अमेरिकेत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार हे निश्चित झाल्यापासून तेथील ‘ड्रॉप इन’ खेळपट्ट्यांबाबत बरीच चर्चा रंगत होती. आता या स्पर्धेला सुरुवात होऊन आठवडा झाला असला, तरी अमेरिकेतील खेळपट्ट्यांबाबतची चर्चा अजूनही सुरूच आहे. विशेषतः न्यूयॉर्कमधील खेळपट्टीवर बरीच टीका होत आहे. या खेळपट्टीचा अंदाज बांधणे फार अवघड असल्याचे भारताचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या सलामीच्या सामन्यानंतर म्हणाला. तसेच काही माजी क्रिकेटपटूंकडूनही या खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही (आयसीसी) खेळपट्टीच्या दर्जावर भाष्य करावे लागले. मात्र, ‘आयसीसी’ला विश्वचषकात ‘ड्रॉप इन’ खेळपट्ट्या का ठेवाव्या लागल्या आणि या खेळपट्ट्यांचे स्वरूप नक्की कसे असते याचा आढावा.

‘ड्रॉप इन’ खेळपट्टी म्हणजे काय?

बहुविध म्हणजेच विविध उपक्रम, कार्यक्रमांसाठी किंवा विविध क्रीडा स्पर्धांसाठी वापरल्या जाणाऱ्या क्रिकेट स्टेडियममध्ये ‘ड्रॉप इन’ खेळपट्ट्या वापरल्या जातात. या खेळपट्ट्या दुसऱ्या ठिकाणी तयार करून मग सामन्याच्या काही दिवस आधी स्टेडियममध्ये आणल्या जातात. स्टेडियममध्ये मधला काही भाग रिकामा ठेवलेला असतो. या भागात या खेळपट्ट्या बसवल्या जातात. त्यावर पुरेसे रोलिंग होणे आवश्यक असते. सामना संपल्यावर किंवा स्पर्धा संपल्यावर या खेळपट्ट्या पुन्हा तेथून काढल्या जातात. त्याच्या जागी गवताचा थर लावून ती रिकामी जागा भरली जाते.

india exports contract 1 percent in december 2024
डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
india bangladesh fenching
भारत-बांगलादेश संबंध आणखी ताणले; सीमेवर कुंपण बांधण्यावरून सुरू झालेला वाद काय?
BCCI Vice President Rajeev Shukla statement on Gautam Gambhir Rohit Sharma sports news
गंभीर, रोहितमध्ये मतभेद नाहीत!‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्लांचे वक्तव्य
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?

हेही वाचा >>>अग्निवीर योजनेला विरोधकांकडून इतका विरोध का केला जातोय?

अशा खेळपट्ट्या कुठे वापरल्या जात आहेत?

ऑस्ट्रेलियातील काही स्टेडियममध्ये ‘ड्रॉप इन’ खेळपट्ट्या वापरल्या जातात. विशेषत: ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) अनेक वर्षांपासून ‘ड्रॉप इन’ खेळपट्ट्या वापरल्या जात आहेत. हे मूळ क्रिकेटचे मैदान असले तरी तेथे ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीगचे सामनेही खेळवले जातात. तसेच ‘म्युझिक काँसर्ट’सारखे कार्यक्रमही आयोजित केले जातात. त्यामुळे तेथे ‘ड्रॉप इन’ खेळपट्ट्या वापरणे सोयीचे ठरते. गरज नसेल तेव्हा त्या बाजूला काढून ठेवता येतात.

न्यूयॉर्कमधील ‘ड्रॉप इन’ खेळपट्टीचे स्वरूप कसे?

न्यूयॉर्कच्या नसाऊ कौंटी क्रिकेट स्टेडियममधील ‘ड्रॉप इन’ खेळपट्ट्या सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहेत. येथील अतिरिक्त गवतामुळे अपेक्षेपेक्षा अधिक उसळी असलेल्या आणि भेगा पडलेल्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे फलंदाजांना दुखापतीचा धोकाही उद्भवत आहे. या स्टेडियममध्ये झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या खांद्याला चेंडू लागला आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. तसेच आखूड टप्प्यावरून उसळी घेतलेला चेंडू ऋषभ पंतच्या कोपराला आदळला. याच सामन्यात आयर्लंडचा फलंदाज हॅरी टेक्टरच्याही हेल्मेटला चेंडू लागला. त्यामुळे त्याला ‘कन्कशन’ चाचणी द्यावी लागली.

