आर्थिक मंदी, उद्योग क्षेत्रातील आव्हाने आणि नियामक दबावांमुळे चीनमधील अब्जाधीशांना चांगलाच फटका बसला असल्याचे चित्र आहे. अलीकडील अहवालांनुसार, चीनमधील अतिश्रीमंतांची संख्या आणि संपत्ती कमी होत आहे. या वर्षी, ‘हुरुन चायना रिच लिस्ट’मध्ये यूएस डॉलरमध्ये ७४३ अब्जाधीशांची गणना करण्यात आली आहे. हाच आकडा २०२१ मध्ये १,१८५ इतका होता. त्यात आता ३६ टक्क्यांनी घट झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे. पाच अब्ज युआन (अंदाजे ७०० दशलक्ष डॉलर्स) पेक्षा जास्त संपत्ती असलेल्या व्यक्तींची संख्याही मागील वर्षाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी घसरून १,१०० च्या खाली आली आहे, जे चीनमधील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीचे चिन्ह आहे.

एकूण चीनमधील सर्वात श्रीमंत लोकांच्या संपत्तीमध्ये सामूहिक १० टक्क्यांनी घट झाली आहे, संपत्तीत घट होण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. ‘हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूट’चे संस्थापक आणि मुख्य संशोधक रुपर्ट हूगेवेर्फ यांनी नमूद केले, “हुरुन चायना रिच लिस्टमधील व्यक्तींची घट चीनची आर्थिक परिस्थिती दर्शवतात. नेमकी ही घट होण्याची कारणं काय? श्रीमंत लोक देश सोडून का जात आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.

india china
समोरच्या बाकावरून: आपली बडबड आणि चीनचा धोरणीपणा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
loksatta analysis pune witnesses alarming rise In crime rate
पुणे गुन्हेगारीत नाही उणे! राज्याची सांस्कृतिक राजधानी असंस्कृत, असुरक्षित का बनतेय?
sensex drops 663 point nifty ends below 24200
‘मुद्रा’ कर्जांची मर्यादा दुपटीने वाढून २० लाखांवर
sky lanterns, heavy rainfall, lanterns, lanterns news,
कंदिलांना काजळी, आकाश कंदिलांकडे नागरिकांची पाठ, बेभरवशी पावसामुळे नुकसान
Loksatta explained on India China LAC agreement
चीनने सोडला दोन वादग्रस्त भूभागांवरील दावा? काय आहे भारत-चीन नवा समझोता?
Hyundai shares disappoint investors
ह्युंदाईच्या समभागाकडून गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा; पदार्पणालाच ७ टक्के घसरणीने तोटा
Taipei Economic and Cultural Center in Mumbai
मुंबईत तैवानचं आर्थिक केंद्र; चीनने दर्शवला विरोध, काय आहेत कारणं?

हेही वाचा : १३० वर्षांत पहिल्यांदाच माउंट फुजीवरील बर्फ गायब; कारण काय? हे नवीन संकटाचे संकेत आहेत का?

या वर्षी चीनच्या श्रीमंतांच्या यादीत कोण अव्वल स्थानी?

‘बाइट डान्स’चे संस्थापक झांग यिमिंग हे ४९.३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहेत, जे मागील वर्षी चौथ्या स्थानावर होते. ‘बाइट डान्स’ची यूएस मालमत्तेवर सुरू असलेली कायदेशीर लढाई असूनही, कंपनीचा जागतिक महसूल गेल्या वर्षी ३० टक्क्यांनी वाढून ११० अब्ज डॉलर्स झाला आहे. याचे कारण म्हणजे, अमेरिकेतील सुमारे २०० दशलक्ष वापरकर्त्यांमध्ये वाढलेली ‘टिकटॉक’ची लोकप्रियता. त्यांचे दुसरे प्लॅटफॉर्म आहे ‘डोईन’. हेदेखील चिनी वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहे. चीनची सर्वात मोठी पाण्याची बाटली तयार करणारी कंपनी नॉन्गफू स्प्रिंगचे संस्थापक झोंग शानशान दुसऱ्या क्रमांकावर घसरले, कारण त्यांची संपत्ती २४ टक्क्यांनी घसरून ४७.९ अब्ज डॉलरवर आली. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर हुआटेंग शेन्झेन टेक जायंट टेन्सेंटचे संस्थापक पोनी मा हुआटेंग आहेत. शीतपेय क्षेत्रातील दिग्गज वहाहाच्या केली झोंग फुली या चीनमधील सर्वात श्रीमंत महिला व्यावसायिक आहेत. परंतु, चीनमध्ये महिला अब्जाधीशांची संख्या केवळ २३.५ टक्के आहे.

