देशातील दुसरी सर्वांत मोठी सेवा निर्यातदार कंपनी असणाऱ्या ‘इन्फोसिस’ने कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय पुढे ढकलला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगारवाढीची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कंपनीने २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने नफ्यात जवळपास पाच टक्क्यांची वाढ नोंदवल्यानंतर काही महिन्यांनी हा निर्णय समोर आला आहे. कंपनीने नोव्हेंबर २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांना शेवटची पगारवाढ दिली होती. पण काय झाले? या निर्णयामागील कारण काय? नारायण मूर्ती यांची भूमिका काय? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमके प्रकरण काय?

‘मनीकंट्रोल’मधील एका वृत्तानुसार, ‘इन्फोसिस’ने २०२५ च्या चौथ्या तिमाहीत आपल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देणार असल्याचे सांगितले आहे. पगारवाढ सामान्यतः वर्षाच्या सुरुवातीला दिली जाते. कंपनीने ऑक्टोबरमध्ये दावा केला होता की, ते चौथ्या तिमाहीत टप्प्याटप्प्याने वेतनवाढीचे नियोजन करतील. “त्यातील काही भाग जानेवारीमध्ये लागू होईल आणि उर्वरित एप्रिलमध्ये,” असे मुख्य वित्तीय अधिकारी जयेश संघराजका यांनी सांगितले. कंपनीने २०२४-२५ मध्ये जुलै-सप्टेंबर या कालावधीत कंपनीच्या उत्पन्नात ६,५०६ कोटी रुपयांची वाढ झाली. हा नफा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ४.७ टक्क्यांनी अधिक असल्याचे सांगण्यात आले. मागील तिमाहीतील निव्वळ नफ्यापेक्षा हा आकडा २.२ टक्क्यांनी जास्त होता. जागतिक मागणीतील अनिश्चितता आणि आयटी सेवांवरील खर्चातील घट यांमुळे कर्मचाऱ्यांची पगारवाढ पुढे ढकलली गेली असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : ‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?

‘इंडिया टुडे’ने मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या विश्लेषकांनी दिलेल्या माहितीचा उल्लेख करीत म्हटले आहे की, कामाचे दिवस कमी असल्यामुळे डिसेंबर तिमाहीत मार्जिनचा दबाव अपेक्षित आहे. परंतु, त्यात म्हटले आहे की किमतीत वाढ, उपकंत्राटदार ऑप्टिमायजेशन आणि प्रोजेक्ट मॅक्सिमस (इन्फोसिसची मार्जिन सुधारणा योजना) या समस्यांचा सामना करण्यास कंपनीला मदत करेल. इन्फोसिसने सलग सहा तिमाही कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट केल्यानंतर सप्टेंबर तिमाहीत केवळ २,५०० कर्मचारी जोडले होते. असे करणारी इन्फोसिस कंपनी एकटी नाही. ‘मनीकंट्रोल’नुसार, HCLTech, LTIMindtree व L&T टेक सर्व्हिसेसनेदेखील खर्च आणि नफ्याच्या नावाखाली पगारवाढ करण्यास विलंब केला आहे.

नारायण मूर्ती यांनी गेल्या वर्षी भारतीयांनी आठवड्याला किती तास काम करावे, याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

“आम्ही पगारातील सुधारणा पुढे ढकलली होती. आम्ही आता या तिमाहीत ऑक्टोबरपासून वेतन सुधारणेसह पुढे जाणार आहोत. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये मध्यम आणि वरिष्ठ व्यवस्थापन वेतनवाढ घेणार नाहीत. परंतु, आमच्या ९० टक्के कर्मचाऱ्यांना आम्ही या काळात वेतनवाढ देऊ,” असे ‘HCLTech’चे मुख्य लोक अधिकारी रामचंद्रन सुंदरराजन यांनी २०२३ मध्ये सांगितले होते. LTIMindtree चे कार्यकारी अधिकारी व एमडी देबाशीष चॅटर्जी यांनी सांगितले की, ते आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीत पगारवाढ वाढ मिळेल. कंपनीने यापूर्वी आर्थिक वर्ष २०२४ मध्ये पगारवाढ करण्यास विलंब केला होता. काही कर्मचाऱ्यांना एक ते तीन टक्क्यांपर्यंत कमी वेतनवाढ मिळाली; तर काहींना पगारवाढच मिळाली नाही.

