Why is New Year celebrated on January 1?: इसवी सनपूर्व ४५ मध्ये १ जानेवारीपासून नवीन वर्ष साजरे करण्यास प्रारंभ झाला. त्यापूर्वी रोमन दिनदर्शिकेची (कॅलेंडर) सुरुवात मार्च महिन्यात होत असे. ही दिनदर्शिका ३५५ दिवसांची होती. याच दिनदर्शिकेत फेब्रुवारी आणि मार्चच्या दरम्यान काही वेळेस २७ किंवा २८ दिवसांचा अतिरिक्त महिना समाविष्ट केला जात असे. रोमन हुकूमशहा ज्यूलियस सीझरने पहिल्या शतकाच्या अखेरीस सत्तेत आल्यानंतर लगेचच दिनदर्शिकेत सुधारणा केली. परंतु, नवीन ज्युलियन कॅलेंडर लोकप्रिय होऊनही युरोपच्या मोठ्या भागात ते १६ व्या शतकाच्या मध्यापर्यंत त्याला समाजमान्यता मिळाली नाही. ख्रिश्चन धर्माच्या उदयानंतर १ जानेवारी हा नवीन वर्षाचा प्रारंभ पेगन (गैर-धार्मिक) मानला गेला, तर २५ डिसेंबर या दिवसाचा संबंध येशू ख्रिस्ताच्या जन्माशी संबंधित धार्मिक अर्थांशी जोडला गेल्याने त्याला नवीन वर्षाचे महत्त्व प्राप्त झाले. सीझरच्या चुकीच्या गणनेमुळे नवीन वर्षाचा दिवस वारंवार बदलत असे, ही देखील एक समस्या होती. पॉप ग्रेगरी यांनी ज्युलियन दिनदर्शिकेत सुधारणा करून १ जानेवारी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून निश्चित केला. तेव्हापासून त्याला मान्यता मिळण्यास सुरुवात झाली आणि अखेरीस ते जगन्मान्य झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा