विमान वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असल्यामुळे अनेक देशांचे हवाई वाहतूक नियामक मंडळ काळजी घेताना दिसते. वैमानिक आणि क्रू सदस्यांचे आरोग्य चांगले असावे, त्यांना कोणत्याही शारीरिक अडचणी नसाव्यात आणि कामावर असताना त्यांनी कोणतेही व्यसन करू नये, यासाठी प्रयत्न केले जातात. वैमानिकांनी कामावर असताना मद्य प्राशन केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येत असते. मात्र आता प्रस्तावित कायद्यानुसार वैमानिकांच्या परफ्यूम, माउशवॉश वापरावरही बंदी येऊ शकते. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) एक नवीन कायदा प्रस्तावित करत असून यानुसार वैमानिक आणि क्रू सदस्यांनी श्वासोच्छवास चाचणीआधी परफ्यूम आणि माउथवॉश वापरण्यावर बंदी आणली आहे. परफ्यूम आणि माउथवॉशमध्ये सामान्यपणे अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते त्यामुळे श्वासोच्छवास चाचणी पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यामुळे डीजीसीए नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने या मसुद्याची माहिती दिली आहे. “क्रू सदस्यांनी कोणतेही औषध घेऊ नये आणि माउथवॉश, टुथ जेल, परफ्यूम किंवा अल्कोहोलचा अंतर्भाव असलेल्या कोणत्याही वस्तू वापरू नयेत ज्यामुळे श्वासोच्छवास चाचणीवर परिणाम होईल. जे क्रू सदस्य औषधोपचार घेत आहेत, त्यांनी उड्डाणापूर्वी कंपनीच्या डॉक्टरशीच सल्लामसलत करावी.” डीजीसीए प्रमुखांनी सांगितले की, नागरी विमान वाहतूक आवश्यकता (Civil Aviation Requirements) अंतर्गत हा मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्याला सार्वजनिक मंचावर ठेवून त्यावर प्रतिक्रिया मागितल्या जाणार आहेत.

pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा
Jet Airways re flight possibilities end Supreme Court orders liquidation of company
जेट एअरवेजच्या फेर-उड्डाणाची शक्यता संपुष्टात; सर्वोच्च न्यायालयाचा कंपनी अवसायानांत काढण्याचे आदेश
st mahamandal employees
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये ‘दिवाळी भेट’ची आशा पुन्हा पल्लवीत, नवीन घडामोडी जाणून घ्या…

हे वाचा >> विमानाने उड्डाण घेतल्यानंतर पायलटला रस्ता कसा माहित होतो? यामागचं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

श्वासोच्छवास चाचणीवर परफ्यूमचा परिणाम

मैकिनी शहरातील फौजदारी वकील टेरी डॅनियल यांच्यामते, परफ्यूम श्वासोच्छवास चाचणीवर परिणाम करू शकतो. जर तुम्ही अल्कोहोल मिश्रित वस्तू वापरणार असाल तर श्वासोच्छवास चाचणीमध्ये अल्कोहोल डिटेक्ट होऊ शकते, ज्यामुळे चाचणीचा अहवाल चुकीचा येण्याची शक्यता आहे. “‘टूथपेस्ट, आफ्टरशेव्ह, हँड सॅनिटायझर, ब्लिच, माउथवॉश, परफ्यूम आणि कोलोग्ने या वस्तूंमध्ये अल्कोहोलचे प्रमाण बऱ्यापैकी असते.”, असेही डॅनियल यांनी त्यांच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.

सदर वस्तूंवर बंदी आणून खोट्या सकारात्मक श्वासोच्छवास चाचण्यांचा धोका कमी करणे आणि विमान वाहतूक सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अल्कोहोल मिश्रित वस्तूंवर निर्बंध आणल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणावरून कोणतीही तडजोड होणार नाही, अशी आशा डिजीसीएला वाटते. डिजसीएच्या अधिकृत हवाई सुरक्षा मानकांना ऑगस्ट २०१५ मध्ये मान्यता देण्यात आली होती. आता सुचविलेले नवीन बदल ५ ऑक्टोबरपर्यंत सूचना आणि शिफारशींसाठी खुले करण्यात आले आहेत.

