सप्टेंबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच यंदा डेंग्यूचे रुग्ण बरे होण्याच्या कालावधीत वाढ झाली आहे. ही वाढ नेमकी कशामुळे झाली आहे, त्याबद्दल विविध तर्कवितर्क लढविण्यात येत असले तरी नेमके कारण जाणून घेण्यासाठी संशोधनाची आवश्यकता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. मात्र सध्या डेंग्यूचे आव्हान नेमके काय पातळीवरचे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्ण…

सप्टेंबरमध्ये मुंबईमध्ये ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्याने डेंग्यूच्या प्रसारासाठी कारणीभूत असलेल्या एडिस डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण होते. परिणामी जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या तुलनेमध्ये सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ झाली. मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या पावसाळाजन्य आजारांच्या अहवालानुसार डेंग्यूचे जूनमध्ये ३५३, जुलैमध्ये ६८५, ऑगस्टमध्ये ९९९ आणि सप्टेंबरमध्ये १३६० इतके रुग्ण सापडले. अजूनही हिवताप व डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट

हेही वाचा : विश्लेषण : विदर्भातील सिंचन प्रकल्पांचा खर्च किती वाढला?

डेंग्यूची बदलणारी लक्षणे…

मुंबईत वाढत असलेली डेंग्यू रुग्णांची संख्या ही आरोग्य सेवेसमोरील डोकेदुखी ठरत आहे. त्यातच आता डेंग्यू रुग्ण बरे होण्याचा कालावधी वाढल्याने चिंता वाढली आहे. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाला सुरुवातीला थंडी वाजते त्यानंतर दोन दिवसांनी प्रचंड ताप येतो. त्याचबरोबर अंगदुखी, सांधेदुखी यासारखी लक्षणे दिसून येतात. त्यानंतर रुग्णाच्या प्लेटलेट कमी होतात. मात्र यंदा अनेक डेंग्यू रुग्णांमध्ये सर्दी, खोकला असे संसर्गजन्य आजारही दिसून आले आहेत. डेंग्यूवर कोणतेही औषध नसल्याने लक्षणांनुसार औषधे दिली जातात.

बरे होण्याचा कालावधी वाढला

डेंग्यूची साथ ही काही राज्यासाठी नवी नाही. पाऊस ओसरला की दरवर्षीच साथीच्या आजाराचे रुग्ण वाढू लागतात. आतापर्यंत एखाद्या व्यक्तीला डेंग्यूची लागण झाल्यानंतर तो साधारणपणे सात ते आठ दिवसांनंतर तो बरा होऊ लागे. या दरम्यान त्याला दिवसातून तीन ते चार वेळा १०३ किंवा १०४ इतका ताप येत असे. तसेच रुग्णाच्या शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असते. त्यामुळे इतरही आरोग्य समस्या उद्भवत. यंदा डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याबरोबरच रुग्ण बरे होण्याच्या कालावधीतही वाढ झाली आहे. यावेळी बहुतांश डेंग्यू रुग्णांना बरे होण्यासाठी जवळपास १५ दिवसांचा कालावधी लागला आहे. अनेक रुग्णांमध्ये बरे झाल्यानंतर अंगदुखी, सांधेदुखी आणि डोकेदुखी यांसारखा त्रास पुढील अनेक दिवस कायम राहत असल्याचे दिसते आहे.

हेही वाचा : विश्लेषण : भिवंडीची कोंडी कधी फुटणार?

डेंग्यू रोखण्यासाठी उपाय काय?

डेंग्यूचा प्रसार हा एडिस या डासामुळे होत असल्याने मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. त्यानुसार जानेवारी ते सप्टेंबर अखेरपर्यंत या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ९४ हजार ९९७ डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात आली आहेत. त्यासाठी १ कोटी २७ लाख ५ हजार ३८६ घरांना भेट देऊन तेथील १ कोटी ९९ लाख ७ हजार ८२२ भांड्यांमधील पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या आरोग्य पथकाने २०२२ मध्ये ८३ लाख ९४ हजार ५३० घरांना भेटी देऊन ८९ लाख ६६ हजार २४० भांड्यांमधील पाण्याची तपासणी केली होती. त्यावेळी ५३ हजार ४९६ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात आली होती. त्याबरोबरच २०२१ मध्ये ८१ लाख ६६ हजार १३ घरांना भेटी देऊन ८६ लाख ९४ हजार ७९६ भांड्यांमधील पाण्याची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीदरम्यान आढळून आलेली ४६ हजार २५९ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली होती.

हेही वाचा : विश्लेषण: फक्त कर्नाटकच्या गुलाबी कांद्यालाच निर्यात शुल्कमाफी का?

‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ ॲप

मुंबईतील डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आणि डेंग्यूचे रुग्ण असलेली ठिकाणे सहज लक्षात यावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ हे ॲप तयार केले आहे. हे ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर ॲपच्या माध्यमातून डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे आणि घ्यावयाची काळजी याबाबतची अधिक माहिती नागरिकांना मिळू शकते. त्याचबरोबर डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यास आणि डेंगीचा प्रसार रोखण्यास या ॲपची मदत होत असल्याचे मुंबई महानगरापालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.