अभय नरहर जोशी

अमेरिकेतील मॅक्स पार्क या २१ वर्षीय तरुणाने ‘रुबिक क्यूब’चे रंगजुळणी कोडे कमीत कमी वेळेत सोडवण्याचा जागतिक विक्रम नुकताच केला. त्याने या आधीचा ‘गिनिज बुक’मध्ये नोंदवलेला विक्रमही मागे टाकला. विशेष म्हणजे ४x४x४ आकाराचा क्यूब, ५x५x५ क्यूब, ६x६x६ क्यूब, ७x७x७ क्यूब आणि एका हाताने ३x३x३ ‘रुबिक क्यूब’चे कोडे सोडवणे या इतर श्रेणीतही तो अव्वल आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्याला स्वमग्नता (ऑटिझम) विकार आहे. त्यावर मात करत मॅक्सने या विक्रमाला गवसणी घातली आहे. नवा जागतिक विक्रम नोंदवताना त्याने ३x३x३ ‘रुबिक क्यूब’चे कोडे अवघ्या ३.१३ सेकंदांत सोडवले.

Pramod kumar Success Story
Success Story : ‘स्वप्न एका रात्रीत पूर्ण होत नाही!’ केवळ २,५०० केली व्यवसायाची सुरुवात; मेहनतीच्या जोरावर उभारली ५० कोटींची कंपनी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
wardha deoli Shantanu raut
जगातील बारात ‘हा’ एकमेव भारतीय, नोबेल विजेत्याच्या नावे असलेला फेलोशिप सन्मान पटकावला
Loksatta chaturang padsad loksatta readers response letter
पडसाद : स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर…
Loksatta editorial Copernicus Climate Change Service Report
अग्रलेख: विक्रमी आणि वेताळ
Technology Exponential Technology Linear Technology
पहिले पाऊल: आघातांकीय!
ed raids thakur brothers residence over fraud rs 12 crore in the name of online booking in tadoba tiger reserve
ठाकूर बंधुंच्या निवासस्थानी ईडीचा छापा, ताडोबा ऑनलाइन बुकींग घोटाळ्यातील…
Young man draws beautiful picture of conductor on ticket video goes viral
“कधीतरी दुसऱ्याच्या आनंदाचे कारण बना”, तरुणाने तिकिटावर रेखाटले कंडक्टरचे सुंदर चित्र, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू

यापूर्वी विक्रम कुणाच्या नावावर होता?

यापूर्वी ३x३x३ आकाराचा ‘रुबिक क्यूब’चे कोडे सोडवण्याचा विक्रम चीनमधील युशेंग डू याच्या नावावर होता. होता. त्याने हे कोडे ३.४७ सेकंदांत सोडवले होते. मॅक्सने हा विश्वविक्रम मागे टाकल्यानंतर एकच जल्लोष झाला. मॅक्सने अविश्वसनीय वेळेत हा विक्रम केल्यानंतर प्रेक्षकांनी त्याची छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली. त्याचे हे यश अत्यंत विशेष असल्याचे पार्कचे वडील शॉन पार्क यांनी ‘गिनिज बुक’ला सांगितले.

मॅक्स पार्कची ओळख काय?

२८ नोव्हेंबर २००१ रोजी जन्मलेल्या मॅक्स पार्कची ‘रुबिक क्यूब द्रुतगतीने सोडवणारा तरुण’ अशी ख्याती आहे. तो कॅलिफोर्नियातील सेरिटोसमध्ये आई मिकी आणि वडील शॉन पार्क यांच्यासह राहतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी त्याला स्वमग्नतेचा विकार असल्याचे निदान झाले होते. या विकारामुळे व्यक्तीला संवाद साधण्यात, भावना व्यक्त करण्यात अडचणी येतात. त्याची आयुष्यभर काळजी घ्यावी लागणार, असे मॅक्सच्या पालकांना सांगण्यात आले. या विकारामुळे मॅक्सच्या कृतिकौशल्यावर (मोटर स्किल) गंभीर परिणाम झाला. त्यामुळे त्याची आई मिकीने त्याला ‘रुबिक क्यूब’शी परिचय करून दिला. मॅक्सनेही त्यात रुची दाखवली. हळूहळू कौशल्य मिळवत तो हे कोडे जलद गतीने सोडवू लागला. त्याने भाग घेतलेल्या दुसऱ्याच स्पर्धेत ६×६×६ आकाराच्या क्यूबचे कोडे सोडवण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी, मॅक्सने अमेरिकेतील दोन अग्रगण्य महाविद्यालयांतील पदवीधरांविरुद्ध क्युबिंग स्पर्धा जिंकून आपल्या पालकांना आश्चर्यचकित केले.