हेही वाचा >>>शून्यातून उभे केले ‘जायंट किलर्स’… शरद पवार यांनी प्रतिकूल परिस्थितीतही महायुतीवर बाजी कशी उलटवली?

या खेळपट्ट्या कुठे तयार करण्यात आल्या?

‘आयसीसी’ने ऑस्ट्रेलियात तयार करण्यात आलेल्या १० ‘ड्रॉप इन’ खेळपट्ट्या मे महिन्याच्या सुरुवातीला न्यूयॉर्कमध्ये आणल्या. यातील चार खेळपट्ट्या सामन्यांसाठी, तर सहा खेळपट्ट्या सरावासाठी तयार करण्यात आल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील ॲडलेड ओव्हल मैदानाचे खेळपट्टी देखरेखकार (क्युरेटर) डेमियन हाॅग यांच्याकडून या खेळपट्ट्या तयार करून घेण्यात आल्या आहेत.

न्यूयॉर्कमधील खेळपट्टीवर कोणी टीका केली?

फलंदाजांना दुखापतीचा धोका, तसेच येथील पहिल्या दोन सामन्यांत संघांना शतकी आकडाही न गाठता आल्याने इरफान पठाण, वसीम जाफर आणि मायकल वॉन यांसारख्या माजी क्रिकेटपटूंकडून न्यूयॉर्क येथील खेळपट्टीवर टीका केली गेली. ‘‘अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार व्हावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, ही खेळपट्टी खेळाडूंसाठी सुरक्षित नाही. अशा प्रकारची खेळपट्टी भारतात वापरली गेली असती, तर पुन्हा त्या केंद्रावर बराच काळ सामना झाला नसता. ही एखादी द्विदेशीय मालिका नसून ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा आहे. इतक्या मोठ्या स्पर्धेत अशा प्रकारची खेळपट्टी वापरली जाणे अजिबातच योग्य नाही,’’ असे पठाण म्हणाला. जाफर आणि वॉन यांचेही असेच मत होते.

‘आयसीसी’ने काय उत्तर दिले?

न्यूयॉर्क येथील खेळपट्टीवर टीका झाल्यानंतर ‘आयसीसी’ला उत्तर देणे भाग पडले. येथील खेळपट्टीचा दर्जा अपेक्षेप्रमाणे नसल्याचे ‘आयसीसी’ने मान्य केले. तसेच खेळपट्टीत सुधारणा करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही ‘आयसीसी’ने स्पष्ट केले. त्यानंतर कॅनडा आणि आयर्लंड यांच्यात शुक्रवारी झालेल्या सामन्यापूर्वी या ‘ड्रॉप इन’ खेळपट्टीवरील गवत कमी करण्यात आले. त्यामुळे चेंडू अधिक चांगल्या पद्धतीने बॅटवर आल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या स्पर्धेत प्रथमच न्यूयॉर्क येथे झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी शंभरी पार केली.

भारत-पाकिस्तान रंगत वाढणार की घटणार?

क्रिकेटविश्वातील सर्वांत चर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना ट्वेन्टी-२० विश्वचषकात रविवारी खेळवला जाणार आहे. हा सामनाही न्यूयॉर्क येथेच रंगणार आहे. या सामन्यासाठी अतिरिक्त गवत असलेली खेळपट्टी वापरण्यात आल्यास वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळू शकेल. भारताकडे जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या यांसारखे, तर पाकिस्तानकडे शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रौफ, मोहम्मद आमीर यांसारखे उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहेत. त्यांचा सामना करणे फलंदाजांना अतिशय अवघड जाईल. मात्र, गवत कमी केलेली आणि नीट रोलिंग झालेली खेळपट्टी वापरण्यात आल्यास फलंदाजांचे काम थोडे सोपे होऊ शकेल. त्यामुळे सामन्याच्या निकालात आणि सामना किती रंगतदार होतो, यात खेळपट्टीची भूमिका निश्चितपणे महत्त्वाची ठरणार आहे.

Story img Loader