विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि श्री राम सेना यांसारख्या उजव्या विचारसरणीच्या गटांनी कर्नाटकातील खेड्यापाड्यात होणाऱ्या मंदिर जत्रेत मुस्लिम विक्रेत्यांना स्टॉल लावण्यापासून रोखण्याच्या आवाहनामुळे काही मंदिरांमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत दक्षिण कन्नड, उडुपी आणि शिवमोगा या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये मुस्लिमांना मंदिर परिसरात स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सध्या या जिल्ह्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकातील भाजपा सरकारने २००२ मध्ये कर्नाटक हिंदू धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स कायदा, १९९७ अंतर्गत जारी केलेल्या नियमानुसार गैर-हिंदूंना मंदिर परिसरात दुकाने ठेवण्यास मनाई आहे, असे सांगून मंदिराच्या जत्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांवरील निर्बंधांचे समर्थन केले आहे. वादाच्या केंद्रस्थानी असलेले मंदिर मेळे विशिष्ट क्षेत्रांतील संस्कृती आणि परंपरांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे वेगवेगळ्या जाती आणि धर्माचे लोक एकत्र येत सण उत्सव साजरे करतात.

कर्नाटकातील मंदिरांमधील जत्रांचे स्वरूप काय आहे?

कर्नाटकात, मंदिरांमध्ये जत्रा भरतात. तर, दर्ग्यांमध्ये उरूसची जत्रा भरते. शिवाय बहुतांश ग्रामीण भागात चर्चमध्ये वार्षिक स्थानिक मेळे भरतात. या जत्रा आणि उत्सव स्थानिक संस्कृती आणि लोककथांचे प्रतिनिधित्व करतात. इतिहासकार म्हणतात की, कर्नाटकमध्ये शेकडो वर्षांपासून अशा जत्रा भरतात, याचा उल्लेख प्राचीन धर्मग्रंथांमध्ये देखील आहे. उत्खनन विभागाचे माजी संचालक आणि म्हैसूर विद्यापीठाच्या प्राचीन इतिहास आणि पुरातत्व विभागाचे माजी प्रमुख प्रो. एन एस रंगराजू यांच्या मते, “हे मेळे विशिष्ट ठिकाणच्या संस्कृतीची ओळख आहेत. याचा धर्माशी काहीही संबंध नाही परंतु हे सर्व काही विशिष्ट प्रदेशातील लोकांशी संबंधित आहे.”

नुकत्याच झालेल्या राज्य विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान, सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी आमदारांना त्यांच्या गावातील मंदिराच्या जत्रेसाठी आमंत्रित केले आणि त्या रात्री त्यांच्या गावी जाण्यासाठी शुक्रवारी दुपारी अधिवेशन संपवण्याचा प्रयत्न केला. ७३ वर्षीय माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या गेल्या आठवड्यात त्यांच्या गावी गेले आणि वीर मक्काला कुनिथा, या प्रदेशातील लोकनृत्य नृत्य करण्यासाठी मित्रांसोबत सामील झाले.  

मंदिरात जत्रा कधी आणि का भरतात?

स्थानिक मेळावे हे ग्रामीण भागातील कृषी अर्थव्यवस्थेचे उत्पादन आहे आणि सहसा नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान आयोजित केले जाते. संशोधकांच्या मते, शेतकर्‍यांना या काळात शेतीच्या कामांना विश्रांती मिळते कारण शेवटच्या आणि पुढील पीक हंगामात अंतर असते. एम चंद्र पुजारी, हंपी कन्नड युनिव्हर्सिटीच्या डेव्हलपमेंट स्टडीज विभागातील सेवानिवृत्त प्राध्यापक म्हणतात, “धार्मिक कार्यांव्यतिरिक्त, आजच्या शहरी वर्गाला मनोरंजनासाठी सहलीला किंवा मॉलमध्ये किंवा मनोरंजन उद्यानात जाऊन विश्रांती मिळते. प्राचीन काळी हे मेळे गावकऱ्यांसाठी मनोरंजन आणि विश्रांतीचे ठिकाण होते.”

