Why is New Year celebrated on January 1?: इसवी सनपूर्व ४५ मध्ये १ जानेवारीपासून नवीन वर्ष साजरे करण्यास प्रारंभ झाला. त्यापूर्वी रोमन दिनदर्शिकेची (कॅलेंडर) सुरुवात मार्च महिन्यात होत असे. ही दिनदर्शिका ३५५ दिवसांची होती. याच दिनदर्शिकेत फेब्रुवारी आणि मार्चच्या दरम्यान काही वेळेस २७ किंवा २८ दिवसांचा अतिरिक्त महिना समाविष्ट केला जात असे. रोमन हुकूमशहा ज्यूलियस सीझरने पहिल्या शतकाच्या अखेरीस सत्तेत आल्यानंतर लगेचच दिनदर्शिकेत सुधारणा केली. परंतु, नवीन ज्युलियन कॅलेंडर लोकप्रिय होऊनही युरोपच्या मोठ्या भागात ते १६ व्या शतकाच्या मध्यापर्यंत त्याला समाजमान्यता मिळाली नाही. ख्रिश्चन धर्माच्या उदयानंतर १ जानेवारी हा नवीन वर्षाचा प्रारंभ पेगन (गैर-धार्मिक) मानला गेला, तर २५ डिसेंबर या दिवसाचा संबंध येशू ख्रिस्ताच्या जन्माशी संबंधित धार्मिक अर्थांशी जोडला गेल्याने त्याला नवीन वर्षाचे महत्त्व प्राप्त झाले. सीझरच्या चुकीच्या गणनेमुळे नवीन वर्षाचा दिवस वारंवार बदलत असे, ही देखील एक समस्या होती. पॉप ग्रेगरी यांनी ज्युलियन दिनदर्शिकेत सुधारणा करून १ जानेवारी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून निश्चित केला. तेव्हापासून त्याला मान्यता मिळण्यास सुरुवात झाली आणि अखेरीस ते जगन्मान्य झाले.

ज्युलियस सीझरने तयार केलेले कॅलेंडर

प्रारंभिक रोमन दिनदर्शिका इसवी सनपूर्व ८ व्या शतकात रोमचे संस्थापक रोम्युलस यांनी तयार केली होती. एका वर्षानंतर सत्तेवर आलेल्या नुमा पोंपिलियस याने जानेवारी (Januarius) आणि फेब्रुवारी (Februarius) हे महिने या दिनदर्शिकेत समाविष्ट करून ती १२ महिन्यांची केली. परंतु चंद्रचक्रानुसार (lunar cycle) तयार केलेली ही दिनदर्शिका हंगामांशी वारंवार विसंगती दर्शवत असे. शिवाय, दिनदर्शिकेची देखरेख करण्याचे काम सोपवले गेलेल्या पोंटिफिसेस (पुजार्‍यांच्या परिषदेतील सदस्य) यांच्यावर निवडणुकीच्या तारखांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी किंवा राजकीय कार्यकाळ वाढवण्यासाठी अतिरिक्त दिवस जोडल्याचा आरोप वारंवार होत असे. इसवी सनपूर्व ४६ मध्ये ज्युलियस सीझर सत्तेवर आल्यानंतर त्याने दिनदर्शिकेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने अलेक्झांड्रियातील खगोलशास्त्रज्ञ सोजिजेनसचा सल्ला घेतला. सोजिजेनसने चंद्रचक्र वगळून सूर्यचक्रावर आधारित गणना करण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारची गणना इजिप्शियन लोक करत असत. त्यानुसार वर्ष हे ३६५ आणि १/४ दिवसांचे मोजलं गेलं.

