भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीला भारतीय चलनांवर महात्मा गांधींचा फोटो नव्हता. मात्र, नंतरच्या काळात आधी काही नोटांवर आणि कालांतराने सर्वच नोटांवर महात्मा गांधींचा फोटो दिसला. विशेष म्हणजे या मधल्या काळात भारतीय नोटांच्या आकारापासून तर अगदी चित्रांपर्यंत अनेक बदल झाले. मात्र, गांधींचा फोटो कायम राहिला. याच गांधीजींची आज (२ ऑक्टोबर) जयंती. त्या निमित्ताने नोटांवर महात्मा गांधींचा फोटो नेमका कधी आणि का छापण्यात आला त्याचा हा आढावा…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय नोटांचं स्वरुप ब्रिटिश काळापासून अगदी स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत बदलत आलं आहे. स्वातंत्र्यपूर्वी काळात भारतीय नोटांवर ब्रिटनच्या राजाचं चित्र होतं. मात्र, भारताला १५ ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र मिळाल्यानंतर हे चित्र बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी सारनाथच्या अशोक स्तंभावरील सिंहाचा फोटो घेण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वतंत्र भारतातील भारतीय सरकारने पहिली नोट १९४९ मध्ये छापली. ती नोट एक रुपयांची होती.

हेही वाचा : चतु:सूत्र : यंत्र हवे, पण ते ‘माणसा’साठी!

सर्वात पहिल्यांदा नोटांवर गांधीजींचा फोटो कधी छापला?

१९६९ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त एक रुपयाच्या नोटेवर गांधीजींचा फोटो छापला. त्यानंतर १८ वर्षांनी म्हणजेच १९८७ मध्ये महात्मा गांधींचा फोटो असलेली ५०० रुपयांची नोट छापण्यात आली. पुढे १९९६ मध्ये सर्वच नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापण्यात आला.

हेही वाचा : “महात्मा गांधींचा जातीभेदावर विश्वास होता”; रणजीत सावरकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “सावरकर जेव्हा…”

भारतीय चलनावर गांधींजींचा फोटो का?

रिझर्व्ह बँकेने बनावट नोटा छापल्या जाऊ नये म्हणून भारतीय चलनावर अनेक ऐतिहासिक चिन्हं आणि चित्रे घेतली होती. मात्र, कोणत्याही निर्जीव वस्तूचं चिन्ह किंवा फोटोची नक्कल करणं आणि बनावट नोटा तयार करणं तसं तुलनेने सोपं होतं. त्यामुळेच बनावट नोटांवर प्रतिबंध घालण्यासाठी गुंतागुंतीची रचना असलेल्या मानवी चेहऱ्याचा वापर करावा असा विचार पुढे आला.

नोटांवर मानवी चेहऱ्याचा फोटो छापण्याचा विचार पुढे आल्यानंतर नेमका कुणाचा फोटो छापायचा यावरही अनेक चर्चा झाल्या. यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या नावावरही चर्चा झाली. मात्र, बहुतांश स्वातंत्र्यसैनिकांची देशाच्या ठराविक भौगोलिक भागात ओळख होती.

याच कारणाने ठराविक भौगोलिक भागातील ओळख असलेल्या व्यक्तीचा फोटो छापल्यास वाद होईल, अशीही शक्यता वर्तवण्यात आली. या तुलनेत महात्मा गांधी संपूर्ण देशात ओळखला जाईल असा चेहरा होता. त्यामुळे नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : लोकरंग विशेष : गांधी एक अपरिहार्य रहस्य

नोटांवर असलेला महात्मा गांधींचा फोटो कोठून घेतला?

महात्मा गांधींचे अनेक फोटो उपलब्ध आहेत. त्या फोटोंमध्ये वयानुसार त्यांच्या चेहरापट्टीत बदलही झालेले दिसतात. मात्र, नोटांवर नेमका कोणता फोटो घेण्यात आला याविषयी अनेकांना उत्सुकता असते. या फोटोची एक खास गोष्ट आहे आणि हा फोटो कोलकात्यात काढण्यात आला होता.

हेही वाचा : पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त खादी विक्री प्रतिकांच्या पळवापळवीतून उपक्रम आखल्याचा आक्षेप

महात्मा गांधी तत्कालीन म्यानमार आणि भारताचे ब्रिटिश सचिव फ्रेडरिक पॅथिक लॉरेन्स यांना कोलकात्यातील ‘व्हाईसराय हाऊस’मध्ये भेटले होते. त्याच ठिकाणी महात्मा गांधींचा एक फोटो काढण्यात आला होता. त्यावरूनच नोटांवरील फोटो घेण्यात आला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why mahatma gandhi photo chosen on indian currency notes know about history pbs