आगामी ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्याची संगीतापेक्षा नको त्या गोष्टीमुळेच अधिक चर्चा आहे. (pathan controversy deepkia padukone song) या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने परिधान केलेली भगव्या रंगाची बिकिनी (deepika padukone saffron bikini) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या भगव्या रंगाच्या बिकिनीचा उल्लेख करत थेट राज्यात चित्रपट दाखवायचा की नाही याबद्दल विचार केला जाईल असं विधान केलं. सोशल मीडियावरही हा भगव्या रंगाच्या बिकिनीचा हिंदुत्वाशी संबंध जोडून वेगवगेळ्या प्रकारचे दावे आणि प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.
मिश्रा यांच्या विधानानंतर इंदूर शहरामध्ये ‘वीर शिवाजी’ नावाच्या गटाने आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता शाहरुख खानच्या पुतळे जाळण्यात आले. या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली. हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळीही भगव्या रंगाचा संदर्भ देण्यात आला. मात्र भगवा रंग आणि हिंदुत्वाचा नेमका संबंध काय? (important of saffron in Hinduism) भगवा रंगाला हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचं स्थान का आहे? हिंदू साधू-संत भगव्या रंगाचेच कपडे का परिधान करतात? (Why Indian saints wear saffron) यासारख्या प्रश्नांबद्दलही चर्चा सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न…
भगव्या रंगाचं महत्त्व काय?
भगवा रंग हा हिंदू धर्मामध्ये पवित्र मानला जातो. हिंदू मान्यतांनुसार भगवा (केशरी) रंग हा सुर्योदय/सुर्यास्त आणि आग या दोन गोष्टी सूचित करतो. या रंगाचा सांकेतिक अर्थ बलिदान, प्रकाश असा होतो. तसेच या रंगाच्या माध्यमातून चांगल्या गोष्टींकडून वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते असं मानलं जातं. अग्नी आणि सूर्य या दोन्ही गोष्टी सामर्थ्याचं प्रतिक आहेत.
नक्की वाचा >> विश्लेषण: इराणने ‘मोरॅलिटी पोलीस’ अचानक बरखास्त करण्याचे कारण काय? हे बदलाचे लक्षण आहे की धूळफेक?
…म्हणून अनेक राजवटींच्या काळात भगवा होता झेंडा
वर नमूद केल्याप्रमाणे भगवा हा बलिदानाचं प्रतिक मानला जातो. तसेच या रंगाच्या माध्यमातून नेहमी चांगल्या गोष्टींकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळण्याबरोबरच हा रंग शक्ती आणि ऊर्जेचं प्रतिक मानलं जातो. याच कारणास्तवर युद्धभूमीवर लढायला जाताना किंवा एकंदरितच राजवटीचा झेंडा निवडताना प्रामुख्याने पुरातन भारतात भगव्या रंगाला प्राधान्य दिलं जायचं.
हिंदू साधू-संत भगवा रंग परिधान करण्यामागे वैज्ञानिक कारण?
अनेक हिंदू साधू-संत भगव्या रंगाचेच वस्त्रं परिधान करतात. मात्र साधू-संतांनी भगव्या रंगाचे वस्त्रं का परिधान करतात यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का? असा प्रश्न विचारल्यास त्याचं उत्तर होय असं देता येईल. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८ साली ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने डॉक्टर बी. के. चंद्रशेखर यांच्याशी चर्चा करुन लिहिलेल्या लेखामध्ये यासंदर्भातील कारणमीमांसा केली आहे. डॉ. चंद्रशेखर हे सायको न्यूरॉबिक्सचे तज्ज्ञ आहेत. साध्या भाषेत सांगायचं तर रंगांच्या निवडीमागील शास्त्र काय असता याचा अभ्यास ते करतात. डॉ. चंद्रशेखर यांनी भगव्या रंगासंदर्भात अनेक रंजक गोष्टींवर प्रकाश टाकला.
सप्तचक्र आणि सात रंग
डॉ. चंद्रशेखर यांच्या सांगण्याप्रमाणे आपल्या शरीरामधील सप्तचक्रांचा सात रंगांशी संबंध आहे. यामध्ये लाल, भगवा, पिवळा, हिरवा, निळा, इंडिगो आणि गर्द जांभळा (व्हॉयलेट) असे हे रंग आहेत. प्रत्येक रंगाची वेगवेगळी व्हेवलेथ असते. आपण या वेगवेगळ्या रंगांकडे पाहतो तेव्हा आपल्या मनात वेगवेगळ्या गोष्टींबद्दल विचार येतात.
कलर व्हायब्रेशन थेरिपी
“आपण जेव्हा एखादा रंग पाहतो तेव्हा त्याची प्रतिकृती आपल्या डोळ्यातील दृष्टीपटलावर तयार होते. त्यानंतर ती इलेक्ट्रीक संकेतांच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पाठवली जाते. शरीरामधील ऑप्टीक नर्व्ह ही मेंदूमधील व्हिज्युएअल कॉर्टेक्स आणि इतर भागांशी जोडलेली असते. यामुळेच आपल्या मेंदूला वेगवगेळ्या रंगासंदर्भातील वेगवेगळे संकेत दिले जातात,” असं रंगांचा मानसिक दृष्ट्या काय परिणाम होतो याबद्दल माहिती देताना डॉ. चंद्रशेखर यांनी सांगितलं.
लाल रंगाच्या चक्राचं महत्त्व
शरीरामधील सप्तचक्रांपैकी लाल चक्र हे पहिले चक्र आहे. हे चक्र मूलाधार किंवा मूळ चक्र आहे. असं असण्याचं कारण म्हणजे हे चक्र जननेंद्रियाशी संबंधित असल्याचं मानलं जातं. हे चक्र व्यक्तीच्या जगण्यासाठी सर्वात महत्वाचे मानले जाते कारण ते वृत्ति चक्र आहे. हे चक्र प्राथमिक ऊर्जेशी संबंधित आहे. हे चक्र मानवी शरीराच्या मस्क्यूकोस्केलेटल प्रणालीचे म्हणजेच अस्थी व स्नायू दोन्ही संस्थांविषयीचं व्यवस्थापन करते.
नक्की वाचा >> विश्लेषण: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटणार तरी कधी? हा वाद काय आहे?
भगवं चक्र आणि आरोग्य…
दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या चक्रासंदर्भात बोलायचं झाल्यास भगव्या चक्रासंदर्भात बोलावं लागेल. या चक्राला स्वाधिष्ठान किंवा त्रिक म्हणजेच धार्मिक विधींचा किंवा त्यासंबंधींचं चक्र देखील म्हणतात. कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्याच्या बाबतीत ते सर्वात महत्त्वाचे चक्र असते. डॉ. चंद्रशेखर यांच्या मते, हे चक्र मोठे आतडे, मूत्राशय, मूत्रपिंड, प्रजनन प्रणाली आणि मूत्राशयाशी संबंधित आजारांशी संलग्न आहे. बौद्ध लोक असेही मानतात की केशरी हा आनंदाचा रंग आहे कारण तो लाल आणि पिवळा रंग एकत्र येऊन तयार होतो आहे. केशरी रंगावर लक्ष केंद्रित केल्याने एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक दोन्ही बाजूंनी अनेक फायदे मिळू शकतात.
सायन्स ऑफ व्हायब्रेशन अन् भगवी कपडे…
डॉ. चंद्रशेखर रंगांचा वापर मानसिक आरोग्यासंदर्भातील उपचारांसाठी कसा केला जातो याबद्दल बोलताना याला कंपनांचे विज्ञान (सायन्स ऑफ व्हायब्रेशन) असं म्हणतात. यासंदर्भातील उदाहरण देताना डॉ. चंद्रशेखर यांनी थकवा जाणवणाऱ्यांना भगवान हनुमानावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातो. आता भगवान हनुमानाचा रंग लाल आहे. हा रंग शक्ती आणि तग धरुन ठेवण्याची क्षमता म्हणजेच स्टॅमिना निर्देशत करतो. जेव्हा एखादी व्यक्त भगवान हनुमानावर लक्ष केंद्रित करते तेव्हा ती लाल रंगावर लक्ष केंद्रित करते. अशाप्रकारे अप्रत्यक्षपणे वैज्ञानिक स्तरावर कंपनांच्या माध्यमातून मानसिक थकव्यावर उपचार केले जातात. या सर्वांच्या आधारेच भगवा रंग हा का महत्त्वाचा आहे आणि साधू-संत मानसिक आधार देण्यासाठी, वाढवण्यासाठी, तो आधार वाढवण्यासाठी भगव्या आणि लाल रंगाचा वापर करतात असं सांगितलं जातं.