afghanistan cricket loksatta
तालिबानच्या तावडीतून सुटल्या, पण… अफगाण महिला क्रिकेटपटूंचा आजही अस्तित्वासाठी लढा का? पुरुष क्रिकेटपटूंसारखी मान्यता का नाही?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Uttam Jankar On Mahayuti Government
Uttam Jankar : “तीन महिन्यांत राज्यातील सरकार पडणार”, शरद पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय चर्चांना उधाण
Koregaon Bhima Shaurya Din
Koregaon Bhima Shaurya Din: महार रेजिमेंट आणि कोरेगाव विजय स्तंभ नेमके नाते काय? महार रेजिमेंटची स्थापना कशी झाली?
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : …तर ‘या’ लाभार्थी महिला ठरणार अपात्र, लाडकी बहीण योजनेवरून आदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
culture loksatta article
लोक-लौकिक : लोचा आहे का मेंदूत?
china leftover men reason
‘या’ देशात लग्नासाठी मुलांना मुलीच मिळेनात; ३.५ कोटी मुलांवर एकटे राहण्याची वेळ? कारण काय?
Sculpture of Caesar made during his lifetime. (Wikimedia Commons)

रोमन देवता जेनस- प्रारंभाची देवता

महत्त्वाचं म्हणजे सीझरने इसवी सनपूर्व ४६ मध्ये ६७ अतिरिक्त दिवस जोडले. त्यामुळे इसवी सनपूर्व ४५ चे नवीन वर्ष जानेवारी १ पासून सुरू होऊ शकले. ही तारीख रोमन देवता जेनसला (Janus) सन्मान देण्यासाठी निवडली गेली होती. जेनसला प्रारंभाची देवता मानले जात असे. त्याला दोन चेहरे असल्याचा उल्लेख आहे. त्याचे एक मुख भूतकाळाकडे असते तर दुसरे भविष्याकडे. त्यानंतर प्राचीन रोमन लोकांनी जेनसला बळी देऊन आणि एकमेकांना भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा केला.

रोमन देव-पेगन परंपरा

परंतु, ख्रिश्चन धर्माच्या प्रसारामुळे रोमन देवतेच्या उपासनेला युरोपमधील अनेक भागांमध्ये पेगन परंपरा (गैर-धार्मिक विधी) मानले गेले. त्यामुळेच मध्ययुगीन युरोपात ख्रिश्चन नेत्यांनी नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी ख्रिश्चन धार्मिक महत्त्व असलेल्या दिवसांची निवड केली. त्यात २५ डिसेंबर (ख्रिसमस) किंवा २५ मार्च (अॅनन्सिएशनचा उत्सव) यांचा समावेश होता.

सीझर आणि सोजिजेनस यांनी सौर वर्षातील दिवसांची मोजणी करताना एक चूक केली. सौर वर्षाचे खरे स्वरूप ३६५.२४१९९ दिवसांचे आहे, तर सीझरने ते ३६५.२५ दिवसांचे मोजले होते. परिणामी दरवर्षी ११ मिनिटांचा फरक पडत होता; तो फरक १५८२ पर्यंत सुमारे ११ दिवसांचा झाला. “ही चूक पोपसाठी मुख्य काळजीचा विषय ठरली होती. ज्युलियन दिनदर्शिका वापरात राहिली असती, तर अखेर इस्टरचा उत्सव उन्हाळ्यात साजरा झाला असता,” असे इतिहासकार गॉर्डन मॉयर यांनी त्यांच्या ‘द ग्रेगोरियन कॅलेंडर’ या लेखात लिहिले आहे. यानंतर मध्ययुगीन ख्रिश्चन जीवनासाठी सर्वाधिक योग्य असणारी दिनदर्शिका निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

पोप ग्रेगरी XIII ने तयार केलेले कॅलेंडर

ही सुधारणा सोपी नव्हती. पोप ग्रेगरी यांनी खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ज्ञ आणि धर्मगुरूंच्या प्रख्यात गटाला एकत्रित करून या उद्देशासाठी काम सुरू केले. त्यांच्या समोरची प्रमुख अडचण अशी होती की, जवळपास प्रत्येक नागरी दिनदर्शिकेला भेडसावणाऱ्या अपूर्णांशाचा, म्हणजेच वर्षाच्या शेवटी उरणाऱ्या कालावधीचा प्रश्न कसा सोडवायचा?

