T20 World Cup Why is it raining so much in Australia: टी-२० विश्वचषक स्पर्धेतील चुरस वाढली आहे. पहिल्या गटामधून आज न्यूझीलंडचा संघ उपांत्यफेरीमध्ये पात्र ठरला असून दुसऱ्या गटात भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये पहिल्या दोन स्थानांसाठी चढाओढ सुरु आहे. मात्र ऑस्ट्रेलियामधील या स्पर्धेमध्ये पावसाने अनेक रंजक सामन्यांमधील हवाच काढून टाकल्याचं पहायला मिळालं.

नक्की वाचा >> Ind vs Zim: शेवटच्या सामन्यात पाऊस पडला तर…; पाकिस्तानपेक्षा कमी नेट रन रेट असल्याने भारत स्पर्धेबाहेर पडणार की…

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
U19 Asia Cup Final Bangladesh Beat India by 59 Runs And Successfully Defend the Title INDU19 vs BANU19
IND U19 vs BAN U19: बांगलादेशची पोरं हुशार; युवा भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद

अनेक सामने तर एकही चेंडू न खेळवता रद्द करण्यात आले. याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सर्वच संघांना फटका बसला आहे. या स्पर्धेमधील पावसाची बॅटींग पाहून अनेकांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमक मंडळाला जगातील इतर कोणताही देश सापडला नाही का स्पर्धा भरवायला असे खोचक प्रश्नही विचारले आहेत. मात्र या साऱ्या गोंधळामध्ये ऑस्ट्रेलियात सध्या म्हणजेच इयर एण्डला एवढा पाऊस का पडतोय असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. याच प्रश्नांची उत्तर आणि पावसाचा यापूर्वी विश्वचषक स्पर्धांवर कधी परिणाम झाला हे जाणून घेऊयात…

नक्की वाचा >> विराटने ‘फेक फिल्डींग’ केली म्हणजे नेमकं काय केलं? त्याच्यावर कारवाई होऊ शकते का? भारताला बसणार का फटका?

पावसामुळे नेमके किती सामने झाले रद्द
या स्पर्धेत पावसाचा सर्वात पहिला फटका अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड सामन्याला बसला. एकही चेंडू न खेळता हा सामना रद्द करुन दोन्ही संघांना एक एक गुण वाटून देण्यात आला. अफगाणिस्तानच्या तीन सामन्यांपैकी दोन सामने पावसामुळे रद्द झाले. तर एका सामन्यात पावसामुळेच त्यांचा पराभव झाल्याचं सांगितलं जातं. टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनानुसार सुपर १२ च्या फेरीमध्ये पावसामुळे सामना झाला नाही तर पुढील दिवशी म्हणजेच एखाद्या राखीव दिवशी खेळवला जात नाही. राखीव दिवसाची तरतूद उपांत्यफेरीतील सामन्यांसाठी आहे. या स्पर्धेतील सुपर १२ मधील १४ सामन्यांपैकी चार सामने रद्द करण्यात आले. यापैकी तीन सामने हे मेलबर्नमधील तर एक होबार्टमधील होता.

नक्की वाचा >> Ind vs Ban: याला म्हणतात Sportsmanship… भारताच्या विजयानंतर विराट डायनिंग हॉलमध्ये बसलेल्या लिटन दास जवळ गेला अन्…

कोणत्या सामन्यांना बसला फटका?
या स्पर्धेमध्ये इंग्लंडला आयर्लंडने पराभूत करण्यासाठीही पाऊसच कारणीभूत ठरला. पावसाचा व्यत्यय आल्यानंतर इंग्लंड या सामन्यात पाच धावांनी पराभूत झाला. भारतालाही बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय आल्याने फायदा झाल्याची सोशल मीडियावर रंगली होती. खास करुन पाकिस्तानी समर्थकांनी ट्वीटरवर अशापद्धतीचे अनेक दावे केले होते. भारताने डकवर्थ-लुईस-स्टेन पद्धतीनुसार हा सामना पाच धावांनी जिंकला होता. मात्र एकीकडे पाकिस्तानी चाहते दुसऱ्या संघांवर पावसाची मदत घेतल्याचे दावे करत असतानाच स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी पाकिस्तानला महत्त्वाचा असणारा ३ नोव्हेंबरच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील विजय हा पावसामुळेच मिळाल्याचंही दिसून आलं. डकवर्थ-लुईस-स्टेन पद्धतीनुसार हा सामना पाकिस्तानने ३३ धावांने जिंकून नेट रन रेटच्या जोरावर आपलं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे.

