मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) कुठल्याही परीक्षांच्या वेळापत्रकाचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ‘एमपीएससी’कडून जाहीर होणाऱ्या परीक्षा आणि निकालाच्या संभाव्य वेळापत्रकाचे पालन होत नसेल तर त्याचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

वेळापत्रक जाहीर करण्याचा उद्देश काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) स्पर्धा परीक्षार्थींना परीक्षांची तयारी योग्यरितीने करता यावी, परीक्षा नेमक्या कधी होणार, याचा अंदाज यावा म्हणून दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. दरवर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान वेळापत्रक जाहीर करून यात मागील वर्षातील उर्वरित परीक्षा, त्यांच्या संभाव्य तारखा, निकालाच्या तारखा, आतापर्यंत जाहीर झालेल्या परीक्षांचे निकाल याची माहिती दिली जाते. तर पुढील वर्षात होणाऱ्या कुठल्या परीक्षांचा यात समावेश आहे, त्याची जाहिरात कधी येणार, परीक्षा कधी होणार याचीही माहिती दिली जाते. परीक्षेच्या स्वरूपाविषयीच्या माहितीचाही यात समावेश असतो. यामुळे आगामी परीक्षांचा अंदाज घेण्यास विद्यार्थ्यांना फायदा होतो.

Champions Trophy Tour Updates PoK cities removed from ICC global Trophy Tour
Champions Trophy : भारतापुढे पाकिस्तानने घेतलं नमतं, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नव्या टूरमधून POK वगळलं
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Three days holiday in school
तीन दिवसांची सुट्टी! मतदानावर काय परिणाम…
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Today is the last day to apply for various courses of Idol Mumbai print news
‘आयडॉल’च्या विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

हेही वाचा >>>देवदर्शनावरुन महाराणा प्रतापांच्या वारसदारांमध्ये वाद; वादंगाचं कारण काय?

वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने किती महत्त्वाचे?

‘एमपीएससी’च्या संभाव्य वेळापत्रकाची विद्यार्थी चातकाप्रमाणे वाट बघत असतात. वेळापत्रकामुळे त्यांच्या रखडलेल्या परीक्षा आणि आगामी परीक्षांचा अंदाज घेऊन तसे नियोजन करता येते. विशेष म्हणजे, ‘एमपीएससी’कडून राज्यसेवा परीक्षेसह अनेक अराजपत्रित अधिकाऱ्यांच्या पदासाठी परीक्षा घेतल्या जातात. राज्यसेवेची तयारी करणारा विद्यार्थी हा सोबतच अन्य परीक्षांची तयारी करत असतो. यात संयुक्त परीक्षा गट-ब, संयुक्त परीक्षा गट-क या परीक्षांचा समावेश असतो. ‘एमपीएससी’च्या वेळापत्रकात या सर्व परीक्षांच्या संभाव्य तारखांचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांना नियोजन करण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक महत्त्वाचे असते.

वेळापत्रकानुसार परीक्षा व निकाल जाहीर होतात?

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर प्रत्येक राज्य आयोगाकडून परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक देण्याची परंपरा आहे. ‘यूपीएससी’कडून दरवर्षी जाहीर होणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकाचे अत्यंत काटेकोर पालन केले जाते. त्यांच्या परीक्षा आणि निकालामध्ये कुठलाही विलंब होत नाही. अशीच अपेक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनही केली जाते. परंतु, आतापर्यंत वेळापत्रकात दिल्याप्रमाणे कुठल्याही परीक्षा झाल्या नाहीत, अशीच उदाहरणे आहेत. २०२४च्या संभाव्य वेळापत्रकामध्ये आयोगाने १६ परीक्षांचा तपशील जाहीर केला होता. यापैकी अद्याप ११ परीक्षा प्रलंबित असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या २०२५च्या संभाव्य वेळापत्रकावरून दिसून येते. विशेष म्हणजे, काही परीक्षा झाल्या तर काहींचे निकाल जाहीर झाले नाही, तर काहींचे अभ्यासक्रमही जाहीर व्हायचे असल्याचे दिसून येते.

