधानी दिल्लीत अफगाणिस्तान लोकसंख्या बरीच आहे. ग्रेटर नोएडातलं मैदान मुख्य दिल्लीपासून तास दीड तासाच्या अंतरावर आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला उत्तम पाठिंबाही मिळू शकतो. अफगाणिस्तान संघासाठी दिल्लीहून मायदेशी किंवा युएईत जाणंयेणं सोयीचं आहे. दिल्लीत अफगाणिस्तान संघाच्या राहण्याची चांगली व्यवस्था होऊ शकते. दिल्ली परिसरात सरावासाठी अन्य मैदानंही आहेत. हे सगळं लक्षात घेऊन अफगाणिस्तानला हे मैदान देण्यात आलं.

AFG vs NZ: टॉयलेटमध्ये धुतली भांडी; नोएडात आदरातिथ्याची लक्तरं; AFG vs NZ सामना होत असलेल्या स्टेडियमधील संतापजनक घटना

मैदान आहे कुठे?

ग्रेटर नोएडात नव्याने उभारण्यात आलेल्या अॅक्वा मेट्रोच्या मार्गावरच्या अल्फा आणि डेल्टा स्थानकांपासून जवळच हे मैदान आहे. भौगोलिकदृष्ट्या ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेशात येत असलं तरी मैदानाचं देखरेख आणि नियंत्रण ग्रेटर नोएडा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ऑथॅरिटीकडे आहे. शहीद विजय सिंग पथीक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स २०१० मध्ये उभारण्यात आला. जयपी ग्रुप स्पोर्ट्स सिटी अंतर्गत हे क्रीडा संकुल आहे. रेसिंगसाठी प्रसिद्ध बुद्ध इंटरनॅशनल ट्रॅकही याच परिसरात आहे. मूळ योजनेनुसार या मैदानात ४०,००० प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था होती. पण प्रत्यक्षात ८००० प्रेक्षकच बसू शकतील अशीच रचना आहे.

या मैदानावर बंदीची कारवाई का?

२०१७ मध्ये बीसीसीआयने या मैदानावर बंदीची कारवाई केली. या मैदानात एक खाजगी लीग आयोजित करण्यात आली होती. या लीगदरम्यान फिक्सिंग झाल्याचं बीसीसीआयच्या अँटी करप्शन विभागाला आढळलं. यामुळे मैदानावर बंदीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे बीसीसीआयतर्फे आयोजित सामन्यांचं आयोजन रद्द करण्यात आलं. पण आयसीसीकडून मंजुरी असल्यामुळे अफगाणिस्ताने याच मैदानावर आयर्लंडविरुद्ध मालिका आयोजित केली.

AFG vs NZ: अफगाणिस्तानचा संघ घरच्या मैदानावरील सामने भारतात का खेळतो? न्यूझीलंडविरूद्धची कसोटी मालिका नोएडामध्ये होणार

नोएडा स्टेडियमवर बंदी मग सामने कुठे?

अफगाणिस्तान संघाने बीसीसीआयकडे अन्य मैदानासाठी विनंती केली. बीसीसीआयने या विनंतीचा सकारात्मक विचार करत त्यांना डेहराडून तसंच लखनौच्या मैदानात खेळण्याची संधी दिली. अफगाणिस्तानने काही सामने डेहराडूनच्या स्टेडियमवर तसंच लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळले. पण लखनौ स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने होऊ लागले. आयपीएल स्पर्धेतल्या लखनौ सुपरजायंट्स संघाचं होमग्राऊंडही झालं. यामुळे अफगाणिस्तानने २०२२ मध्ये एमिरेट्स क्रिकेट बोर्डाशी करार केला. पाच वर्षांसाठी अफगाणिस्तानचे सामने तिथे होतील असं ठरलं. पण त्याकरता त्यांना युएईविरुद्ध दरवर्षी मालिका खेळणं अनिवार्य करण्यात आलं.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी नोएडाच्या स्टेडियमची का निवड झाली?

अफगाणिस्तानने या एकमेव कसोटीसाठी डेहराडून आणि लखनौ इथलं स्टेडियम मिळावं यासाठी बीसीसीआयला विनंती केली. पण या दोन्ही मैदानांवर राज्यांतर्गत ट्वेन्टी२० सामने सुरू आहेत. त्यामुळे ही मैदानं मिळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. भारताचा डोमेस्टिक हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशभरातल्या मैदानांवर सातत्याने सामने सुरू आहेत. या मैदानावर कुठलीही स्पर्धा किंवा सामने नव्हते त्यामुळे या सामन्यासाठी अफगाणिस्तानला हे मैदान देण्यात आलं.

नक्की काय घडलं?


दिल्लीत झालेल्या अवेळी पावसाने मैदानात जागोजागी पाणी साठलं. पाणी वाहून जाण्यासाठी मैदानात समाधानकारक ड्रेनेज यंत्रणा नाही. सोमवारी सकाळी ऊन पडलं पण मैदानात ओलसर पॅचेस असल्यामुळे खेळ सुरू होऊ शकला नाही. सोमवारी रात्री आणखी पाऊस झाला त्यामुळे मंगळवारीही एकही चेंडू न टाकता खेळ रद्द करण्यात आला. ग्राऊंडस्टाफने पंखे लावून ओलसर तुकडे वाळवण्याचा प्रयत्न केला. मैदानाचा एक भाग उकरून काढून नव्याने तयार करण्याचा प्रयत्नही झाला. या मैदानाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी मैदानात मूलभूत पायाभूत व्यवस्थाही नसल्याचं सांगितलं. या सामन्यासाठी जमलेल्या अफगाणिस्तानच्या चाहत्यांचीही निराशा झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओत, केटरिंग स्टाफ टॉयलेटमध्ये भांडी धुवत आहेत.

हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग नाही पण तरीही हा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना आहे. या सगळ्या गोंधळामुळे भारताची नाचक्की झाली आहे. श्रीलंकेचे कुमार धर्मसेना तसंच बांगलादेशचे शर्फुदोल्ला या सामन्याचे पंच आहेत. भारताचे नितीन मेनन तिसरे पंच आहेत. भारताचे माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ सामनाधिकारी आहेत. धर्मसेना आणि श्रीनाथ हे प्रदीर्घ अनुभव असलेले खेळाडू आणि अधिकारी आहेत. सामनाधिकाऱ्यांनी प्रतिकूल शेरा दिल्यास मैदान ब्लॅकलिस्ट केलं जाऊ शकतं.

Story img Loader