ट्विटरने ‘एक्स’ स्वीकारल्यामुळे एकूणच काळा रंग, एक्स अक्षर, ट्विटर बर्ड हे चर्चेचे मुद्दे आहेत. ‘एक्स’ हा लोगो एलॉन मस्क यांनी स्वीकारला, ज्यांची स्वतःची SpaceX कंपनी आहे. ज्यामध्येही ‘एक्स’ हे अक्षर निवडलेले आहे. गणितामध्ये ‘एक्स’ हे अक्षर येतेच. सूत्र, माहीत नसलेली संख्या या सर्वांसाठी ‘एक्स’ वापरले जाते. काहीजण बोलताना माहीत नसलेल्या व्यक्तीचा उल्लेख ‘एक्स’ असा करतात. मग इंग्रजी वर्णमालेत बाकीचे वर्ण असताना ‘एक्स’ हे अक्षर माहीत नसलेल्या गोष्टींसाठी का निवडले गेले असेल, ‘एक्स’ अक्षराचे महत्त्व काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्रजी वर्णमाला ‘ए’ (A) पासून सुरू होते आणि ‘झेड’ (Z) येथे संपते. ‘एक्स’ हे अक्षर वर्णमालेत २४व्या स्थानी आणि शेवटून तिसरे आहे. एखाद्या गोष्टीसाठी ‘ए’ हे सुरुवातीचे अक्षर निवडता आले असते. पण, तसे झाले नाही. ‘एक्स’ या अक्षराची निवड अज्ञात गोष्टी, अमर्याद गोष्टी यासाठी वापरले जाते.

X हे अक्षर कुठून आले असावे ?

Dictionary.com नुसार, X मूळतः फोनिशियन पत्रातून आलेला आहे. फोनेशियन ही प्राचीन काळात भूमध्य समुद्राच्या सीमेवर असलेल्या शहरांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे. ते कठोर एस ध्वनी दर्शविते आणि ग्रीक लोकांनी इ.स.पूर्व ९०० च्या सुमारास ‘समेख’ नावाचे हे अक्षर घेतले आणि त्याला ‘ची’ असे नाव दिले. हे ‘डायग्राफ’ (‘एकाच उच्चाराचे आवाज दर्शविणारी अक्षरांची जोडी’) /ks/, ग्रीसच्या संपूर्ण पश्चिम भागात सर्वात ठळकपणे वापरले जाते. रोमन लोकांनी नंतर ग्रीक वर्णमालेतील एक भिन्नता असलेल्या चालसिडियन वर्णमालेतील X अक्षर स्वीकारले. त्यांनी X हे अक्षर दर्शविण्यासाठी आणि रोमन अंक X किंवा 10 क्रमांक ओळखण्यासाठी दोन तिरपे ओलांडलेले स्ट्रोक असलेले ‘ची’ चिन्ह उधार घेतले. ग्रीकशी नाते असल्यामुळे नाताळला ‘एक्स-मास’ म्हणून ओळखले जाते. Dictionary.com नुसार, हे प्रथम इ.स. १५०० च्या दरम्यान वापरले गेले. X हे ग्रीक अक्षर ‘ची’ (chi) चे प्रतिनिधित्व करते, Χριστός (Christos) या शब्दातील प्रारंभिक अक्षरे असतात. एक्सच्या जागी chi वापरलेला दिसतो. Χριστός म्हणजे येशू ख्रिस्त. X हे शेकडो वर्षांपासून ख्रिस्त या शब्दाचे प्रतिनिधित्व करत आहे.

हेही वाचा : स्वातंत्र्य दिन विशेष : अभिव्यक्तिस्वातंत्र्य खरेच स्वातंत्र्य आहे का ? तुम्ही तुमची मते मांडू शकता का ?
१९६८ मध्ये, मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिका (MPAA) ने केवळ लैंगिक मजकूर किंवा ‘ऍडल्ट'(adult) चित्रण करणार्‍या चित्रपटांचे वर्गीकरण करण्यासाठी X-रेटिंग सादर केले, सामान्यत: स्पष्ट भाषा (explicit language) आणि लैंगिक मजकूर-कृती यासाठी हे रेटिंग होते. X ची निवड ‘स्पष्ट’ (explicit) या शब्दाच्या पहिल्या अक्षराशी निगडित होते. नंतर अनेक चित्रपट उद्योगांनी ‘एक्स’ हे अक्षर ऍडल्ट कॉन्टेट निर्माण करणाऱ्या, प्रदर्शित करणाऱ्या चित्रपटांसाठी स्वीकारले, तसेच त्यांनी ‘एक्स-रेटिंग’ स्वीकारले, निर्मात्यांनी चित्रपटाचे मार्केटिंग करण्यासाठी XXX चा वापर केला.

माहीत नसलेल्या गोष्टींसाठी X का वापरतात ?