मद्याबाबत भारतात कठोर नियम

भारतात मद्याच्या बाबतीत क्रू सदस्यांना अतिशय कडक नियमावलीचे पालन करावे लागते. ‘नागरी विमान वाहतूक आवश्यकता नियम’ यानुसार विमानातील सर्व फ्लाईट क्रू आणि केबिन क्रू सदस्य यांची ड्युटी सुरू होण्यापूर्वी विमानतळावर श्वासोच्छवास चाचणी घेतली जाते. या चाचणीदरम्यान मद्याचा थोडासाही अंश सापडल्यास चाचणी पॉझिटिव्ह येते आणि परिणामस्वरुप वैमानिकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जातो. तसेच मार्गदर्शक सूचनानुसार, श्वासोच्छवास चाचणी कॅमेऱ्यासमोर घेतली जावी आणि त्याचा रेकॉर्ड सहा महिन्यांसाठी राखून ठेवला जावा.

डिजीसीएच्या नियमानुसार, विमानाचे उड्डाण आणि मद्य प्राशन करणे यात १२ तासाचे अंतर असणे आवश्यक आहे. जे वैमानिक पहिल्यांदा या चाचणीत दोषी आढळतात, त्यांना तीन महिन्यांसाठी विमान उड्डाणापासून दूर ठेवण्यात येते. जर तोच व्यक्ती दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास तीन वर्षांसाठी काम करण्यापासून प्रतिबंधित करण्यात येते आणइ तिसऱ्यांदा गुन्हा घडल्यास पायलटचा परवाना रद्द करण्यात येतो.

डिजीसीएच्या माहितीनुसार, परफ्यूम, माउथवॉश अशा वस्तूंमुळे चाचणीवर परिणाम होतात, ज्यामुळे चुकीचे निकाल मिळू शकतात. आता कायद्यात बदल झाल्यानंतर वैमानिक आणि क्रू सदस्यांना जी कायदेशीर पळवाट मिळते, त्यावर अटकाव घालण्यात येऊ शकतो.

हे वाचा >> DGCA चं ‘एअर इंडिया’विरोधात कारवाईचं पाऊल; गैरकृत्यांबाबत पाठवली नोटीस

विमान वाहतुकीमधील व्यसनाची समस्या

जगभरातील विमान वाहतूक क्षेत्रात वैमानिकांमध्ये मद्य प्राशन करण्याची समस्या आढळून आली आहे. नागरी वाहतूक संकेतस्थळावरील माहितीनुसार मागच्या वर्षी ४१ भारतीय वैमानिक आणि ११६ केबिन क्रू सदस्यांचा परवाना तात्पुरत्या काळासाठी निलंबित करण्यात आला होता. हे सर्व लोक श्वासोच्छवास चाचणीमध्ये दोषी आढळले होते. २०१८ मध्ये, जपान एअरलाइन्सचे वैमानिक कात्सुतोशी जित्सुकावा यांना १० महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. विमानाचे उड्डाण झाल्यानंतर काही वेळातच केलेल्या श्वासोच्छवास चाचणीनंतर त्यांच्या रक्ता अल्कोहोलची पातळी कायदेशीर मर्यादेच्या पुढे नऊ पट असल्याचे उघड झाले.

युनायटेड स्टेट्समध्ये गॅब्रिएल लाइल श्रोडर नावाच्या डेल्टा पायलटला मद्यधूंद अवस्थेत असल्याच्या संशयावरून उड्डाणासाठी तयार असलेले प्रवाशांनी भरलेले विमान रोखून धरण्यात आले, अशी माहिती सीएनएनने दिली आहे.