भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)चा हवामान उपग्रह INSAT-3DS शनिवारी (१७ फेब्रुवारी) ५.३५ वाजता श्रीहरिकोटा येथी सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आला. इस्त्रोने आपल्या १६व्या मोहिमेंतर्गत हवामान उपग्रह INSAT-3DS ला जिओसिंक्रोनस लॉंच व्हेईकल F14 (GSLV-F14)द्वारे त्याच्या अभिप्रेत कक्षेत यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला.

GSLV रॉकेटला ‘नॉटी बॉय’ हे टोपणनाव का देण्यात आले? GSLV आपल्या मोहिमेत अनेकदा अयशस्वी का ठरले?

ज्या रॉकेटद्वारे हवामान उपग्रह प्रक्षेपित केला गेला, त्या रॉकेटचे टोपणनाव ‘नॉटी बॉय’ असे आहे. GSLV रॉकेटला ‘नॉटी बॉय’ हे टोपणनाव देण्यात आले. कारण- या रॉकेटच्या मागील १५ प्रक्षेपणांपैकी किमान चार प्रक्षेपणे अयशस्वी ठरली. त्या तुलनेत इस्रोचे वर्कहॉर्स PSLV (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण रॉकेट) आतापर्यंतच्या ६० पैकी केवळ तीन मोहिमांमध्ये अपयशी ठरले; तर LVM-3 त्याच्या सातही मोहिमांमध्ये यशस्वी राहिले. या रेकॉर्डमुळेच GSLV रॉकेटचे नाव ‘नॉटी बॉय’ असे पडले.

ISRO docked SpaDeX satellites space
ISRO Mission : इस्रोची आणखी एक मोहीम फत्ते, अवकाशात दोन उपग्रहांची केली यशस्वी जोडणी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
India successfully tests anti tank missile Nag Mk 2
शत्रूचा थरकाप उडवणाऱ्या ‘नाग’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; पाकिस्तान-चीनच्या कारवायांना चाप बसणार?
pm narendra modi launches mission mausam
‘मिशन मौसम’ला सुरुवात; हवामान विभाग भारतीयांच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतिक, पंतप्रधानांचे गौरवोद्गार
150 years of India Meteorological Department
अपुरी साधनसामग्री ते अद्यायावत तंत्रज्ञान
spadex satellites successfully come 3 meters to each other says isro
‘स्पाडेक्स’ मोहिमेत दोन्ही उपग्रह तीन मीटर अंतरावर
Company DCX Systems Limited Overview in marathi
माझा पोर्टफोलिओ : देशाच्या संरक्षण सिद्धतेतील सच्चा भागीदार – डीसीएक्स सिस्टीम्स  
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….

GSLV रॉकेटमध्ये क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात येते; ज्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वायू द्रव स्वरूपात असतात. जुन्या प्रक्षेपण वाहनांमध्ये वापरण्यात येणार्‍या इंजिनांपेक्षा याचे इंजिन पूर्णपणे वेगळे असते. ऑगस्ट २०२१ मध्ये जेव्हा GSLV-F10 पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-03 घेऊन जात होते, त्यावेळी प्रक्षेपणाच्या पाच मिनिटांच ते आपल्या नियोजित मार्गावरून भरकटले. परंतु, GSLV ने पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही टप्प्यांमध्ये यावेळी व्यवस्थित काम केले होते. मात्र, GSLV मधील द्रव स्वरूपातील हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वायू क्रायोजेनिक इंजिनाला हवी तितकी ऊर्जा पोहोचवू शकले नाहीत. त्यामुळे अग्नी प्रज्वलित झाली नाही. याच कारणाने रॉकेट अधिक वरती जाऊ शकले नाही आणि ते उपग्रहासह अंदमान समुद्रात पडले.

याच समस्येमुळे एप्रिल २०१० मध्ये देखील GSLV-D3 अपयशी ठरले होते. रशियन डिझाइनवर आधारित स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन असलेल्या GSLV चे ते पहिलेच उड्डाण होते. ऑगस्ट २०२१ च्या मोहिमेतही तेच घडले. क्रायोजेनिक स्थितीमध्ये अग्नी प्रज्वलित न झाल्यामुळे या मोहिमेत चार वेळा इस्त्रोला अपयश आले. १९९० च्या दशकात झालेल्या कराराचा भाग म्हणून रशियाने पुरवलेल्या सातपैकी शेवटच्या क्रायोजेनिक इंजिनाद्वारे आठ महिन्यांनंतर पुढील प्रक्षेपण झाले; परंतु यातदेखील अपयशच हाती आले. क्रायोजेनिक इंजिन खराब झाल्यामुळे ही मोहीम अयशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. यंदाची मोहीम ही रॉकेटची १६ वी मोहीम आहे; तर स्वदेशी विकसित क्रायोजेनिक इंजिन वापरून केलेले हे १० वे प्रक्षेपण आहे.

INSAT-3DS देणार अचूक हवामान अंदाज

INSAT-3DS हा उपग्रह समुद्र, हवामान बदल आणि आगामी आपातकालीन स्थितीची अचूक माहिती देईल. जमीन, समुद्र व पर्यावरणावर स्पेक्ट्रम वेवलेंथद्वारे लक्ष ठेवेल. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या हवामान बदलाची माहिती वैज्ञानिकांपर्यंत पोहोचवेल. त्यामुळेच भारतातील हवामान संस्थांसाठी या उपग्रहाचे प्रक्षेपण महत्त्वाचे मानले जात आहे. GSLV-F14 ने आपल्या १६ व्या मोहिमेत उपग्रहाला यशस्वीरीत्या आपल्या कक्षेत पोहोचवले आहे. २० मिनिटाच्या उड्डाणानंतर रॉकेट आणि उपग्रह वेगवेगळे झाले. GSLV ची लांबी ५१.७ मीटर होती; ज्यात तीन भाग होते. याचे वजन ४२० टन होते.

हेही वाचा : कुत्र्याला अमानुष मारहाण; प्राणी संरक्षण कायद्यात बदल होणार? 

आपल्या नियोजित कक्षेत गेलेल्या INSAT-3DS उपग्रहाचे वजन २,२७४ किलो आहे. योग्य रीत्या कार्यान्वित झाल्यानंतर भारतीय हवामान विभाग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, इंडियन नॅशनल ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस सेंटर आणि नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग यांसारख्या विभागांना उपग्रहामुळे मदत मिळणार आहे.

Story img Loader