‘एक्स’ या अक्षराचा स्वीकार गणितशास्त्राने केला, तसेच माहीत नसलेल्या, अमर्याद गोष्टी दर्शवण्यासाठी ‘एक्स’ अक्षर वापरले जाऊ लागले. बीजगणित असो किंवा भूमिती ‘एक्स’अक्षराला महत्त्व आहे. अमेरिकेमधील गणित आणि नॅचरल फिलॉसॉफी विषयाचे प्राध्यापक पीटर शूमर यांनी ‘द कॉन्व्हर्सेशन’ मासिकात लिहिले की, ‘गणितामधील हे अक्षर विविध संस्कृतीतून निर्माण झालेले आहे.’ त्यासाठी त्यांनी एक सिद्धांत सांगितला आहे.
या सिद्धांतानुसार, माहीत नसलेल्या गोष्टी शोधण्यासाठी वापरला जाणारा शब्द हा अरबी भाषेत होता, अरबी शब्द अल-शायून “काहीतरी’ ‘माहीत नसलेले’ या अर्थी वापरला जात असे. शायूनमधील ‘श’ हे अक्षर स्वीकारले. अरेबियन गणितज्ञांनी ‘श’ हे अक्षर गणितामध्ये वापरले. जेव्हा स्पॅनिश विद्वानांनी अरबी गणिती ग्रंथांचे भाषांतर केले तेव्हा त्यांच्याकडे ‘श’ ध्वनीसाठी अक्षर नव्हते आणि त्याऐवजी ‘के’ हे अक्षर निवडले. ‘के’ अक्षरासाठी त्यांनी ग्रीकमधील ‘एक्स’ चिन्ह घेतले. स्पॅनिश X नंतर लॅटिनमध्ये एक्स झाला.
तसेच या सिद्धांतानुसार, केवळ ‘एक्स’ हे अक्षर अज्ञात, माहीत नसलेल्या गोष्टींचे प्रतिनिधित्व करत नव्हते. पूर्वी दुसरी अक्षरे वापरली जात होती. फ्रेंच गणितज्ञ आणि तत्त्वज्ञानी रेने डेकार्टेस यांनी ‘एक्स’ हे अक्षर प्रसिद्ध केले. १७व्या शतकात भूमितीकरिता त्याने महत्त्वाचे आम केले. त्यात अनिर्दिष्ट स्थिरांकांसाठी (unspecified constants) त्याने वर्णमालेतील पहिली काही अक्षरे निवडली आणि चलांसाठी (variables) त्याने शेवटची अक्षरे उलट क्रमाने निवडली. त्यातून ‘एक्स’ अक्षर गणितामध्ये येऊ लागले.

हेही वाचा : स्वातंत्र्य दिन विशेष : भारताचे राष्ट्रगीत मूळ बंगाली होते का ? राष्ट्रगीताचा अर्थ, इतिहास आणि वर्तमान

X शी संबंधित राजकारण

अल्फाबेटिकल: हाऊ एव्हरी लेटर टेल्स अ स्टोरी (Alphabetical: How Every Letter Tells a Story) या पुस्तकात, ब्रिटीश लेखक मायकेल रोसेन यांनीदेखील X च्या उत्पत्तीचे श्रेय प्राचीन रोमन आणि ग्रीक लोकांना दिले आहे. तो म्हणतो, ‘जिथे काही भूमिका घ्यायची आहे, अंक दर्शवायचा आहे, गणित सोडवायचे आहे किंवा गुणाकार करायचा आहे, तिथे ‘एक्स’ अक्षर वापरले जाऊ लागले. प्रख्यात नागरी हक्क नेते माल्कम एक्स यांचे उदाहरण देऊन, रोझेनने नमूद केले की, गुलामांचा व्यापार, सामाजिकीकरण आणि एक्स यांचाही संबंध आहे. माल्कम यांनी आपले आडनाव बदलून X असे केले. कारण, काही कृष्णवर्णीय लोकांनी त्यांचे आडनाव गोऱ्या लोकांच्या समाजातील आहे, असे समजून घेण्याचे टाळले. तसेच बऱ्याच काळापासून कृष्णवर्णीय गुलामांना आडनाव नव्हते. काही लोकांनी आपले आडनाव लपवण्यासाठी ‘एक्स’ या अक्षराचा स्वीकार केला. कृष्णवर्णीय आणि गुलाम लोकांची सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख मिटवण्यासाठी त्यांना ‘एक्स’ हे अक्षर देण्यात आले.
रोझेन पुढे सांगतात की, १७व्या शतकात अमेरिकेमध्ये आणलेले कामगार हे निरक्षर होते. क्रॉस रेषा काढणे सोपे असल्यामुळे त्यांच्या सह्यांसाठी ‘एक्स’ अक्षर निवडले गेले. अमेरिकेने करार करून अशा अनेक निरक्षर लोकांना आणले आणि त्यातून त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले. एक स्कॉटिश लेखकाने लिहिले आहे की, ”हजारो ‘X’ ने अमेरिका तयार करण्यात मदत केली. हजारो ‘X’ अमेरिका पूर्ण होण्याआधीच नष्ट झाले. ”
आज काही लोकांना आपले लिंग मिस्टर (Mr) किंवा मिसेस (Mrs) ने दाखवायला आवडत नाही, ते लोक एमएक्स( Mx) वापरतात.

अशा प्रकारे ‘एक्स’ या अक्षराला प्राचीन इतिहास आहे. ‘एक्स’ चा वापर अनेक ठिकाणी करण्यात आला.