वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता वारंवार खालावत चालली आहे. सध्या मुंबई आणि परिसरातील हवा अत्यंत वाईट असल्याची नोंद झाली आहे. देशातील प्रदूषित शहर अशीच ख्याती असलेल्या दिल्लीपेक्षाही मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये मुंबईची गणना झाली. त्यानंतर पावसाळ्यात हवेचा दर्जा काहीसा सुधारला. मात्र, मोसमी पावसाने मुंबईचा निरोप घेताच पुन्हा एकदा मुंबईच्या हवेत प्रदूषके साचून राहू लागली आहेत. मुंबईला गेले काही दिवस धुरक्याने वेढले आहे. मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण का वाढले, प्रदूषणाचे प्रमाण कसे निश्चित केले जाते याचा आढावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबईतील प्रदूषण का वाढते आहे?
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याचे विविध संस्थांनी सादर केलेल्या अहवालांतून दिसते. दरवर्षी साधारणपणे थंडीची चाहूल लागताच मुंबईच्या हवेचा दर्जाही ढासळू लागतो. गेल्या वर्षी (२०२२) डिसेंबर, यंदा जानेवारी, फेब्रुवारीमध्ये मुंबईच्या हवेची स्थिती वाईट झाली ती अगदी मार्च अखेरपर्यंत होती. पावसाळ्यानंतर मुंबईतील वाऱ्यांची स्थिती बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धुलीकण हवेतच तरंगत राहतात. या नैसर्गिक कारणांबरोबच अनेक मानवनिर्मित कारणेही मुंबईच्या प्रदूषणात भर घालत आहेत. पायाभूत सुविधा, रहिवासी व व्यावसायिक संकुले, नवे प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अति-अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतात.
हेही वाचा – इजिप्त आणि इतर अरब राष्ट्र पॅलेस्टिनी निर्वासितांना का स्वीकारत नाहीत?
प्रदूषणाचे प्रमाण कसे ठरते?
अगदी सरधोपटपणे सांगायचे तर हवेतील प्रदूषकांचे प्रमाण किती यावर हवेचा गुणवत्ता निर्देशांक निश्चित होतो. धुलीकणांचे मोजमाप हे प्रति घनमीटर क्षेत्रात किती धुलीकण आहेत त्यानुसार केले जाते. तसेच धुलीकणाचे आकारमान पीएम २.५ आणि पीएम १० अशा प्रमाणात निश्चित होते. अतिसूक्ष्म धुलीकण म्हणजे पीएम २.५ हा हवेत विरघळलेला एक छोटासा पदार्थ असून या कणांचा व्यास २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असतो. पीएम २.५ ची मात्रा जास्त असते तेव्हा धुरक्याचे किंवा धुलीकणांचे प्रमाण वाढून दृश्यमानतेची पातळी घसरते. अतिसूक्ष्म धुलीकणापेक्षा किंचित मोठा म्हणता येईल असा पण १० मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यासाच्या धुलीकणाला पीएम १० म्हटले जाते. हवेच्या गुणवत्ता निर्देशांकानुसार (एक्यूआय) हवेची गुणवत्ता ठरते. ठराविक कालावधीत हवेतील प्रदूषकांचे प्रमाण किती त्यानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक निश्चित केला जातो. राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकानुसार एक्यूआयची स्थिती ०-१०० असल्यास ठीक, १०१-२०० असल्यास सामान्य, २०१-३०० वाईट, ३०२-४०० अत्यंत वाईट, ४०० पेक्षा जास्त असल्यास धोक्याची पातळी ओलांडलेली असून चिंताजनक परिस्थिती असते.
प्रदूषण आटोक्यात कसे आणता येईल?
मुंबईत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. परिणामी मुंबईतील बांधकामांतून माती, सिमेंटचे कण मोठ्या प्रमाणात हवेत मिसळतात. तसेच वाहने, कारखान्यांमधून येणारा धूर व रसायनांमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. त्यावर निर्बंध आणणे गरजेचे आहे. बांधकामाच्या वेळा निश्चित करणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन केले जात आहे का याची खात्री करण्याची आवश्यकता असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मुंबईतील वाढत्या धुरक्यावर उपाय म्हणून मुंबईत धुरके शोषक यंत्रे (ॲन्टी स्मॉग गन) बसवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या यंत्रातून पाणी फवारले जाते. त्यामुळे काही प्रमाणात धूळ जमिनीवर बसते. दिल्लीमध्ये २०१७ पासून अशा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याच्या परिणामकारतेबाबत मतांतरे आहेत.
हेही वाचा – विश्लेषण: स्मार्ट मीटरचे फायदे की तोटे?
हवेचा दर्जा ढासळलेला असताना काळजी काय घ्यावी?
प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार वाढत आहेत. श्वसन विकारात दमा, क्षयरोग, न्युमोनिया, फुप्फुसे कर्करोग, श्वसन नलिकेला सूज, दम लागणे असे विकार, तर त्वचेची अॅलर्जी, त्वचा कोरडी राहणे, फाटणे, लाल होणे, खाज येणे अशा समस्यांचे प्रमाण वाढते आहे. ताप येणे, डोळे दुखणे, घसा दुखणे आदी आजार उद्भवत आहेत. सकाळी आणि सायंकाळी धुरक्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. थंड पेये प्राशन, तेलकट खाणे वर्ज्य करावे. लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी. बाहेर पडताना मुखपट्टी वापरावी असे सल्ले तज्ज्ञांनी दिले आहेत.