रशियाने युक्रेनवर युद्ध लादल्यानंतर प्रथमच, मॉस्कोमधील संरक्षण मंत्रालयात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आपले विश्वासू संरक्षणमंत्री सर्गेई शोईगू यांची उचलबांगडी केल्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अनेक बड्या लष्करी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. हे कशामुळे घडत आहे, या अटकसत्राला पुतिन यांचा पाठिंबा आहे का, युक्रेन युद्धावर याचा काय परिणाम होऊ शकेल, आदी मुद्द्यांचे हे विश्लेषण….

भ्रष्टाचाराबद्दल कुणाकुणाला अटक?

माजी उपसंरक्षण मंत्री तिमूर इव्हानोव्ह यांना एप्रिल महिन्यात अटक झाली. संरक्षण मंत्रालयातील कथित भ्रष्टाचारात अटक झालेले ते पहिले आणि सर्वांत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. सैन्याशी संबंधित असलेल्या प्रचंड खर्चिक बांधकाम प्रकल्पांवर देखरेख करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. युक्रेनमधील युद्धग्रस्त मारियोपोल शहर आणि बंदराच्या पुनर्बांधणीच्या कामाचाही यात समावेश होता. रशियातील सर्वोच्च कायदा अंमलबजावणी संस्थेच्या अहवालात इव्हानोव्हवर मोठ्या अफरातफरीचा ठपका ठेवण्यात आल्यानंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. रशियातील कायद्यानुसार या गुन्ह्याला १५ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे. इव्हानोव्ह यांच्या अटकेनंतर मंत्रालयाच्या कार्मिक संचालनालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल युरी कुझनेत्सोव्ह, मेजर जनरल इव्हान पोपोव्ह, युक्रेनमधील माजी सर्वोच्च कमांडर आणि लष्करी जनरल स्टाफचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल वदिम शमारीन, खरेदी विभागातील अधिकारी व्लादिमीर व्हर्टेलेत्स्की आणि एका सैनिकाला अटक झाली आहे. मॉस्को प्रांताचे फेडरल तुरुंग सेवा उपप्रमुख व्लादिमीर तेलायेव यांनाही लाचखोरीच्या आरोपाखाली जेरबंद करण्यात आले आहे.

reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
Maharashtra assembly elections 2024 independent candidate getting support from mahayuti maha vikas aghadi Unsatisfied leader in bhandara Vidhan sabha
भंडारा विधानसभेत अपक्ष उमेदवारांचा बोलबाला? युती-आघाडीतील असंतुष्ट अपक्षांच्या पाठिशी!
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?

हेही वाचा – इस्रायलच्या राजधानीवरच हमासच्या कासम ब्रिगेड्सकडून रॉकेटहल्ला… काय आहे कासम ब्रिगेड्स? त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे कशी?

भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोल?

अलीकडे झालेले अटकसत्र ही कोणतीही भ्रष्टाचारविरोधी मोहीम नसून सर्व सरकारी संस्थांमधील क्रियाकलापांचा एक भाग असल्याचे पुतिन यांचे प्रवक्ता दिमित्री पेस्कोव्ह यांचे म्हणणे आहे. मात्र खुद्द पेस्कोव्ह यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. अलिकडेच तुरुंगात मृत्यू झालेले लोकशाहीवादी नेते अलेक्सी नवाल्नी यांच्या संघटनेने इव्हानोव्ह यांची (आता विभक्त झालेली) पत्नी स्वेतलाना हिच्या वाढदिवसाच्या पार्टीत पेस्कोव्ह मौजमजा करीत असल्याची ध्वनिचित्रफीत प्रसृत केली होती. यात पेस्कोव्ह यांच्या मनगटावरील ८५ हजार डॉलरच्या महागड्या घड्याळाकडेही लक्ष वेधण्यात आले होते. ही ध्वनिचित्रफीत २०२२ मधील असल्याचा दावा आहे. याचाच अर्थ पुतिन यांच्या निकटवर्तीयांना या घोटाळ्यांची आत्ताच उकल झाली आणि अचानक कारवाई सुरू झाली, असे मानण्याचे कारण नाही. पुतिन यांनाही याची कल्पना असणे शक्य आहे. मग प्रश्न निर्माण होतो की युद्धाच्या धामधुमीत या अटकसत्राने काय साधले जाणार?