नक्की वाचा >> Ind vs Ban: बॅट, बॉलऐवजी हातात ब्रश घेत ‘त्याने’ भारतीय संघाला जिंकून दिला सामना; जाणून घ्या या व्यक्तीनं नेमकं केलं तरी काय

ऑस्ट्रेलियात आभाळ का फाटलंय?
या वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियामधील हवामान खात्याने वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये देशभरात मोठ्या प्रमाणात पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त केली होती. सामान्य सरासरीपेक्षा अधिक पावसासाठी अल निना प्रभाव कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. मध्य आशियाई महासागराबरोबरच या भागातील सर्वात ठिकाणी पाण्याच्या थेट संपर्कात असणारी जमिनी लगतची हवा थंड होते. अशाप्रकारे लहान मोठ्या जलसाठ्यांमधील पाणी पातळीला लागून असलेल्या हवेचं तापमान कमी झाल्याने जी परिस्थिती निर्माण होते त्यालाच अल निना असं म्हटलं जातं.

नक्की वाचा >> विश्लेषण: नेट रन रेटवर पाकिस्तान In की Out ठरणार? पण NRR कॉलमखाली दिसणारा ‘नेट रन रेट’ म्हणजे काय? तो कसा मोजतात?

मेलबर्नमध्ये सरासरीपेक्षाही अधिक पाऊस
ऑस्ट्रेलियामध्ये प्रामुख्याने हिवाळा आणि उन्हाळा हे दोन ऋतू असतात. अद्याप तेथील उन्हाळ्याला प्रारंभ जालेला नाही. मात्र एक ऋतू संपून दुसरा सुरु होण्यादरम्यानच्या वातावरणातील बदलांमुळेही सध्याचे परिणाम दिसून येत असल्याचं सांगितलं जातं आहे. मेलबर्नमध्ये ऑक्टोबर महिन्यातील सरासरी पाऊस हा ६५ मिलीमीटर इतका असतो. यंदाच्या वर्षी या शहरामध्ये १२० मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. मेलबर्नमध्येच १३ नोव्हेंबर रोजी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत अशीच परिस्थिती ऑस्ट्रेलियामध्ये कायम राहणार आहे. सुदैवाने उपांत्यफेरीमधील सामने हे सिडनी, अॅडलेड, पर्थ, ब्रिसबेनच्या मैदानांवर होणार असून या ठिकाणी पावसाची अधिक शक्यता नाही.

नक्की वाचा >> गोलंदाजाच्या हाताने स्टम्प पडल्यानंतरही कार्तिकला Ind vs Ban सामन्यात धावबाद घोषित का केलं? समजून घ्या यामागील कारण

१३ चेंडू २२ धावांवरुन एक चेंडू २२ धावा…
१९९२ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिकेला १३ चेडूंमध्ये २२ धावांची आवश्यकता असताना पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. इंग्लंडविरुद्धच्या सिडनी क्रिकेट मैदानातील या सामन्यामध्ये पावसानंतर जे काही घडलं ते आजही अनेकदा सामन्यादरम्यान पाऊस पडल्यावर आवर्जून आठवतं. या मालिकेसाठी पावसाचा व्यत्यय आल्यास तयार करण्यात आलेल्या नियमांचा आधार घेण्यात आला. या नियमानुसार दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू पाऊस थांबल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आले तेव्हा त्यांना एका चेंडूंमध्ये २२ धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं. अर्थात दक्षिण आफ्रिका या सामन्यात पराभूत झाला.

नक्की पाहा >> Ind vs Ban: के. एल. राहुलचा हा थ्रो ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट; Rain Break नंतर दुसऱ्याच चेंडूवर काय घडलं पाहा Video

संघांची परिस्थिती काय?
सामान्यपणे वर वर जरी सर्व संघ आम्ही आहे त्या परिस्थितीला जुळवून घेतो असं सांगत असेल तरी दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाच सामने खेळणाऱ्या संघांवरही पावसाचं दडपण असतं. पाऊस पडल्यानंतर खेळाचं नियोजन बदलण्यापासून ते पावसानंतर मैदानात उतरताना काळजी घेण्यापर्यंत अनेक गोष्टींचा विचार खेळाडूंना संघ म्हणून आणि वैयक्तिक स्तरावर करावा लागतो.

Story img Loader