ज्युलियन दिनदर्शिकेतील चुकीची गणना सुधारण्यासाठी ग्रेगोरियन दिनदर्शिकेच्या निर्मितीवर काम करणारे इटालियन शास्त्रज्ञ अलोयसियस लिलियस यांनी एक नवीन प्रणाली तयार केली. या प्रणालीत प्रत्येक चौथे वर्ष लीप वर्ष असेल, मात्र शतकाची ती वर्षे जी ४०० ने विभागली जात नाहीत, ती लीप वर्ष म्हणून गणली जाणार नाहीत. उदाहरणार्थ, १६०० आणि २००० ही वर्षे लीप वर्षे होती. परंतु १७००, १८०० आणि १९०० यांना त्यातून वगळण्यात आले. या सुधारणा औपचारिकरित्या २४ फेब्रुवारी १५८२ रोजी पोपच्या आदेशाद्वारे लागू करण्यात आल्या.

Portrait of Pope Gregory XIII (Wikimedia Commons)

या कालखंडात युरोपात अनेक ठिकाणी कॅथलिक धर्माला विरोध होत होता. त्यामुळे ही सुधारणा त्या काळातील प्रोटेस्टंट चळवळीविरोधात होती असे मानले गेले. त्यामुळेच प्रोटेस्टंट देशांनी नवीन दिनदर्शिका नाकारली आणि ती रोमच्या अखत्यारीत असलेल्या बंडखोर गटाला पुन्हा नियंत्रणात आणण्याचा पोपचा कट असल्याचे घोषित केले, असे इतिहासकार मॉयर लिहितात. ते पुढे म्हणतात की, हा आरोप पूर्णपणे निराधार नव्हता, कारण पोप ग्रेगरी XIII हे प्रतिसुधारणेचे ठाम समर्थक होते.

या पार्श्वभूमीवर इटली, स्पेन आणि पोर्तुगालसारख्या कॅथोलिक देशांनी नवीन प्रणाली पटकन स्वीकारली, तर इंग्लंड आणि जर्मनीसारख्या प्रोटेस्टंट देशांनी ती स्वीकारण्यासाठी १८ व्या शतकाच्या शेवटपर्यंत प्रतीक्षा केली. काही अहवालांमध्ये, १७५२ साली इंग्लंडने नवीन दिनदर्शिका स्वीकारल्यावर रस्त्यावर दंगली झाल्याचे नमूद केले आहे. ग्रीस हा ग्रेगोरियन दिनदर्शिका स्वीकारणारा शेवटचा युरोपीय देश होता. त्याने ती दिनदर्शिका १९२३ मध्ये स्वीकारली.

युरोपीय वसाहतींनी त्यांच्या मूळ देशांनी स्वीकारलेल्या नवीन दिनदर्शिकेला त्वरित मान्यता दिली. तर गैर-युरोपीय जगातील मोठ्या भागांनीही २० व्या शतकात ती स्वीकारण्यास सुरुवात केली. उदाहरणार्थ, जपानने १८७२ साली आपली पारंपरिक चंद्र-सौर दिनदर्शिका बदलून ग्रेगोरियन दिनदर्शिका स्वीकारली, तर चीनने ती १९१२ मध्ये स्वीकारली. भारत, बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, इस्रायल यांसारख्या काही देशांमध्ये पारंपरिक दिनदर्शिकेसह ग्रेगोरियन दिनदर्शिकेचा देखील वापर केला जातो. भारतात चैत्रमासापासून (२१/२२ मार्च) सुरू होणारी शक दिनदर्शिका ग्रेगोरियन दिनदर्शिकेसह बहुतांश अधिकृत कामांसाठी वापरली जाते.

Story img Loader