आता कारवाई करण्याचे कारण काय?

आपल्या अध्यक्षपदाच्या नव्या कार्यकाळात पुतिन यांनी शोईगू यांची हकालपट्टी करून आंद्रे बेलोसोव्ह या अर्थतज्ज्ञाची संरक्षणमंत्रीपदी नेमणूक केली. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६.७ टक्क्यांपर्यंत पोहोचलेला संरक्षण खर्च अर्थव्यवस्थेला झेपेल एवढा खाली आणणे गरजेचे आहे. त्यासाठी खर्चात अधिक शहाणपणा दाखविणे आणि भ्रष्टाचाराला लगाम घालणे आवश्यक बनल्याचे सांगितले जाते. रशियाची अर्थव्यवस्था ही आता ‘युद्धकेंद्री’ झाली आहे. संरक्षणक्षेत्रात अनेकांना रोजगार मिळाले आहेत. त्यामुळे युद्ध सुरूच ठेवणे गरजेचे बनले असताना खर्च आणि भ्रष्टाचार नियंत्रणात ठेवणेही आवश्यक झाले आहे. दुसरीकडे नवे संरक्षणमंत्री आपली ताकद दाखवून देण्यासाठी आपल्या पूर्वसुरींच्या निकटवर्तींना मार्गातून बाजूला करत असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा – अभिनेत्री लैला खान खून प्रकरणी सावत्र पित्याला फाशी… काय होते प्रकरण?

रशियामध्ये भ्रष्टाचाराची व्याप्ती किती?

पुतिन रशियाचे सर्वेसर्वा झाल्यापासून प्रशासकीय पात‌ळीवर भ्रष्टाचार नवा नाही. अनेक लष्करी आणि नागरी सेवेतील अधिकारी अनेक दशकांपासून आपल्या पदांचा गैरवापर करून पैसे खात असल्याचा आरोप आहे. रशियामध्ये ‘भ्रष्टाचार’चा दुहेरी वापर सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. वरिष्ठ पातळीवरील अधिकारी लाचखोरीतून गब्बर होतात आणि आपली निष्ठा कायम ठेवतात, हे एक कारण. दुसरे म्हणजे कोणत्याही क्षणी एखाद्यावर कारवाई करता यावी, यासाठी प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रकरणे बाहेर काढणे प्रशासनाला शक्य होते.

या अटकसत्रांचा परिणाम काय होईल?

एकतर यापुढे एका मर्यादेबाहेर संरक्षण दलातील भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, हा संदेश क्रेमलिनने आपल्या अधिकाऱ्यांना देऊ केला आहे. वॅग्नर ग्रुपचे प्रमुख गेवगेनी प्रिगोझिन यांनी त्यांच्या संशयास्पद मृत्यूपूर्वी युद्धाचे व्यवस्थापन चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप करत बंडाचे हत्यार उपसले होते. संरक्षणमंत्री बदलणे आणि त्यानंतरचे अटकसत्र ही एका अर्थी या आरोपाची कबुली मानली जात आहे. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होऊ शकते, असे सांगितले जात आहे. एखाद्या जनरलविरोधात खटला दाखल करून काही ‘व्यावसायिक तपासनीस’ आपले वजन वाढवून घेण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या ताज्या कारवाईमुळे भ्रष्टाचार लगेच बंद होण्याची शक्यता नसली, तरी किमान त्याची सीमारेषा अधिक वर सरकेल आणि काही प्रमाणात अफरातफर कमी होईल, असा क्रेमलिन प्रशासनाचा अंदाज आहे.

amol.paranjpe@expressindia.com