चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील कलाकृतींचा आणि कलाकारांचा गौरव करण्यासाठी गेल्या आठवड्यात लॉस एंजेलिसमध्ये गोल्डन ग्लोब पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले. याच सोहळ्यात ‘आरआरआर’ चित्रपटातील गाण्याला पुरस्कार मिळाला आणीस सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली. अशीच चर्चा नेटफ्लिक्सच्या एका वेबसीरिजबद्दल होताना दिसत आहे. नेटफ्लिक्सच्या ‘डाहमार – मॉन्स्टर: द जेफ्री डाहमार स्टोरी’ या वेबसीरिजमधील सिरीयल किलरच्या भूमिकेसाठी अभिनेता इव्हान पीटर्सची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या निवडीमुळे सध्या बरीच मंडळी अस्वस्थ आहेत. टोनी ह्यूजेस एक बहिरा आणि कृष्णवर्णीय तरुण जो डाहमारचा बळी ठरला होता, त्याच्या आईने यावर टीका केली आहे. त्याची आई शर्ली ह्यूजेस यांनी ‘टीएमझेड आउटलेट’शी संवाद साधताना सांगितले, “जगभरात बरेच मनोरुग्ण आणि आजारी लोक आहेत. एखाद्या सिरियल किलरच्या भूमिकेतून अभिनयाची चुणूक दाखवून पुरस्कार मिळवणारे कलाकार हे वेड कायम ठेवतात आणि यामुळेच अशा मनोरुग्णांना आणि त्यांच्या दुष्कृत्यांना प्रसिद्धी मिळते.”
आणखी वाचा : विश्लेषण : क्रूरतेच्या सगळ्या सीमा ओलांडून १७ लोकांची हत्या करणारा, नरभक्षक जेफ्री डॅमर होता तरी कोण?
८० आणि ९० च्या दशकात अमेरिकेतील कित्येकांची झोप उडवली होती. मनोरुग्ण, सायको किलर हे शब्दही छोटे पडतील इतके भयावह अपराध त्याने अगदी कोवळ्या वयात केले आहेत. याचंच या वेबसीरिजमध्ये चित्रीकरण केलं गेलं. प्रेक्षकांनी या वेबसीरिजला उत्तम प्रतिसाद दिला. डाहमारचे अनेक बळी हे कृष्णवर्णीय तरुण पुरुष होते, ते LGBTQ समुदायाचे होते आणि या अल्पसंख्याक लोकांच्या समस्यांच्या तपासात पोलिस यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसून आली असं या वेबसीरिजमधून अधोरेखित करण्यात आलं आहे.
अवघ्या काही दिवसांत सप्टेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झालेली ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या इंग्रजी भाषेतील वेबशोजपैकी एक बनली. या वेसबीरीजने ‘Squid Game’ आणि ‘Stranger Things’सारख्या लोकप्रिय सीरिजनादेखील मागे टाकलं आहे.
या वेबसीरिजवर एवढी टीका का?
सर्वप्रथम या वेबसीरिजमधील पीडित आणि डाहमार यांचे चित्रीकरण यावरून टीका झाली. काही लोकांनी या शोमधून पिडीतांची बाजू उघडपणे मांडल्याबद्दल प्रशंसाही केली. पण एकूणच या वेबसीरिजचे नावही मुख्य गुन्हेगाराशी संबंधीत असल्याने कित्येकांना ही सीरिज म्हणजे डाहमारच्या विकृतीची उदात्तीकरण वाटल्याने यावर प्रचंड टीकाही झाली. दुसरे म्हणजे, पीडितांशी संबंधित काही कुटुंबातील सदस्यांनी असा दावा केला आहे की ही वेबसीरिज तयार होण्यापूर्वी त्यांच्याशी संपर्क साधला गेला नव्हता किंवा त्यांना विश्वासात घेतले गेले नव्हते. नेटफ्लिक्सने मात्र अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या सहभागाच्या अभावामुळे त्यांना पुढे जाणं भाग होतं असं म्हणत हे आरोप खोडून काढले.
खून, गुन्हेगारी विश्वाशी निगडीत कथा लोकांना आकर्षक वाटतात. हिंदी प्रेक्षकांमध्येसुद्धा ‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’ सारख्या टीव्ही मालिकांची लोकप्रियता प्रचंड आहे. इंटरनेटच्या सुळसुळाटामुळे अशा प्रकरणांबद्दल माहीती गोळा करणे देखील सोपे झाले आहे. ज्यामुळे अशा वेबसीरिज पाहताना किंवा पॉडकास्ट ऐकताना दर्शकांना आणि श्रोत्यांना एखाद्या गुप्तहेराप्रमाणे केस सोडवण्याचा ‘रोमांच’ अनुभवता येतो. ही आवड निर्माण होत असताना, या कथा निर्माण करून नेमका फायदा कोणाला होत आहे असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
या कथांमध्ये कलात्मक स्वातंत्र्य घेताना बरेच कलाकार आणि निर्माते मूळ घटनेच्या तथ्यांकडे दुर्लक्ष करतात आणि केवळ लोकांचं मनोरंजन कसं करता येईल यावरच लक्षकेंद्रित करतात. त्यामुळे सत्यघटना आणि त्यातील खरी पीडित माणसं यांच्याकडे तितकं गांभीर्याने आणि आदराने बघितलं जात नाही. म्हणूनच या वेबसीरिजला तेव्हा प्रचंड विरोध झाला होता.