रेश्मा भुजबळ

२१ जुलै रोजी प्रसिद्ध झालेला ‘ओपनहायमर’ हा हॉलिवूड चित्रपट सध्या जगभरातील चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. भारतात या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. तर जगभरात आतापर्यंत या चित्रपटाची कमाई चार हजार कोटींवर पोहोचली आहे. जगभरात जरी हा चित्रपट प्रसिद्ध झाला असला तरी अद्याप जपानमध्ये तो प्रसिद्ध झालेला नाही आणि तो प्रसिद्ध करण्यासंबंधीच्या कोणत्याही हालचाली तिथे दिसत नाही. जपानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे का, अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे.

Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
four days week in japan
विश्लेषण : जन्मदर वाढविण्यासाठी जपानमध्ये चार दिवसांचा आठवडा..! काय आहेत कारणे? योजना कशी राबवणार?
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”

ओपनहायमर चित्रपट कशावर आधारित आहे?

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस वापरल्या गेलेल्या विनाशकारी अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी रॉबर्ट ओपेनहायमर एक. ते ज्यू वंशाचे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. दुसऱ्या महायुद्धासाठी मेजर जनरल लेझली ग्रोव्ह्स यांच्या संचालनाखाली आण्विक शस्त्रास्त्रे विकसित करण्याचे उद्दिष्ट असलेल्या ‘मॅनहटन प्रकल्पा’चे रॉबर्ट ओपेनहायमर प्रमुख होते. ओपनहायमर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांनी केले असून अभिनेता सिलियन मर्फीने रॉबर्ट ओपेनहायमर यांची भूमिका साकारली आहे.

जपानमध्ये विरोध होण्याची भीती का?

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस शरणागती पत्करण्यास तयार नसलेल्या जपानला धडा शिकविण्यासाठी अमेरिकेने अणुबॉम्बचा वापर केला होता. ६ आणि ९ ऑगस्ट १९४५ रोजी जपानमधील अनुक्रमे हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आले होते. यात दोन्ही शहरे बेचिराख होऊन त्यात दोन लाखांहून अधिक नागरिक मारले गेले होते. इतिहासातील या संहारक घटनेच्या जखमा आजही जपानी नागरिकांच्या मनात ताज्या आहेत.

विश्लेषण : माहीत नसलेल्या गोष्टींसाठी X का वापरले जाते ? काय आहे ‘एक्स’ चा अर्थ ? 

दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांचे म्हणणे काय?

रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. ओपनहायमर यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांचे महिलांविषयीचे वागणे, त्यांच्याबद्दलचे आकर्षण, शास्त्रज्ञापलिकडे एक माणूस म्हणून त्यांचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे, असे नोलन यांचे म्हणणे आहे. असे असले तरी जपानी नागरिक हा चित्रपट पाहण्यासाठी किती उत्सुक असतील हे प्रदर्शनाबाबत अंतिम निर्णय झाल्यावरच समजेल.

जपानमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याबद्दल वितरकांचे म्हणणे काय?

‘ओपेनहायमर’बरोबर जगभरात प्रसिद्ध झालेला ‘बार्बी’ चित्रपट जपानमध्ये सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. जपानने ‘ओपेनहायमर’वर तेथील चित्रपटगृहांमध्ये पूर्णपणे बंदी घातली नसली तरी देशात चित्रपट प्रसिद्धीच्या तारखाही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. चित्रपटाचे वितरक असणाऱ्या ‘युनिव्हर्सल पिक्चर्स’ने ‘जगभरातील ओपनहायमर चित्रपट प्रदर्शनाबाबतची अंतिम योजना अद्याप विचाराधीन आहे’ असे स्पष्ट केले. तर हॉलिवूड चित्रपटांचे सर्वात मोठे जपानी वितरक टोहो-टोवा यांनीही अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत त्यांची योजना जाहीर केलेली नाही. त्यामुळे जपानी चित्रपट रसिकांनी चित्रपट विषयात रस दाखवल्यासच तो प्रदर्शितही होऊ शकेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

ओपेनहायमर आणि भारताचा संबंध काय?

रॉबर्ट ओपेनहायमर यांच्यावर भगवद्गीतेचा मोठा प्रभाव होता. त्यांना भगवद्गीता आहे त्या स्वरूपात समजावून घ्याची होती, भाषांतर वाचायचे नव्हते म्हणून ते संस्कृत शिकले. अणुबॉम्बचाचणी यशस्वी झाल्यानंतर रॉबर्ट यांनी भगवद्गीतेचे दाखले दिल्याचे दिसून येते. एका मुलाखतीत ते म्हणाले होते, “१६ जुलै १९४५ रोजी अण्वस्त्राचा पहिला स्फोट पाहिल्यानंतर माझ्या मनात एकच विचार आला होता. तो विचार म्हणजे भगवद्गीतेतील एक श्लोक होता. ‘आता मी मृत्यू बनलोय, जगाचा नाश करणारा…’ अशा आशयाचा तो श्लोक होता.”

Story img Loader