हेही वाचा >>>Buddhism in China: ‘त्या’ स्वप्नामुळे चीनमध्ये पसरला बौद्ध धर्म; काय सांगते ऐतिहासिक परंपरा?

कोणत्या परीक्षा रखडल्या?

२०२४च्या संभाव्य वेळापत्रकामध्ये आयोगाने १६ परीक्षांचा तपशील जाहीर केला होता. यापैकी अद्याप ११ परीक्षा प्रलंबित असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या २०२५च्या संभाव्य वेळापत्रकावरून दिसून येते. यात महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा २०२३- सर्वसाधारण गुणवत्ता यादी रखडली, यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा- मागणीपत्र नाही, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा- मागणीपत्र नाही, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ – पूर्व परीक्षा प्रलंबित, महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२४- पूर्व परीक्षा २ फेब्रुवारी २०२५, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ – मुख्य परीक्षा २१ जून २०२५, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४- जाहिरात प्रलंबित, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा २०२४ – पूर्व परीक्षा १ डिसेंबर, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ – मुख्य परीक्षा १० मे, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४- मुख्य परीक्षा १८ मे २०२५, कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४- मुख्य परीक्षा १८ मे २०२५ आदींचा समावेश आहे.

विलंबास राज्य सरकार जबाबदार असते?

‘एमपीएससी’च्या संभाव्य वेळापत्रकामध्ये परीक्षांच्या जाहिराती कधी येणार याची माहिती दिली जाते. परंतु, जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक पदांचे मागणीपत्र आयोगाकडे येणे आवश्यक असते. २०२४च्या संभाव्य वेळापत्रकावर नजर टाकली असता अनेक जागा रिक्त असणाऱ्या विभागातील काही पदांचे मागणीपत्र अद्यापही प्राप्त झाले नाहीत. मागणीपत्राअभावी ‘एमपीएससी’कडून जाहिरात प्रसिद्ध होत नाही. तसेच शासनाकडून विविध आरक्षणामध्ये बदल केला जातो. काही पदांचे सेवानियम बदलले जातात. याचा फटकाही परीक्षांना बसतो. यावर्षी मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर बहुतांश जाहिरातींमध्ये बदल करण्यात आल्याने सर्व परीक्षा रखडल्या होत्या. त्यामुळे शासन स्तरावर होणाऱ्या बदलांचाही परीक्षांना फटका बसत असल्याचे दिसून येते.

विद्यार्थ्यांचे कसे नुकसान होते?

‘एमपीएससी’कडून परीक्षेच्या वेळापत्रकाचे पालन न झाल्यास उमेदवारांना त्याचा प्रचंड फटका बसतो. वेळापत्रकानुसार विद्यार्थी आगामी परीक्षांचे नियोजन करतात. यासाठी मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये जाऊन तयारी करतात. मात्र, अनेकदा एमपीएससीकडून परीक्षेच्या तारखांमध्ये ऐन वेळेवर बदल केला जातो. काही परीक्षा स्थगित होतात. तर अनेक परीक्षांच्या जाहिरातीच प्रसिद्ध केल्या जात नाहीत. परीक्षांच्या जाहिराती आल्या तर अभ्यासक्रम जाहीर करण्यास वर्षभराचा विलंब केला जातो. या सर्वांमुळे विद्यार्थ्यांचे परीक्षेचे नियोजन बिघडते. शहराच्या ठिकाणी राहून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. याशिवाय परीक्षा वेळेत जाहीर न झाल्याने वयोमर्यादेच्या काठावर असणाऱ्या उमेदवारांनाही मोठा फटका बसतो. वेळापत्रकानुसार परीक्षांची जाहिरात न आल्यास त्यांना परीक्षेची संधी गमवावी लागते.