हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध तीन आठवड्यांहून अधिक काळ उलटून गेला आहे. आता पॅलेस्टाईनला समर्थन देणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. १०० हून अधिक समाजमाध्यमे पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवण्यासाठी ‘कलिंगड’ चिन्हाचा वापर करीत आहेत. कलिंगड हे पॅलेस्टाईन एकतेचे प्रतीक कसे बनले? पॅलेस्टाईनचा आणि कलिंगडाचा संबंध काय हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
इस्रायल आणि हमासमध्ये ७ ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यामध्येही लहान मुलांसह आठ हजारांहून अधिक लोक मारले गेले. जेरुसलेमवर मानवतावादी संकट ओढवल्याच्या चर्चा होत असतानाही इस्रायल आपल्या सैन्याची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. जगभरातून पॅलेस्टाईनला समर्थन वाढत असल्यामुळे इस्रायल अधिकाधिक एकाकी पडत असल्याचे चित्र दिसते आहे. पॅलेस्टाईनला समर्थन आणि इस्रायलचा निषेध करण्यासाठी समाजमाध्यमांवर ‘कलिंगड’चे चित्र झळकत आहे. निदर्शने करताना, समर्थनार्थ पोस्ट करताना लोकांनी ‘कलिंगडा’च्या इमोजी, चित्रे पोस्ट केलेली दिसतात.

हेही वाचा : सरसंघचालक भागवत यांचे केरळमध्ये इंग्रजीत भाषण; संघाचा इंग्रजीद्वेष मावळण्यामागे कारण काय?

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पॅलेस्टाईन आणि कलिंगडाचा संबंध

कलिंगड हे प्रतिकाराचे प्रतीक म्हणून वापरण्यात येत आहे. पॅलेस्टाईनच्या ध्वजाचा रंग आणि कलिंगडाचा रंग (लाल, पांढरा, काळा व हिरवा) हे समान आहेत. तसेच कलिंगडाचे पीक पॅलेस्टाईनमध्ये जेनिनपासून गाझापर्यंत घेतले जाते. त्यांच्या पाककृतींमध्येही कलिंगडाचा समावेश असतो. पॅलेस्टाईनच्या संस्कृतीचे प्रतीक म्हणूनसुद्धा कलिंगड ओळखले जाते. तेथील साहित्यामध्येही कलिंगडाचा उल्लेख आढळतो.

कलिंगड आणि पॅलेस्टाईन यांचे सांस्कृतिक संबंध आहेत; तसेच दडपशाही, अन्याय-अत्याचाराला विरोध, प्रतिकार, निषेध असेही संबंध आहेत.
१९६७ मध्ये सहा दिवसांच्या युद्धानंतर इस्रायलने वेस्ट बँक, गाझा पट्टी व पूर्व जेरुसलेमवर ताबा मिळवला. त्यानंतर इस्रायल सरकारने ताब्यात घेतलेल्या प्रदेशांमध्ये पॅलेस्टाईनचा ध्वज फडकवण्यास मनाई केली.

हेही वाचा : चंद्रग्रहण २०२३ : चंद्रग्रहण पौर्णिमेच्या रात्रीच का होते? प्रत्येक महिन्यात चंद्रग्रहण का होत नाही ? जाणून घ्या…

२०२१ मध्ये कलाकार स्लिमन मन्सूर यांनी ‘द नॅशनल’ला सांगितले की, इस्रायली अधिकार्‍यांनी १९८० मध्ये रामल्लाहमधील एक कला प्रदर्शन बंद पाडले. या प्रदर्शनामध्ये स्लिमन मन्सूर, नबिल अनानी व इसाम बद्रल यांच्यासह इतर कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, ”पॅलेस्टाईनचा ध्वज फडकवणे जसे निषिद्ध आहे; तसे त्या ध्वजातील रंगही वापरणे निषिद्ध आहे.” यावरती इसाम बद्रल म्हणाले, ”मी लाल, हिरव्या, काळ्या व पांढऱ्या रंगाचे फूल बनवले तर?” यावर ते अधिकारी उत्तरादाखल म्हणाले, ”हे रंग वापरलेले फूलदेखील जप्त करण्यात येईल. तुम्ही कलिंगडही रंगवले तरी ते जप्त होईल.”

हेही वाचा : सरसंघचालक भागवत यांचे केरळमध्ये इंग्रजीत भाषण; संघाचा इंग्रजीद्वेष मावळण्यामागे कारण काय?

या आदेशाचा निषेध करण्यासाठी पॅलेस्टाईनमधील लोकांनी कलिंगड वापरण्यास सुरुवात केली. तेच फळ आता शर्ट, भित्तीचित्रे, पोस्टर्स आणि समाजमाध्यमांवर इमोजीच्या रूपात दिसते आहे.