असे का घडतेय?

असे दिसून आले आहे की, जेव्हा जगभरात मागणी वाढते तेव्हा आयटी कंपन्यांना अनिश्चिततेचा सामना करावा लागतो. ‘मनीकंट्रोल’च्या म्हणण्यानुसार आयटी कंपन्या स्थूल आर्थिक चिंता आणि ग्राहक त्यांचा खर्च पुढे ढकलत आहेत. तज्ज्ञांनी ‘मनीकंट्रोल’ला सांगितले की, या विलंबामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी बाहेर पडण्याची शक्यता आहे. नोकरी टिकवून ठेवणे सध्याच्या वातावरणात खूप मोठी गोष्ट आहे, असेही ते म्हणाले. जानेवारीमध्ये ‘मिंट’ने नोंदवले की टीसीएस, Infosys व HCL Technologies कंपन्यांमध्ये अनुक्रमे ०.४ टक्के, १.० टक्के व ३.७ टक्के अशी स्थिर चलन महसूलवाढ होण्याची शक्यता आहे. ‘इन्फोसिस’ने म्हटले आहे की, ते एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या आर्थिक वर्षासाठी ३.७५ टक्के आणि ४.५ टक्के यादरम्यान स्थिर चलन महसूलवाढीची अपेक्षा करीत आहेत.

कामाच्या तासासंदर्भात नारायण मूर्ती यांचे विधान

नारायण मूर्ती यांनी गेल्या वर्षी भारतीयांनी आठवड्याला किती तास काम करावे, याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांच्या मते, भारतीयांनी आठवड्याला ७० तास काम करायला हवे. याचाच अर्थ दिवसाला १० तास आणि एकही सुट्टी न घेता, आपण काम केले पाहिजे, अशी भूमिका नारायण मूर्तीं यांनी मांडली होती. ते स्वत: ‘इन्फोसिस’च्या स्थापनेवेळी आठवड्याला ८५ ते ९० तास काम करायचे, असे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यावेळी त्यांच्या या भूमिकेवर अमानवी असल्याची टीकाही झाली होती. त्यानंतर अनेक मुलाखतींत ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते.

आयटी क्षेत्राची स्थिती काय?

सध्या आयटी क्षेत्राची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे कंपन्यांना पगारवाढ थांबली तरीही कर्मचारी राजीनामा देण्याची शक्यता कमी असल्याची खात्री आहे. सध्याचे वातावरण बघता, नोकरी टिकवून ठेवणे कर्मचाऱ्यांसाठी मोठे आव्हान आहे, असे उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे सांगणे आहे. इन्फोसिससह काही आयटी कंपन्यांनी पगारवाढीचा निर्णय स्थगित केल्याने या क्षेत्रातील आव्हाने वाढण्याची शक्यता आहे. आयटी कंपन्यांना कंपनीच्या नफ्यासह कर्मचाऱ्यांच्या पगारातही समतोल साधावा लागतो.

हेही वाचा: न्यूझिलंडचा व्हिसा नियमांमध्ये बदल; भारतीयांना होणार फायदा की बसणार फटका?

यात अडचणी आल्यास कर्मचारी मोठ्या संख्येने राजीनामा देऊ शकतात आणि पगारवाढीमुळे कंपनीच्या नफ्यावरही परिणाम होऊ शकतो. सध्या आयटी क्षेत्राची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे कंपन्यांना पगारवाढ थांबली तरीही कर्मचारी राजीनामा देण्याची शक्यता कमी असल्याची खात्री आहे. सध्याचे वातावरण बघता, नोकरी टिकवून ठेवणे कर्मचाऱ्यांसाठी मोठे आव्हान आहे, असे उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे सांगणे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why has infosys deferred salary hikes rac