मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील पायभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारकडून आणि विशेषत: मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा सध्या रतीब मांडला जात आहे. भुयारी मार्ग, उड्डाणपूल, सागरी मार्ग, रस्ता रुंदीकरणासाठी निविदा काढल्या जात आहेत. असे असले तरी मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा ठाणे मेट्रोचा प्रकल्प रखडत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

डिसेंबर २०२५…?

हा प्रकल्प २०२४पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. पण मध्यंतरी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी मेट्रो प्रकल्पाच्या दौऱ्यात डिसेंबर २०२५ ही या प्रकल्पाची नवी मुदत असल्याचे म्हटले. म्हणजेच अजून किमान पावणेदोन वर्षे तरी हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार नाही हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच या प्रकल्पाच्या बांधणीस होणारा विलंब ठाणेकरांसाठी नाराजीचा विषय ठरत आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Devendra Fadnavis claims that Ladaki Bahin Yojana will benefit everyone without discrimination
धर्मभेद न करता लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?

हेही वाचा >>>Lok Sabha Elections 2024: भाजपा की इंडिया आघाडी? जनतेच्या मनात काय दडलंय?

ठाणे मेट्रो प्रकल्पाला गती कधी मिळाली?

मुंबई शहराच्या पलीकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) राबविला जाणारा हा पहिला मेट्रो प्रकल्प आहे. ठाण्यात मेट्रो व्हावी ही अनेक दशकांची मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार असताना, त्यांनी या प्रश्नावर अनेकदा आंदोलने केली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या मेट्रो प्रकल्पाला गती मिळाली. २०१६मध्ये या प्रकल्पाला राज्य सरकार आणि एमएमआरडीएने मान्यता दिली. पुढे लोकसभा निवडणुका तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१८ मध्ये या मेट्रो कामांचे भूमिपूजन झाले. भूमिपूजन होत असताना हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण केला जाईल असे निश्चित करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र डिसेंबर २०२५चा मुहूर्त गाठता येईल का याविषयी प्रश्नचिन्ह आहे.

ठाणे मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा का आहे?

ठाण्याची लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून घोडबंदर मार्गाच्या दोन्ही बाजूस लोकवस्ती विस्तारताना दिसत आहे. माजिवडा ते गायमुखपर्यंत आणि पुढे मिरा-भाईंदरपर्यंत असे नगरीकरण होताना दिसत आहे. ठाण्याला खेटून असलेली मुलुंड, भांडूप, नाहूर, कांजूर ही उपनगरे ही गेल्या काही वर्षांपासून कात टाकत असून दळणवळणासाठी पर्यायी व्यवस्थेची येथेही मोठी गरज निर्माण झाली आहे. उपनगरीय रेल्वे सेवेवर येणारा प्रवाशांचा भार लक्षात घेऊन वडाळ्यापासून ठाण्याच्या गायमुखपर्यंत येणारी मेट्रो ही या उपनगरांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. एका अर्थाने उपनगरीय रेल्वेस समांतर वाहतूक व्यवस्था म्हणूनही या मेट्रो व्यवस्थेकडे पाहिले जात आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण : देशातल्या पहिल्या वातावरणीय संशोधन प्रयोगशाळेसाठी भोपाळचीच निवड का? काय आहे तिचे महत्त्व?

मेट्रो चार आणि चार अ प्रकल्प नेमका कसा आहे?

वडाळा-घाटकोपर-कासारवडवली असा मेट्रो चार हा प्रकल्प आहे. एकूण ३२.३२ किमी लांबीचा हा मार्ग आहे. मुंबईतील भक्ती पार्क ते कासारवडवली अशी एकूण ३० स्थानके या प्रकल्पात आहेत. हा मार्ग संपूर्ण उन्नत आहे. एकूण १४ हजार ५४९ कोटी रुपये इतका निधी या प्रकल्पाला मंजूर करण्यात आला आहे. २०१६मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. परंतु प्रत्यक्ष कामास २०१८ मध्ये सुरुवात झाली. घोडबंदर भाग आता गायमुखच्या टोकापर्यंत वाढला आहे. त्यामुळे एमएमआरडीएने हा प्रकल्प कासारवडवलीच्या पुढे नेला आहे. त्याला कासारवडवली ते गायमुख प्रकल्प ‘४ अ’ असे नाव देण्यात आले आहे. कासारवडवली ते गायमुख हा प्रकल्प २.७ किमी लांब आहे. या कामासोबतच या भागात कारशेडदेखील उभारले जाणार आहे.

या प्रकल्पातील अडचणी कोणत्या होत्या?

हे दोन्ही प्रकल्प ऑक्टोबर २०२२मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु २०२०मध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे परराज्यातील मजूर त्यांच्या गावी निघून गेले. तसेच सार्वजनिक व्यवस्थेची कामे ठप्प झाली होती. ठेकेदारांडून आडमुठे धोरण घेतले जात होते. मोघरपाडा येथे मेट्रो कारडेपोच्या कामांना स्थानिकांचा विरोध आहे. या विरोधातून मार्ग काढण्याचे धोरण एमएमआरडीएने स्वीकारले असले तरी कारडेपोचे काम अजूनही सुरू झालेले नाही. विविध तांत्रिक अडचणींमुळे या प्रकल्पाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. या दोन्ही प्रकल्पांच्या कामाची मुदत उलटून गेली आहे. आता डिसेंबर २०२५मध्ये पूर्ण होणार असल्याचा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) केला जात आहे.

कोणत्या प्रकल्पांना मेट्रो चार जोडला जाणार आहे?

मेट्रो चार प्रकल्प कुर्ला येथून मेट्रो २ ब (अंधेरी पश्चिम येथील डीएन नगर ते मांडले), कापूरबावडी येथून मेट्रो पाच (कापूरबावडी-भिवंडी-कल्याण), मेट्रो चार अ हा प्रकल्प गायमुख ते मिरा रोड येथील शिवाजी महाराज चौक या प्रकल्पाला जोडला जाईल. त्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रकल्प पूर्ण झाल्यावर कोणते लाभ?

ठाणे शहरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामांसाठी मुख्य रस्त्यावर कामाच्या भागात मेट्रोचे पत्रे उभारण्यात आले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद झाले असून दररोज होणाऱ्या कोंडीमुळे वाहन चालक हैराण झाले आहेत. मेट्रो मार्गिकांचे काम पूर्ण झाल्यास रस्ते कोंडीमध्ये घट होण्याची शक्यता एमएमआरडीएकडून वर्तविली जात आहे. तसेच मेट्रो चार मार्गिकेवरून दैनंदिन १२ लाख १३ हजार प्रवासी प्रवास करतील. तर मेट्रो चार अ या मार्गिकेवरून दैनंदिन एक लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा एमएमआरडीने व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय टळणार असून ठाणे रेल्वे स्थानकात होणारी गर्दी काही प्रमाणात घटण्याची चिन्हे आहेत.