भारतीय नौदलात अलीकडेच समाविष्ट झालेल्या आयएनएस अरिघात या पाणबुडीतून अण्मस्त्रक्षम साडेतीन हजार किलोमीटर पल्ल्याच्या के – ४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. यातून भारताची आण्विक त्रिसूत्री अधिक बळकट करता येईल. आणि आण्विक संघर्षात प्रतिहल्ला चढविण्यासाठी प्रभावी पर्याय उपलब्ध होणार आहे. दीर्घ पल्ल्याच्या या क्षेपणास्त्रामुळे चीनलाही जरब बसू शकेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्षेपणास्त्र चाचणीचे स्वरूप काय?

भारताची अणुशक्तीवर चालणारी आयएनएस अरिघात ही दुसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (एसएसबीएन) आहे. तीन महिन्यांपूर्वीच ती नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. या पाणबुडीतून २७ नोव्हेंबर रोजी भारतीय नौदलाने अण्वस्त्रक्षम साडेतीन हजार किलोमीटर मारक क्षमतेचे के – ४ क्षेपणास्त्र डागण्याची चाचणी केली. बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी पूर्ण श्रेणीसाठी घेतली गेली. यातील तपशीलांचे विश्लेषण केले जात आहे. पाण्याखालील क्षेपणास्त्र प्रक्षेपक प्रणाली ही अत्याधुनिक पण जटील आहे. पाणबुडीतून डागलेल्या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण क्षमता सिद्ध करण्यासाठीचा महत्त्वपूर्ण मापदंड ठरतो. शस्त्र प्रणालीचे परिचालन व तांत्रिक मापदंड प्रमाणित केले जातात. या चाचणीतील अचूक तपशील उच्चस्तरीय लष्करी अधिकारी आणि राजकीय नेतृत्वाला दिले जातील, असे सांगितले जाते. 

हेही वाचा >>>पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा ताफ्यात महिला कमांडो? पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असणारे एसपीजी कमांडो असतात तरी कोण?

के – ४ क्षेपणास्त्र काय आहे?

नौदलाच्या अरिहंत वर्गातील पाणबुड्यांसाठी संरक्षण संंशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेले के – ४ हे साडेतीन हजार किलोमीटर पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. स्वदेशी क्षेपणास्त्रांच्या ‘के’ मालिकेतील ते आहे. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ त्यांच्या ‘के’ आद्याक्षरावरून त्याचे नामकरण करण्यात आले आहे. विकसित क्षेपणास्त्राची २०१४ आणि २०१६ मध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. आण्विक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता प्रमाणित करण्यात आली. घन रॉकेट प्रणोदकावर ते आधारित आहे. या क्षेपणास्त्रात तीन घटकांना परस्परांना जोडणारी अभिनव प्रणाली आहे, ज्यामुळे शत्रुला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीतून के – ४ क्षेपणास्त्राचा माग काढणे आणि त्यास नष्ट करणे कठीण होईल. 

देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्व कसे?

स्वदेशी बनावटीची पाणबुडी अण्वस्त्रक्षम स्वदेशी क्षेपणास्त्राने सुसज्ज होईल. अनेक तांत्रिक अडथळे पार करून के मालिकेतील या क्षेपणास्त्रांचा विकास दृष्टिपथास आला. पाणबुडीतून अण्वस्त्र डागण्याची क्षमता नौदलाच्या सामर्थ्यात सामरिक जोड देणारी ठरेल. या वर्गातील तिसरी आयएनएस अरिदमन ही पाणबुडी पुढील वर्षात कार्यान्वित होईल. त्यानंतर अणुशक्तीवरील दोन पाणबुड्या के – ५ या पाच हजार किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सज्ज असतील, असे सांगितले जाते. आण्विक प्रतिबंधासाठी एक पाणबुडी नेहमी गस्तीवर असणे आवश्यक असते. देशाला किमान चार एसएसबीएनची गरज आहे. एखादी पाणबुडी बंदरात असताना दुसरी गस्तीवर राहू शकते. अधिक काळ त्या पाण्याखाली राहू शकतात. या पाणबुड्या देशाची आण्विक त्रिसूत्री बळकट करतील. आण्विक प्रतिबंधन क्षमता वाढवून देशाच्या सुरक्षेत निर्णायक भूमिका निभावतील, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>>गरोदर आहोत हे महिलांना कळतच नाही? काय आहे ‘क्रिप्टिक प्रेग्नन्सी’? याची इतकी चर्चा का?

चीन टप्प्यात येतोय का?

पहिल्या आयएनएस अरिहंत पाणबुडीवर के – १५ या ७५० किलोमीटरवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी झाली होती. चीनचा विचार करता हा पल्ला बराच कमी आहे. साडेतीन हजार किलोमीटरच्या के – ४ ने  सुसज्ज आयएनएस अरिघातबाबत असे होणार नाही. या चाचणीने चीनच्या मुख्य भूभागातील बराचसा भाग प्रहार टप्प्यात येईल. हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील वाढती आव्हाने लक्षात घेता, लांब पल्ल्याच्या पाणबुड्यांवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची गरज आहे. आयएनएस अरिधमनच्या समावेशानंतर भारताची प्रतिहल्ला चढविण्याची आण्विक क्षमता पुढील वर्षात पूर्णपणे कार्यान्वित होईल. या दोन्ही पाणबुड्यांची उपस्थिती संभाव्य धोक्यांचा प्रतिबंध करण्याची आणि राष्ट्रीय हिताचे संरक्षण करण्याची भारताची क्षमता आणखी वाढवणार आहे.

आव्हाने काय?

भारताची आण्विक प्रतिकारशक्ती पूर्णपणे कार्यान्वित होत असली तरी आण्विक पाणबुडीला मुख्यालयाशी तात्काळ संवाद साधता येईल, यासाठी प्रभावी प्रणाली उभारण्यासाठी काम करावे लागणार आहे. अणुशक्तीवर चालणाऱ्या बॅलिस्टिक पाणबुड्या जिवंत क्षेपणास्त्रे वाहून नेत नाहीत. मुख्यालयाकडून योग्य संकेताशिवाय अण्वस्त्रे कार्यान्वित होणेार नाहीत वा डागली जाणार नाहीत, याची खात्री होणे महत्त्वाचे असते.  मुख्यालयाच्या नियंत्रक प्रणालीत विविध परवानग्यांचे सूत्र असते. भारतीय अण्वस्त्रसक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (एसएसबीएन)  या खूप कमी कंपन आधारित प्रणालीवर संप्रेषण करतात. त्यामुळे त्यांना प्राप्त होणाऱ्या संदेशात त्रुटी राहण्याचा संभव असतो. मुख्यालयाकडून क्षेपणास्त्र सज्ज वा हल्ला करण्यासाठी दिलेला सांकेतांक चुकण्याची शक्यता निर्माण होेते. या समस्या सोडविण्याचे आव्हान असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

के – ४ क्षेपणास्त्रात महाराष्ट्राचे योगदान कसे ?

के – ४ क्षेपणास्त्राच्या विकासात योगदान देणाऱ्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या तीन प्रयोगशाळा व केंद्र महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पुण्यातील उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा (एचईएमआरएल) आणि संशोधन आणि विकास आस्थापना (अभियंता) जी ‘आर ॲण्ड डीई (इंजिनिअर्स)’ म्हणूनही ओळखली जाते आणि नाशिकचे प्रगत ऊर्जा सामग्री केंद्र (एसीईएम) यांचा समावेश आहे. क्षेपणास्त्राची उच्च ऊर्जा व मोटार प्रणाली ‘एचईएमआरएल’ने आणि ‘एसीईएम’द्वारे रचनांकित, विकासित व निर्मित आहे. उच्च स्फोटके, प्रणोदक व संबंधित तंत्रज्ञानात ‘एचईएमआरएल’ काम करते. ‘आर ॲण्ड डीईने के – ४’ क्षेपणास्त्राची प्रक्षेपक प्रणाली 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is the k 4 ballistic missile test important india submarine print exp amy