मॅक्सने आतापर्यंत केलेले विक्रम कोणते?

जागतिक क्यूब संघटनेच्या (डब्ल्यूसीए) नोंदीनुसार मॅक्सने पुढील विक्रम केले आहेत. ३x३x३ एकल स्पर्धा प्रथम स्थान, ३x३x३ : ४.८६ सेकंद – दुसरे स्थान (विभागून), ४x४x४ एकल : १६.७९ सेकंद – पहिले स्थान, ४x४x४ सरासरी ५ : १९.३८ सेकंद – पहिले स्थान, ५x५x५ एकल: ३३.०२ सेकंद – पहिले स्थान, ५x५x५ सरासरी ५ : ३७.०० सेकंद – पहिले स्थान, ६x६x६ एकल: ५९.७४ सेकंद – पहिले स्थान, ६x६x६ सरासरी ३ : १ मिनिट ८.५६ सेकंद – पहिले स्थान, ७x७x७ एकल: एक मिनिट ३५.६८ सेकंद – पहिले स्थान, ७x७x७ सरासरी ३ : १ मिनिट ४२.१२ सेकंद – पहिले स्थान, ३x३x३ एका हाताने एकल : ६.२० सेकंद – पहिले स्थान, ३x३x३ एका हाताने सरासरी ५ : ८.७६ सेकंद – दुसरे स्थान. २८ जानेवारी २०२३ पर्यंत, त्याने जागतिक क्यूब संघटनेच्या स्पर्धांपैकी एकूण ४०१ स्पर्धा जिंकल्या आहेत. आतापर्यंत ३×३×३ आकाराच्या क्यूबचे कोडे पाच सेकंदांपेक्षाही कमी वेळात सोडविणाऱ्या नऊ क्यूबपटूंमध्ये मॅक्सचा समावेश होतो. पाच वेळच्या सरासरीतील ३×३×३ आकाराचे क्यूबचे कोडे सहा सेकंदांत सोडवणाऱ्या दोघा विजेत्यांत मॅक्सचा समावेश होतो.

स्वमग्नतेवर हे कौशल्य लाभदायी आहे?

मॅक्सच्या पालकांनी सांगितले, की ‘क्युबिंग’ हे मॅक्ससाठी त्याच्या सामाजिक वावरातील कौशल्यांत सहजता प्राप्त करण्यासाठी एक चांगली उपचारपद्धती ठरल्याचे सिद्ध झाले आहे. एक काळ असा होता, जेव्हा मॅक्स पाण्याची बाटलीही उघडू शकत नव्हता, परंतु त्याने ‘रुबिक क्यूब’चे कोडे सोडवण्यात रुची दाखवल्यानंतर स्वमग्नतेचा विकार असूनही त्याच्या सामाजिक वर्तनात प्रगती झाली. स्पर्धांमुळे त्याच्या देहबोलीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. त्याला सामाजिक संदर्भ आणि संवाद समजून घेता येऊ लागले. नजरेला नजर देऊन संपर्क राखणे, गैरमौखिक संकेत समजून घेणे त्याला जमू लागले आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढून तो स्वावलंबी झाला आहे.

मॅक्सने कोणता नवीन प्रकार रूढ केला?

तब्बल नऊ जागतिक विक्रम नोंदवणाऱ्या मॅक्सने क्युबिंग क्षेत्रात एक नवीन प्रकार आणला. ज्याला ‘एओ १००’ (ॲव्हरेज ऑफ १००- १०० वेळा कोडे सोडवण्यातील सरासरी कामगिरी) ओळखले जाते. त्यात हे कोडे १०० वेळा सोडवावे लागते. त्यातील सर्वोत्तम वेळ आणि सर्वांत खराब वेळ निवडायची. या शंभरदा क्यूब कोडे सोडवण्यातील सरासरी वेळ काढणे. आता ‘एओ १००’ ही पद्धत द्रुतगतीने क्यूब कोडे सोडवण्यात एखाद्याचे कौशल्य ठरवण्याची अंतिम चाचणी म्हणून वापरली जाते. सन २०२० मध्ये ‘नेटफ्लिक्स’ने ‘द स्पीड क्युबर्स’ हा माहितीपट तयार केला होता. हा मॅक्स पार्क आणि ऑस्ट्रेलियाचा फेलिक्स झेमडेग्स या दोघांवर आधारित आहे. त्यांच्या वेगवान पद्धतीने रुबिक क्यूबचे कोडे सोडवण्याच्या कौशल्यावर व या क्षेत्रातील त्यांच्या प्रवासाविषयीची माहिती या माहितीपटात देण्यात आली आहे.

abhay.joshi@expressindia.com

Story img Loader