जत्रांचं स्वरुप जातीयवादी का झालं?

हिजाबच्या वादानंतर मुस्लिमांनी सरकारी महाविद्यालयांमध्ये डोक्यावर स्कार्फ घालण्यावर लादलेल्या निर्बंधांना विरोध केला आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी एका दिवसासाठी स्वेच्छेने दुकानं आणि इतर व्यवसाय बंद ठेवले. त्यावरून कर्नाटकातील उजव्या विचारसरणीच्या गटांनी जत्रेत मुस्लिमांची दुकानं असण्यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. त्यांनी मुस्लिम व्यापाऱ्यांना प्रतिबंधित करण्यासाठी कर्नाटक हिंदू धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स कायदा,२००२ च्या नियम १२ चा हवाला दिला. नियमात असे म्हटले आहे की, “जमीन, इमारत किंवा परिसराजवळील जागा यासह कोणतीही मालमत्ता गैर-हिंदूंना भाड्याने दिली जाणार नाही.”

यासंदर्भात काही भाजपा आणि संघ परिवाराच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर २०२१ मध्ये मुस्लिम विक्रेत्यांवर बहिष्कार टाकण्याची हालचाल सुरू झाली, जेव्हा कर्नाटकच्या किनारपट्टीवरील उडुपी जिल्ह्यातील कुंदापुरा भागातील गंगोली येथे अनेक मुस्लिमांनी मच्छिमार महिलांच्या निषेधार्थ हिंदू विक्रेत्यांकडून मासे खरेदी करणे बंद केले. हे सर्व मासे विक्रेते अवैध गोहत्या विरोधातील मोर्चात सहभागी झाले होते. म्हणून मुस्लिमांनी त्यांच्याकडून मासे खरेदी बंद केली होती. याचा भाजपाचे राष्ट्रीय सचिव सी टी रवी यांच्यासह इतर नेत्यांनी निषेध केला होता.

मेळ्यांची सद्यस्थिती काय आहे?

करोना या साथीच्या आजारामुळे दोन वर्षांनंतर आयोजित केल्या जाणार्‍या बहुतेक वार्षिक जत्रांना मोठी गर्दी झाली आहे. शेकडो जत्रा भरणाऱ्या राज्याच्या किनारी भागात मुस्लिम विक्रेत्यांवर बहिष्कार सुरू झाला. ही मोहीम आता कर्नाटकच्या इतर भागात नेण्यात येत आहे. काही ठिकाणी उजव्या विचारसरणीच्या मागण्या मंदिर समित्यांनी मान्य केल्या आहेत तर काही ठिकाणी त्या फेटाळल्या आहेत. बेंगळुरूच्या बाहेरील नेलमंगलामध्ये, मंदिर समितीने मुस्लिम दुकानदारांना मंदिराच्या जत्रेत परवानगी दिली. राज्याच्या सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील किनारपट्टी भागात जिथं उजव्या विचारसरणीचे गट प्रभावी आहेत, तिथं मंदिर समित्यांनी मंदिराच्या जत्रेत मुस्लिम दुकानदारांना प्रतिबंधित केले आहे.

बंदीवर राजकीय पक्षांची भूमिका काय?

कर्नाटकातील भाजपा सरकारने असे म्हटले आहे की, गैर-हिंदूंना मंदिराच्या उत्सवांमध्ये व्यवसाय करण्यापासून प्रतिबंधित करण्याचा नियम २००२ मध्ये एसएम कृष्णाच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने आणला होता. दरम्यान,  भाजपाच्या दोन आमदारांनी मंदिराच्या जत्रेत मुस्लिमांना बंदी घातल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “हा सर्व वेडेपणा आहे. कोणताही देव किंवा धर्म अशा गोष्टींचा उपदेश करत नाही,” असे भाजपाचे आमदार एच विश्वनाथ यांनी म्हटले आहे. जेडी(एस) नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी राज्य सरकारवर टीका केली आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे “हिंदू उजव्या विचारसरणीच्या गटांच्या हातातील बाहुलं” असल्याचे म्हटले आहे.