ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर २९ ऑगस्ट ‘IC 814: द कंदहार हायजॅक’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली. भारताच्या कंदहार हायजॅकवर आधारित या वेबसीरिजवरून सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. या वादाची दखल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून घेण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट प्रमुखांना समन्स बजावण्यात आला असून त्यांना ३ सप्टेंबरला या कथित वादग्रस्त पैलूंवर स्पष्टीकरण देण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे. नेमके हे प्रकरण काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘IC 814: द कंदहार हायजॅक’ वादात का अडकली?
डिसेंबर १९९९ साली दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सचे विमान क्रमांक आयसी-८१४ चे अपहरण केले होते. पाकिस्तानातील ‘हरकत-उल-मुहाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेने या विमानाचे अपहरण केले होते. या विमानात एकूण पाच दहशतवादी होते. याच घटनेवर आधारित ‘IC 814: द कंदहार हायजॅक’ वेबसीरिज वादाच्या भोवर्यात अडकली आहे. बॉयकॉट नेटफ्लिक्स, बॉयकॉट बॉलीवूड आणि IC814, हे हॅशटॅग वापरून, सोशल मीडिया वापरकर्ते आपला विरोध दर्शवत आहेत. निर्मात्यांनी एका विशिष्ट समुदायाशी संबंधित दहशतवाद्यांना संरक्षण देण्यासाठी अपहरणकर्त्यांची नावे बदलून ‘शंकर’ आणि ‘भोला’ केली आहेत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
हेही वाचा : Netflix’s IC 814: The Kandahar Hijack : भारताला हादरवून टाकणाऱ्या विमान अपहरणाची कहाणी
परंतु, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी रविवारी या वादावर आपले स्पष्टीकरण देताना म्हटले की, गुन्हेगारांनी आपापसात टोपण नावांचा वापर केला होता आणि या वेबसीरिजसाठी व्यापक संशोधन केले गेले. या वेबसीरिजचे दिग्दर्शन अनुभव सिन्हाने केले आहे. २९ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर ही वेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनीही यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी १ सप्टेंबर रोजी ‘एक्स’वर लिहिले, “कश्मीर फाइल्ससारखे चित्रपट सत्य म्हणून दाखवणार्या लोकांनी नेटफ्लिक्स वेबसीरिज ‘IC 814’चे ज्या प्रकारे चित्रण केले आहे, ते पाहणे मनोरंजक आहे. आता अचानक त्यांना पटकथेत नेमकेपणा आणि सूक्ष्मता हवी आहे.”
जाणीवपूर्वक नावे बदलल्याचा आरोप
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अनुभव सिन्हावर जाणीवपूर्वक नावे बदलल्याचा आरोप केला आहे आणि हा एक ‘प्रपोगेंडा’ असल्याचे म्हटले आहे. “इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा, वास्तविक अपहरणकर्त्यांनी घातलेल्या दहशतीला कमी लेखण्याचा आणि त्यांनी केलेल्या कृत्यांचे गौरव करण्याचा हा प्रयत्न आहे. ‘IC 814’ची शोकांतिका एका उपहासात्मक कथेद्वारे कमी करून सिन्हा यांनी दाखवून दिले आहे की, त्यांची निष्ठा कोठे आहे. हा दहशतवाद्यांची क्रूरता कमी दाखवण्याचा आणि हिंदू समुदायाला बदनाम करण्याचा एक अजेंडा आहे,” असे एका वापरकर्त्याने ‘एक्स’वर लिहिले.
दुसर्या वापरकर्त्याने लिहिले, “IC814 मध्ये अपहरणकर्त्यांची नावे अनुभव सिन्हा यांनी बदलून शंकर आणि भोला अशी केली आहेत. अशाप्रकारे बॉलीवूडने दहशतवाद्यांना विजयी केले आहे. #BoycottBollywood #IC814TheKandaharHijack.” तिसर्याने लिहिले, “IC 814 दहशतवाद्यांची खरी नावे – सनी अहमद काझी, जहूर इब्राहिम, शाहिद अख्तर आणि इब्राहिम अझहर अशी होती. वेबसीरिजमध्ये त्यांना शंकर आणि भोला ही नावे देण्यात आली आहेत.”
कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी ‘एक्स’वर लिहिले, “मी अपहरणकर्त्यांच्या नावांबद्दल बरेच ट्विट वाचत आहे. आम्ही योग्य संशोधन केले आहे. ते एकमेकांना त्याच नावांनी हाक मारायचे. याला तुम्ही टोपणनाव म्हणा किंवा खोटे नाव.” त्यांनी पुढे लिहिले, “कलाकारांना प्रेम केल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल माझ्या टीमचे आणि विशेषतः अनुभव सिन्हा यांचे खूप खूप आभार. #IC814 #Netflix. “
ही घटना काय होती?
२४ डिसेंबर १९९९ रोजी, इब्राहिम अथर, सनी अहमद काझी, जहूर इब्राहिम, शाहिद अख्तर आणि सय्यद शाकीर या पाच दहशतवाद्यांनी काठमांडू ते दिल्लीच्या उड्डाणादरम्यान ‘IC-814’ चे अपहरण केले होते. यात क्रूसह १८० प्रवासी होते, ज्यांना आठ दिवस ओलिस ठेवण्यात आले होते. भारताने कट्टर दहशतवादी मसूद अझहर, उमर शेख आणि मुश्ताक अहमद जरगर यांना सोडल्यानंतर ओलिसांना सोडण्यात आले. परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी विशेष विमानाने त्यांना कंदहारला नेले.
‘IC 814: द कंदहार हायजॅक’ या वेबसीरिजमध्ये विजय वर्मा, नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, मनोज पाहवा, कुमुद मिश्रा, अरविंद स्वामी, दिया मिर्झा आणि पत्रलेखा यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. या विमानाचे वैमानिक कॅप्टन देवी शरण आणि पत्रकार श्रींजय चौधरी यांनी लिहिलेल्या ‘फ्लाइट इनटू फियर: द कॅप्टन्स स्टोरी’ या पुस्तकापासून ही वेबसीरिज प्रेरित आहे.