चीनची अर्थव्यवस्था दीर्घकाळापर्यंत गृहनिर्माण संकट, उच्च बेरोजगारीचा दर, वाढते स्थानिक सरकारी कर्ज आणि अपेक्षेपेक्षा कमी झालेली ग्राहक मागणी यांच्याशी झुंजत आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

चीनमधील श्रीमंतांची यादी का कमी होत आहे?

चीनची अर्थव्यवस्था दीर्घकाळापर्यंत गृहनिर्माण संकट, उच्च बेरोजगारीचा दर, वाढते स्थानिक सरकारी कर्ज आणि अपेक्षेपेक्षा कमी झालेली ग्राहक मागणी या समस्यांचा सामना करत आहे. या घटकांचा देशातील अब्जाधीशांवर जास्त परिणाम होत आहे. या वर्षी विकासाला चालना देण्यासाठी सरकारने १.४ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त नवीन कर्ज उपक्रम सुरू करण्याच्या योजना आखल्या आहेत. हेन्ली अँड पार्टनर्सच्या अंदाजानुसार २०२४ मध्ये अंदाजे चीनमधील १५, या अतिश्रीमंतांनी स्थलांतर केले आहे. राजकीय तणाव, विशेषत: शी जिनपिंगच्या धोरणामुळे श्रीमंत नागरिकांना त्यांची मालमत्ता परदेशात हलवण्याचे मार्ग शोधण्यास प्रवृत्त केले आहे.

हेही वाचा : ९५ किलो ड्रग्ज जप्त करीत प्रयोगशाळेचा पर्दाफाश; या प्रकरणात तिहार तुरुंगाची चर्चा का? मेक्सिको कार्टेलशी याचा काय संबंध?

चीनमधील कोणत्या उद्योगांमध्ये घसरण होत आहे?

चीनच्या श्रीमंतांमध्ये तंत्रज्ञान आणि ग्राहकोपयोगी वस्तू ही प्रमुख क्षेत्रे आहेत आणि रिअल इस्टेटसारख्या जुन्या उद्योगांचे लक्षणीय नुकसान झाले आहे. सौर पॅनेल निर्माते आणि लिथियम बॅटरी उत्पादकांना तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागला आहे; ज्यामुळे त्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. ईव्ही आणि बॅटरी निर्मात्यांकडील मागणीही कमी झाली आहे. “सोलर पॅनेल, लिथियम बॅटरी आणि ईव्ही निर्मात्यांना हे आव्हानात्मक गेले आहे; कारण स्पर्धा तीव्र झाली आहे,” असे रुपर्ट हूगेवर्फ यांनी स्पष्ट केले. ही आव्हाने असूनही तैवानच्या अब्जाधीशांची संख्या १५ ने वाढून एकूण ९७ वर पोहोचली, याचे श्रेय त्याच्या मजबूत सेमीकंडक्टर उद्योगाला जाते. याउलट हाँगकाँगची अब्जाधीशांची संख्या चारने कमी झाली आहे. या यादीतील केवळ ३० चिनी अब्जाधीश परदेशात राहतात; प्रामुख्याने अमेरिका आणि सिंगापूरमध्ये.