टाइम (Time) दिलेल्या अहवालानुसार, १९९३ मध्ये इस्रायलसह ओस्लो करार करून ध्वजासंबंधीचा संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पॅलेस्टिनी ध्वजावरील बंदी या करारांतर्गत उठवण्यात आली होती. त्यामुळे गाझा ते वेस्ट बँकमधील भागात पॅलेस्टिनी ध्वज फडकवण्यास परवानगी मिळाली.
या करारानंतर न्यूयॉर्क टाइम्समधील एका लेखात पत्रकार जॉन किफनर यांनी लिहिले, ”या कराराच्या आधीच्या काळात गाझापट्टीमध्ये तरुणांनी कापलेले कलिंगड नेल्याबद्दल अटक करण्यात आली होती. कारण- हे कलिंगड लाल, काळा, हिरव्या, पांढऱ्या पॅलेस्टिनी ध्वजाच्या रंगांचे प्रदर्शन करते. निषेध मोर्चांच्या वेळीसुद्धा पॅलेस्टिनी ध्वज फडकवून मिरवणुका निघाल्या होत्या.” काही काळाने वृत्तपत्राने हा मजकूर मागे घेतला. कारण- या घटनेमुळे कलिंगडाला इस्रायलचा विरोध आहे, हे निश्चित होत नव्हते.

पॅलेस्टिनींनी दावा केला की, ओस्लो करारानंतरही ध्वजबंदीचा आदेश पूर्णपणे मागे घेण्यात आला नाही. २००७ मध्ये दुसऱ्या इंतिफादानंतर कलाकार खालेद होरानी यांनी ‘सब्जेक्टिव्ह अॅटलस ऑफ पॅलेस्टाईन’ नावाच्या पुस्तकासाठी ‘कलिंगड असणारा ध्वज’ चित्रित केला. टाइममधील अहवालानुसार, २०१७ च्या आवृत्तीमध्ये ‘कलर ऑफ पॅलेस्टिनी फ्लॅग’ असे नाव दिले. त्यानंतर जगभर कलिंगड हे पॅलेस्टाईनचे प्रतीक ठरले.

इस्रायली न्यायालयाने पूर्व जेरुसलेमच्या शेख जर्राह परिसरात असलेल्या पॅलेस्टिनी कुटुंबांना घरातून काढण्यात येईल, असा निर्णय दिल्यानंतर २०२१ मध्ये पुन्हा या ध्वजाच्या वापरासंदर्भात वाद सुरू झाला.

निषेधार्थ कलिंगडाचा होणारा वापर

जानेवारी २०२३ मध्ये पॅलेस्टिनी ध्वज पुन्हा एकदा चर्चेत आला. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षामंत्री इतामार बेन-ग्विरी यांनी पोलिसांना सार्वजनिक ठिकाणांवरील पॅलेस्टिनी ध्वज जप्त करण्याचे निर्देश दिले. हॅरेट्झमधील एका अहवालानुसार, जूनमध्ये इस्रायली संसदेकडून प्राथमिक मान्यता मिळाल्यानंतर विद्यापीठांसह राज्य-अनुदानित संस्थांमध्ये या ध्वजावर बंदी घालण्यासाठी एक विधेयक मंजूर करण्यात आले.

त्यानंतर लगेच, एका तरुणीला जनजागृती मोर्चादरम्यान पॅलेस्टिनी ध्वज फडकवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. परंतु, अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, त्या मुलीने अधिकार्‍यांवर हल्ला केला म्हणून तो ध्वज जप्त करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी ध्वज फडकवण्यास घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधात मोर्चे काढण्यात आले. झाझिम या अरब-इस्रायल यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित करू इच्छिणाऱ्या संस्थेने एक मोहीम सुरू केली. त्यांनी तेल अवीवमध्ये असणाऱ्या टॅक्सींवर टरबुजांचे पोस्टर चिकटवलेले. या पोस्टरसह ‘हा पॅलेस्टाईनचा ध्वज नाही’, असा संदेश देण्यात आला होता, असे टाइम्स ऑफ इस्रायलने प्रसिद्ध केले आहे.

झाझिमचे संचालक रालुका गनेआ यांनी सांगितल्यानुसार, ”आम्ही सरकारला स्पष्टपणे सांगत आहोत की, आम्हाला कोणतीही विनाकारण असणारी बंदी मान्य नाही. आम्ही अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी लढणे थांबवणार नाही.” आता इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू असताना पुन्हा ‘कलिंगड’ हा चर्चेचा मुद्दा ठरला आहे. समाजमाध्यमांवर कलिंगडाची चित्रे प्रदर्शित करून पॅलेस्टाईनला समर्थन दर्शवण्यात येत आहे.

Story img Loader