लंडनस्थित असलेला ऐतिहासिक ‘इंडिया क्लब’ १७ सप्टेंबर २०२३ रोजी कायमस्वरूपी बंद करण्यात आला. युनायटेड किंग्डम (UK) येथे भेट देणाऱ्या भारतीय नेत्यांचे हक्काचे ठिकाण म्हणून या क्लबकडे पाहिले जात होते. ब्रिटनमध्ये असलेले भारतीय लोक या क्लबमध्ये एकत्र येत असत. या रेस्टॉरंटमध्ये भारतीय जेवण वाढले जात असे. ‘इंडिया क्लब’ला सुवर्ण इतिहास असल्याचे मानले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक भारतीय नेते, ब्रिटिश उच्चपदस्थ अधिकारी या क्लबला भेट देत असत. मागच्या काही वर्षांपासून इंडिया क्लब बंद होण्याची चर्चा सुरू होती, त्यासाठी अनेक बाबी कारणीभूत होत्या. त्याची चर्चा ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने आपल्या लेखातून केली आहे. त्याबद्दल घेतलेला आढावा…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘इंडिया क्लब’ची सुरुवात कशी झाली?
लंडनच्या गजबजलेल्या रस्त्यावरील स्ट्रँड कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये इंडिया क्लब स्थित होता. १९५१ साली इंडिया लीगने या क्लबची स्थापना केली होती. इंडिया लीग या ब्रिटिश संघटनेमध्ये ब्रिटिश समाजातील अभिजन वर्गाचे सदस्य सहभागी होते; जे भारतीय स्वातंत्र्य आणि स्वराज्याचे समर्थन करीत होते. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानतंर भारत-ब्रिटन मित्रत्व जपण्यासाठी या संघटनेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, इंडिया क्लबच्या स्थापनेनंतर अल्पावधीतच ते आशियाई समुदायाची सेवा करणाऱ्या इंडिया लीगसारख्या संघटनांचे आधार केंद्र बनले.
इंडिया क्लबच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, “इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन, इंडियन वर्कर्स असोसिएशन आणि ब्रिटनमधील इंडियन सोशालिस्ट ग्रुप असे काही गट त्यांच्या बैठका आणि कार्यक्रमांसाठी १४३ स्ट्रँडचा (इंडिया क्लबचा पत्ता) वापर करीत होते. ही जागा इंडिया लीगच्या नव्या शाखांसाठीही एक आधार होती. या पत्त्यावरून मोफत कायदेशीर सल्ला, संशोधन व अध्ययन केंद्रही चालविले जात असे.”
वेबसाईटवर पुढे म्हटलेय की, ब्रिटनमध्ये आशियाई लोकांना दैनंदिन जीवनात अनेक कठीण समस्यांचा सामना करावा लागत असताना लंडनमधील इंडिया क्लब हे भारतीय उपखंडातील प्रवाशांकरिता एक महत्त्वपूर्ण केंद्र बनले होते. स्थलांतरीतांसाठी जणू हे एक दुसरे घरच होते. काही दिवसांपासून डोसा, सांबार, असे भारतीय पदार्थ देण्यासोबतच इंडिया क्लबमध्ये विविध विषयांवरील चर्चासत्रे आणि चित्रपटांचे स्क्रीनिंगही करण्यात येत होते.
इंडिया क्लबला कोणकोणत्या नेत्यांनी भेटी दिल्या होत्या?
पीटीआयच्या माहितीनुसार, पत्रकार चंद्रन थरूर हे इंडिया क्लबच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांची मुलगी स्मिता थरूर या अजूनही लंडनमध्ये राहतात. स्मिता थरूर या त्यांचा भाऊ शशी थरूर आणि इतर कुटुंबीयांसह अनेकदा ‘इंडिया क्लब’ला भेट देत असतात.
स्मिता थरूर यांनी सांगितले की, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी इंडिया क्लबला भेट दिलेली आहे. एका आर्किटेक्चरल डायजेस्टमध्ये छापून आलेल्या लेखानुसार, ज्या ज्या भारतीय आणि ब्रिटिश लोकांनी भेटी दिल्या, त्यांची छायाचित्रे इंडिया क्लबच्या भिंतीवर लावण्यात आली आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, पहिले ब्रिटिश भारतीय खासदार दादाभाई नौरोजी, तत्त्ववेत्ते बट्रॅंड रसेल, चित्रकार एम. एफ. हुसैन आणि इतर अनेक लोकांचा यामध्ये समावेश आहे.
भारताचे माजी संरक्षणमंत्री व मुत्सद्दी अधिकारी व्ही. के. क्रिष्णा मेनन यांनी इंडिया क्लबच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज’च्या (SOAS) स्थलांतर आणि उपजीविकेसाठी दुसऱ्या देशात येणाऱ्या लोकांचा अभ्यास करणाऱ्या पार्वथी रमन म्हणाल्या, “मेनन ‘इंडिया क्लब’ला अशी जागा बनवू इच्छित होते, जिथे भारतीय युवावर्ग, कामगार एकत्र राहू शकतील, जिथे त्यांना परवडणाऱ्या दरात अन्न मिळेल आणि या ठिकाणी ते राजकीय चर्चा करून, ते आपल्या भविष्याचे नियोजन करतील.” मेनन यूकेचे पहिले भारतीय उच्चायुक्तही बनले होते.
इंडिया क्लब बंद होण्याची कारणे काय आहेत?
‘रॉयटर्स’ने दिलेल्या माहितीनुसार, पारशी मूळ असलेले यादगार मर्कर हे त्यांची पत्नी फ्रेनी आणि मुलगी फिरोजा यांच्यासह मिळून १९९७ पासून इंडिया क्लबची देखभाल करीत आहेत. ते गोल्ड सँड हॉटेल्स लिमिटेडचे संचालकही आहेत. लंडनमधील क्लबला वाचविण्यासाठी त्यांनी ‘सेव्ह इंडिया क्लब’, अशी मोहीमही सुरू केली होती. २०१८ साली ही इमारत पाडण्यापासून वाचविण्यात या मोहिमेला यश मिळाले होते. इंडिया क्लबच्या संचालकांना इमारतीच्या मालकांकडून नोटीस मिळाली होती. त्यानुसार हॉटेलचे आधुनिकीकरण करण्यासाठी क्लब बंद करण्यात येत असल्याचे सांगितले गेले. त्याच वर्षी वेस्टमिन्स्टर शहर परिषदेने हा प्रस्ताव फेटाळून लावला. आधुनिकीकरण केल्यामुळे एका महत्त्वपूर्ण सांस्कृतिक वारसा स्थळाचे नुकसान होऊ शकते.
करोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला फटका बसला. हॉटेलचे भाडे खूप वाढल्यामुळे राहण्याच्या भाड्यामध्ये मोठी वाढ झाली. या परिस्थितीत इंडिया क्लब संचालकांना हा क्लब चालविणे अवघड होऊन बसले आहे. क्लबच्या प्रबंधक फिरोजा मर्कर रॉयटर्सशी बोलताना म्हणाल्या की, मागच्या काही आठवड्यांपासून क्लबमध्ये लोकांचा राबता वाढला आहे. इंडिया क्लब रेस्टॉरंट जवळपास सुरू करण्यासाठी आम्ही नवीन जागा शोधत आहोत. वसाहत काळातील भारतीय कॉफी हाऊसची अनुभूती मिळेल, असे वातावरण पुन्हा तिथे निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल.