इंद्रायणी नार्वेकर

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा खालावत असून सात धरणेदेखील अपुरी पडू लागली आहेत. मुंबईची भविष्यातील पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी गारगाई, पिंजाळ, दमणगंगा धरण प्रकल्पांची घोषणा काही वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने केली होती. सन २०४० मध्ये पाण्याची गरज पुरवता येईल या दृष्टीने हे प्रकल्प आखण्यात आले होते. मात्र त्यापैकी एकही प्रकल्प पुढे सरकलेला नाही. मुंबईला आणखी चार नवीन धरणे देणारे हे प्रकल्प सध्या चर्चेतून मागे पडले होते. मात्र, गारगाई धरणासाठी भूसंपादन कक्षातील अधिकाऱ्यांना मुदतवाढ दिल्यामुळे हे प्रकल्प पुन्हा चर्चेत आले आहेत.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!
Mahayutti candidates pressurize to extend the harvesting season Mumbai news
गाळप हंगाम लांबवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांचा दबाव?
Ajit Pawar lashed out at the group over the issue of disclaimer regarding the clock symbol print politics news
घड्याळाबाबत अस्वीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार गटाला फटकारले
Loksatta article Modern capital finance-values Retail loan without salvation
लेख: वाढत्या ‘विनातारण’ सूक्ष्मकर्जांची चिंता!

मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे किती आणि कुठे आहेत?

मुंबई शहराला सध्या तानसा, मोडक सागर (वैतरणा), हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा, ऊर्ध्व वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांतून केला जातो. मात्र ही धरणे मुंबई शहरापासून सुमारे १०० किलोमीटर वा त्यापेक्षा जास्त अंतरावर आहेत. मुंबई शहराच्या हद्दीत केवळ विहार आणि तुळशी हे दोन तलाव आहेत. मुंबई शहराला या सर्व जलस्रोतातून ३८५० दशलक्ष लिटर प्रतिदिन इतका पाणीपुरवठा करण्यात येतो.

पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पालिकेचे नियोजन काय?

मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी अजूनही पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडल्यास मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागते. मुंबईत मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत असून वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची गरजही वाढत आहे. २०४१पर्यंत मुंबईकरांच्या पाण्याची गरज ५९४० दशलक्ष लीटर इतकी होणार आहे. मात्र सध्या तरी सात धरणांव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. पाण्याची ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी नेमलेल्या डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार मुंबई पालिकेने गारगाई, पिंजाळ व दमणगंगा असे तीन प्रकल्प हाती घेतले होते. या प्रकल्पांचे काम रखडले असून दोन वर्षांपूर्वी पालिकेने मनोरी येथे निःक्षारीकरण प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याचा हा महागडा प्रकल्प असून अद्याप त्याला सुरुवात झालेली नाही.

विश्लेषण: हुतात्मा स्मारकावर साम्यवादी प्रभावामागचे कारण काय?

या प्रकल्पांची सद्यःस्थिती काय आहे?

गारगाई, पिंजाळ व दमणगंगा पिंजाळ हे नदीजोड प्रकल्प आहेत. त्याअंतर्गत नवीन ४ धरणे मुंबईकरांना मिळू शकणार आहेत. त्यात पिंजाळ, गारगाई या २ धरणांचा समावेश आहे दमणगंगा-पिंजाळ या नदीजोड प्रकल्पावर २ धरणे बांधण्यात येणार आहेत. हे सगळे प्रकल्प २०३०पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. गारगाई धरणासाठी मोठ्या प्रमाणावर लाखो झाडे कापावी लागणार असल्यामुळे हा प्रकल्प बाजूला ठेवण्यात आला होता.

गारगाई प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रापैकी खाजगी जमिनींच्या संयुक्त मोजणीचे काम पूर्ण केले आहे. तसेच देवळी गावातील मोजणीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रकल्प राबवण्याचा निर्णय झाल्यास प्रत्यक्ष भूसंपादनाचे काम, पुनर्वसन व पुनर्स्थापना करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. प्रकल्पासाठी वनखात्याच्या तसेच पर्यावरणाच्या विविध परवानग्या आवश्यक असून त्याकरीता पाठपुरावा सुरू आहे. मात्र अन्य दोन प्रकल्प रखडलेले आहेत.

हे तीन प्रकल्प झाल्यास किती पाणी उपलब्ध होईल?

चार धरणांचे प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास इ.स. २०४०मध्ये महापालिका क्षेत्राची पाण्याची गरज भागविणे शक्य होणार आहे. त्यापैकी गारगाई प्रकल्पातून रोज ४४० दशलक्ष लिटर, पिंजाळ प्रकल्पाद्वारे ८६५ दशलक्ष लिटर तर दमणगंगा-पिंजाळ या जोड प्रकल्पातील २ धरणांमधून १५८६ दशलक्ष लिटर याप्रमाणे एकूण २८९१ दशलक्ष लिटर पाणी रोज उपलब्ध होऊ शकेल.

गारगाई धरण प्रकल्प कसा आहे?

गारगाई धरण प्रकल्प वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ बांधण्यात येणार आहे. गारगाई धरण ते मोडक सागर या सुमारे २.५ कि.मी. लांबीच्या बोगद्याचादेखील यात समावेश आहे. या धरणामुळे ओगदे, खोडदे ही गावे पूर्णतः बाधित होणार असून तिळमाळ, पाचघर, फणसगाव, आमले ही गावे अंशतः बाधित होणार आहेत. गारगाई प्रकल्पामुळे एकूण ८४० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. बाधित होणाऱ्या सहा गावांचे देवळी गावात स्थलांतर करण्यात येणार आहे. गारगाई धरणासाठी ४२६ हेक्टर खाजगी जमीन पालिकेला खरेदी करावी लागणार आहे. या जमीनीच्या भूसंपादनासाठी पालिकेने खास भूसंपादन कक्ष तयार केला आहे.

ज्या बेळगावातून संयुक्त महाराष्ट्राचा पहिला हुंकार दिला, तोच आज महाराष्ट्रापासून वंचित; सीमावाद प्रश्न का निर्माण झाला?

पिंजाळ धरण प्रकल्प कसा आहे?

पिंजाळ प्रकल्पांतर्गत पिंजाळ नदीवर धरण बांधण्यात येणार आहे. पिंजाळ धरण ते गुंदवली या सुमारे ६४ कि.मी. लांबीच्या बोगद्याचादेखील त्यात समावेश आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये असणाऱ्या खिडसे परिसरात धरण बांधण्यात येणार आहे. २०५५ हेक्टर्सचा परिसर समाविष्ट असणाऱ्या पिंजाळ प्रकल्पातून दररोज ८६५ दशलक्ष लिटर्स इतके पाणी उपलब्ध होऊ शकते. वर्ष २०१७-१८ या वर्षात पिंजाळ प्रकल्पाची सुरुवात होऊन २०२५-२६ मध्ये प्रकल्प पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते.

दमणगंगा पिंजाळ नदीजोड प्रकल्प कसा आहे?

दमणगंगा, पिंजाळ जोड प्रकल्पांतर्गत २ धरणे बांधण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यामध्ये असणाऱ्या भुगड गावाजवळील दमणगंगा नदीवर ८५१.५० मीटर लांबीचे धरण आणि पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये असणाऱ्या बेहाडपाडा या गावाजवळील वाघ नदीवर ६१८.२० मीटर लांबीचे धरण बांधण्यात येणार आहे. दमणगंगा, पिंजाळ जोड प्रकल्पांतर्गत भुगड धरणापासून खारगीहिल धरणापर्यंत १७.४८८ कि.मी. लांबीचा जलबोगदा तसेच खारगीहिल ते पिंजाळ प्रकल्पापर्यंतचा सुमारे २५.२२४ कि. मी. लांबीचा जलबोगदा बांधण्यात येणार आहे. दमणगंगा, पिंजाळ या नदीजोड प्रकल्पास राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळावी, यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या स्तरावर विचाराधीन आहे. दमणगंगा, पिंजाळ हा नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाद्वारे (National Water Development Authority) व महापालिकेच्या सहकार्याने पूर्णत्वास नेण्यात येणार होता. हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास ८ वर्षे लागणार आहेत. मात्र त्याची अद्याप सुरुवात झालेली नाही.